रानू मंडल यांचं हिमेश रेशमियासोबत नवं गाणं रिलीज, पाहा VIDEO

रानू मंडल यांचं हिमेश रेशमियासोबत नवं गाणं रिलीज, पाहा VIDEO

हिमेश रेशमियाचा 'हॅप्पी हार्डी अँड हीर' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमातील 'नजदीकियाँ' हे गाणं सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे.

  • Share this:

मुंबई, 06 फेब्रुवारी : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळे रातोरात स्टार झालेल्या रानू मंडल आता प्लेबॅक सिंगर झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी त्याचं 'तेरी मेरी कहानी' हे गाणं रिलीज झालं असून याशिवाय त्यांनी प्रसिद्ध प्लेबॅक सिंगर हिमेश रेशमियासोत 3 गाणी गायली आहेत. सध्या सोशल मीडियावर रानू मंडल यांच्या नावाचीच चलती आहे. स्टेशनवर गाणं गाऊन भीक मागणाऱ्या रानू मंडल यांचा बॉलिवूड प्लेबॅक सिंगर होण्यापर्यंतचा प्रवास खरंच थक्क करणारा असाच होता. दरम्याच्या काळात त्याचे अनेक व्हिडीओ सुद्धा व्हायरल झाले. पण आता त्यांचं नवं गाणं रिलीज झालं आहे.

हिमेश रेशमियाचा 'हॅप्पी हार्डी अँड हीर' हा सिनेमा नुकताच रिलीज झाला. या सिनेमातील 'नजदीकियाँ' हे गाणं नुकतंच रिलीज झालं. या व्हिडीओमध्ये रानू मंडल आपल्या जादुई आवाजात 'कह राही है नजदीकियाँ' हे गाणं गाताना दिसत आहे. या गाण्यात रानू यांच्यासोबतच हिमेश रेशमिया आणि गायिका पायल देव यांचा सुद्धा आवाज आहे. काही दिवसांपूर्वीच हिमेशनं या गाण्याच्या मेकिंगचा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला होता.

साऊथ सुपरस्टार विजयच्या घरावर आयकर विभागाची कारवाई, 65 कोटींची रोकड जप्त

काही दिवसांपूर्वी रानू मंडल यांनी एका कार्यक्रमात त्यांच्या जीवनावर सिनेमा बनवा अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यांची ही इच्छा लवकर पूर्ण होणार आहे. दिग्दर्शक ऋषिकेश मंडल हे रानू यांच्या जीवनावर बायोपिक तयार करण्याच्या तयारीत असून अभिनेत्री सुदीप्ता चक्रवर्ती हिला रानू यांच्या व्यक्तिरेखेसाठी विचारणा केली आहे. याविषयी IANS बोलताना सुदीप्ता म्हणाली, मला या सिनेमाची ऑफर मिळाली आहे मात्र त्याची स्क्रिप्ट अद्याप मिळालेली नाही त्यामुळे ती मिळल्यानंतर मी हा सिनेमा करायचा की, नाही हे ठरवणार आहे.

टायगर श्रॉफ पुन्हा एकदा अ‍ॅक्शन अवतारात, पाहा धमाकेदार Baaghi 3 Trailer

एक वेळ होती की, रानू मंडल राणाघाट स्टेशनवर गाणं गाऊन भीक मागत होत्या मात्र एका व्हिडीओनं त्यांचं आयुष्य बदललं. रेल्वे स्टेशनवर गात असतानाच एतींद्र चक्रवर्ती अनेकदा रानू यांचं गाणं ऐकत तिथून जात असे. एक दिवस त्यानं रानू यांचं 'प्यार का नगमा' हे गाणं व्हिडीओ शूट केलं आणि हा व्हिडीओ त्यानं सोशल मीडियावर अकाउटवर अपलोड केला.

त्यानंतर सोशल मीडियावर शेअर केल्या जाणाऱ्या कंटेंटच्या शोधात असणाऱ्या अनेक पेज पैकी एक पेज ‘बरपेटा टाउन द प्लेस ऑफ पीस’ला यतींद्रचा हा व्हिडीओ सापडला. त्यानी ते त्यांच्या पेजवर शेअर केला. अशा रितीनं हा व्हिडीओ लाखो लोकांपर्यंत पोहोचला. त्यानंतर अनेक वेब पोर्टल्सनी त्याची बातमी केली आणि रानूच्या आवाजाची तुलना लता मंगेशकर यांच्यांशी केली जाऊ लागली.

VIDEO : ब्रेकअपबद्दल असं काय म्हणाला कार्तिक की, ऐकल्यावर सारालाही बसला धक्का

रानू मंडल काही दिवसांपूर्वी एका व्हायरल व्हिडीओमुळे ट्रोलिंगची शिकार ठरल्या होत्या. या व्हिडीओमध्ये त्यांनी एका चाहतीसोबत सेल्फी घेण्यास नकार दिला होता तसेच तिच्यासोबत वाद घालताना दिसल्या होत्या. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर सडकून टीका सुद्धा झाली होती.

सारा-कार्तिकनं रणवीर सिंहपासून लपवलं होतं 'हे' सत्य, आता झाला खुलासा

First published: February 6, 2020, 2:48 PM IST

ताज्या बातम्या