'एस दुर्गा'चा ईफ्फी महोत्सवात समावेश करा - केरळ उच्च न्यायालय

'एस दुर्गा'चा ईफ्फी महोत्सवात समावेश करा - केरळ उच्च न्यायालय

सिनेमाच्या नावावर आक्षेप घेत हा सिनेमा गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून वगळण्यात आला होता. मात्र कोर्टाने याबाबत सिनेमाचा दिग्दर्शक एस शशीधरन याची बाजू उचलून धरत सरकारला या सिनेमाचा समावेश महोत्सवात करण्याचे आदेश दिलेत.

  • Share this:

21 नोव्हेंबर : केरळ उच्च न्यायालयाने 'एस दुर्गा' या मल्याळम सिनेमाचा ईफ्फी महोत्सवात समावेश करण्याचे आदेश माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला दिलेत. सिनेमाच्या नावावर आक्षेप घेत हा सिनेमा गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून वगळण्यात आला होता. मात्र कोर्टाने याबाबत सिनेमाचा दिग्दर्शक एस शशीधरन याची बाजू उचलून धरत सरकारला या सिनेमाचा समावेश महोत्सवात करण्याचे आदेश दिलेत.

सेन्सॉर बोर्डाने या सिनेमाला युए सर्टीफिकेट देऊन तो प्रदर्शित करायची परवानगी दिलेली असताना तो महोत्सवातून वगळणं चुकीचं असल्याचं मत केरळ उच्च न्यायालयाने व्यक्त केलंय. एस दुर्गाचं अगोदरचं नाव होतं सेक्सी दुर्गा. हा सिनेमा देवी दुर्गामातेवर आहे, असा गैरसमज झाल्यानं सिनेमावर आक्षेप नोंदवला. पण हा सिनेमा एक रोड मुव्ही आहे. त्यात एका रात्री एक तरुण आणि तरुणी कसे संकटांना तोंड देतात, हे दाखवलंय.

एस दुर्गासोबत मराठी न्यूड हा सिनेमाही ईफ्फीतून वगळण्यात आला होता. मात्र सिनेमाचे निर्माते दिग्दर्शकांनी कोर्टात दाद मागितली नसल्याने न्यूडला या निर्णयाचा फायदा मिळणार नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 21, 2017 04:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading