Home /News /entertainment /

गजाआड जाण्यापासून वाचली सनी लिओनी, या प्रकरणात उच्च न्यायालयाचा दिलासा

गजाआड जाण्यापासून वाचली सनी लिओनी, या प्रकरणात उच्च न्यायालयाचा दिलासा

सनी लिओनीने (Sunny Leone) केरळ उच्च न्यायालयात (Kerala High Court) अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता, त्यानंतर न्यायालयाने सनीला अटक न करण्याचा आदेश केरळ गुन्हे शाखेला (Kerala Crime Branch) दिला आहे.

    मुंबई, 10 फेब्रुवारी: बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीला (Sunny Leone) केरळ उच्च न्यायालयाकडून (Kerala High Court) मोठा दिलासा मिळाला आहे. 29 लाख रुपयांच्या फसवणूक (Fraud) प्रकरणात,  केरळ उच्च न्यायालयाने सनी लिओनीच्या अटकेला स्थगिती दिली आहे. सनीने यापूर्वी केरळ उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता, त्यानंतर न्यायालयाने सनीला अटक न करण्याचा आदेश केरळ गुन्हे शाखेला दिला आहे. एका इव्हेंट कंपनीने सनीविरोधात आर्थिक फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणात आता न्यायालयाने सनीला दिलासा दिला आहे. नेमकं प्रकरण काय आहे? पेरू मबरूर येथे राहणाऱ्या आर श्रेयस नावाच्या व्यक्तीने सनी लिओनी विरोधात 29 लाख रुपयांची फसवणूक केल्याबद्दल गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर हे प्रकरण समोर आलं आहे. श्रेयसचा आरोप आहे की, सनीने दोन कार्यक्रमांमध्ये सहभाग घेण्यासाठी ही रक्कम घेतली होती, पण त्यानंतर तिने कार्यक्रमात येण्यास नकार दिला. या प्रकरणी केरळ गुन्हे शाखेने शुक्रवारी (5 फेब्रुवारी रोजी)  सनी लिओनीला चौकशीसाठी बोलवलं होतं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सनीने या चौकशीत गुन्हे शाखेला सांगितलं की, देशात कोरोना विषाणूच्या साथीने धुमाकूळ घातला होता. त्यामुळे ती या दोन्ही कार्यक्रमांना हजेरी लावू शकली नाही. तिने पुढे सांगितलं की, संयोजकांनी पाच वेळा हा कार्यक्रम रद्द केला आणि वेळापत्रकानुसार त्यांना हा कार्यक्रम पुन्हा आयोजित करता आला नाही. (हे वाचा-अनिता हसनंदानीच्या घरी आला चिमुकला पाहुणा; डिलीव्हरीनंतरचा पहिला VIDEO) सनी लिओनीच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर, ती शेवटच्या वेळी देवांग ढोलकिया दिग्दर्शित 'बुलेट' या वेब सीरीजमध्ये झळकली होती. या वेब सीरीजमध्ये करिश्मा तन्नाही मुख्य भूमिकेत दिसली होती. ही वेब सीरीज 8 जानेवारी रोजी एमएक्स प्लेयरवर प्रसिद्ध झाली होती. सनी लिओनी आता 'अनामिका' या दहा एपिसोडच्या मालिकेत दिसणार आहे. या सीरीजमध्ये सोनाली सेगलही दिसणार आहे. तर विक्रम भट्ट हे या वेब सीरीजचं दिग्दर्शन करणार आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Bollywood News, Crime news, Kerala, Money, Money fraud, Star celebraties, Sunny Leone

    पुढील बातम्या