सैफची मुलगी सारा अली खानची बॉलिवूड एन्ट्री धोक्यात!

सैफची मुलगी सारा अली खानची बॉलिवूड एन्ट्री धोक्यात!

साराच्या आगामी आणि पहिल्याच सिनेमात ती सुशांत सिंग राजपूतसोबत दिसणार आहे.

  • Share this:

13 फेब्रुवारी : सैफ अली खानची मुलगी सैफ अली खानची सैफ अली खान धोक्यात आल्याचं दिसतंय. कारण तिचा आगमी सिनेमा केदरनाथचं शुटिंग थांबवण्यात आलं आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शक आणि निर्मात्यामध्ये सध्या वाद सुरू आहे. त्यांच्या या वादामुळे या सिनेमाचं शुटिंग थांबवण्यात आलं आहे. या भांडणामुळे सिनेमाचा दिग्दर्शक अभिषेक सिनेमा सोडून जाण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे हा सिनेमाचं धोक्यात आलाय असं म्हणायला हरकत नाही.

साराच्या आगामी आणि पहिल्याच सिनेमात ती सुशांत सिंग राजपूतसोबत दिसणार आहे. या सिनेमाच्या शुटिंग दरम्यानचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सारा आणि सुशांतने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पण या भांडणांमुळे या दोघांची जोडी चाहत्यांना पहायला मिळणार का? हा प्रश्नच आहे.

ही सगळी वादावादी सिनेमाच्या तारेखवरून सुरू आहे. काही दिवसांपूर्वी अभिषेकने सिनेमाच्या तारीखेची ट्विटरद्वारे घोषणा केली होती. आणि यावरूनच सिनेमाच्या दिग्दर्शक आणि निर्मात्यामध्ये भांडण सुरू झालं. आता या दोघांचा वाद थांबणार का? आणि सिनेमाची शुटिंग सुरू होणार का? याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आणि तसंही या सिनेमावर साराचं करिअरही अवलंबून आहे.

First published: February 13, 2018, 12:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading