मुंबई, 8 डिसेंबर : केदारनाथ (Kedarnath) हा सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant singh Rajput) हिट सिनेमांपैकी एक. केदारनाथ (Kedarnath) सिनेमाचा दिग्दर्शक अभिषेक कपूर (Abhishek Kapoor) ने केलेलं एक Tweet सुशांतच्या बहिणीने शेअर करत मायानगरीबद्दल टिप्पणी केली आहे.
सुशांतच्या पदार्पणातला सिनेमा 'Kai Po Che' चा दिग्दर्शक देखील अभिषेकच आहे. त्यामुळे सुशांत आणि अभिषेकमध्ये केवळ व्यावसायिक नातं नसून अभिषेक आणि सुशांत हे एकमेकांचे चांगले मित्र होते. केदारनाथ सिनेमा प्रदर्शित होऊन दोन वर्षं पूर्ण झाली. त्याबद्दल अभिषेक कपूरने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने या सिनेमातल्या गाण्याच्या ओळी लिहिल्या आहेत.
'द्धंद्व दोनों लोक में विषामृत पर था छिड़ा. अमृत सभी में बांटकर, प्याला विष का तूने खुद पिया, नमो नमो (Namo Namo) जी शंकरा, भोलेनाथ शंकरा', असं Tweet केलं आहे. #2YearsOfSSRAsMansoor असा टॅग वापरून सुशांत आणि त्याने साकारलेल्या भूमिकेची आठवण काढली आहे.
सुशांतची बहीण श्वेता सिंह कीर्ती हिने ही पोस्ट शेअर करत सुशांतच्या आत्महत्येवर भाष्य केलं आहे. दिग्दर्शक अभिषेक कपूरच हे ट्विट बघून श्वेता तिच्या इन्स्टाग्रामवर (Instagram) व्यक्त झाली.
श्वेता सिंह कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते. पण बऱ्याच दिवसांनंतर तिने भावाविषयी भावुकपणे लिहिलं आहे.
View this post on Instagram
इन्स्टाग्रामच्या या पोस्टमध्ये श्वेताने अभिषेकच्या या ट्विटचा स्क्रीन शॉट शेअर केला आणि पुढे लिहलं आहे, 'अभिषेकने पोस्ट केलेलं हे गाणे काल मी ऐकत होते आणि ऐकताना असा विचार आला. ज्याप्रमाणे शंकराने ( Lord Shiv) स्वतः विष पिऊन सर्वांना अमृत दिलं, तसंच सुशांतने केलं. सुशांत शिवभक्त होता. त्याने देखील आपल्या जीवनाची किंमत मोजून दुसऱ्यांना अमृत दिलं. त्यानं एक मोठा धडा सगळ्यांना दिला आहे. मायानगरीचा व्यर्थ, पोकळ चकचकाट त्यान उघडा पाडला.'
अभिषेक कपूर दिग्दर्शित केदारनाथ या सिनेमात सुशांत सिंह राजपूत आणि सारा अली खान (Sara Ali Khan) मुख्य भूमिकेत दिसून आले होते. या सिनेमातील सुशांतचे मन्सूर हे कॅरॅक्टर चांगलं फेमस झाले होते. तसंच यातील 'नमो नमो' हे गाणं सुशांतच्या टॉप गाण्यांपैकी एक आहे.