मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Kedar Shinde: 'हे जेव्हा थांबेल त्याला कारणीभूत भरतच असेल'; केदार शिंदेंनी कोणत्या गोष्टीसाठी भरतला धरलं जबाबदार?

Kedar Shinde: 'हे जेव्हा थांबेल त्याला कारणीभूत भरतच असेल'; केदार शिंदेंनी कोणत्या गोष्टीसाठी भरतला धरलं जबाबदार?

पुन्हा सही रे सही या नाटकाला आज तब्बल 20 वर्ष पूर्ण झालीत. आजही या नाटकाची जादू कायम आहे. नाटक कधीच बंद होऊ नये अशी इच्छा केदार शिंदे यांची आहे. पण नाटक बंद झालं तर त्याला कारणीभूत भरत जाधव असतील असं केदार शिंदे यांनी म्हटल आहे. काय आहे यामागचं कारण वाचा.

पुन्हा सही रे सही या नाटकाला आज तब्बल 20 वर्ष पूर्ण झालीत. आजही या नाटकाची जादू कायम आहे. नाटक कधीच बंद होऊ नये अशी इच्छा केदार शिंदे यांची आहे. पण नाटक बंद झालं तर त्याला कारणीभूत भरत जाधव असतील असं केदार शिंदे यांनी म्हटल आहे. काय आहे यामागचं कारण वाचा.

पुन्हा सही रे सही या नाटकाला आज तब्बल 20 वर्ष पूर्ण झालीत. आजही या नाटकाची जादू कायम आहे. नाटक कधीच बंद होऊ नये अशी इच्छा केदार शिंदे यांची आहे. पण नाटक बंद झालं तर त्याला कारणीभूत भरत जाधव असतील असं केदार शिंदे यांनी म्हटल आहे. काय आहे यामागचं कारण वाचा.

पुढे वाचा ...
  मुंबई, 15 ऑगस्ट: मराठी रंगभूमीवर आजवर अनेक नाटकं आली आणि गेली. त्यातील काही नाटकं ही काही काळापूर्ती टिकली. मात्र काही नाटकं अजरामर झाली आणि आजही ती प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. मराठी रंगभूमीवर असचं एक अजरामर नाटक म्हणजे सही रे सही. नाटकानं मराठी रंगभूमीवर इतिसास रचला असं म्हणायला हरकत नाही. भरत जाधव, केदार शिंदे आणि अंकुश चौधरी हे त्रिकूट यानिमित्तानं प्रेक्षकांपर्यंत पोहोचलं. पुन्हा सही रे सही या नाटकाला आज तब्बल 20 वर्ष पूर्ण झालीत. आजही या नाटकाची जादू कायम आहे. आज बरोबर 20 वर्षांपूर्वी 15 ऑगस्ट 2002 साली नाटकाची सुरुवात झाली. दादरच्या शिवाजी मंदिरात सुरू झालेला सही रे सहीचा प्रयोग पार जगाच्या पाठीवर सातासमुद्रापार पोहोचला.  सही रे सही नाटक कधीच बंद होऊ नये अशी इच्छा केदार शिंदे यांची आहे. पण नाटक बंद झालं तर त्याला कारणीभूत भरत जाधव असतील असं केदार शिंदे यांनी म्हटल आहे. असं का म्हणाले केदार शिंदे जाणून घ्या. केदार शिंदे यांनी सही रे सही नाटकाची सुरुवात कशी झाली. कलाकारांनी सहीचा हा रथ कशाप्रकारे प्रेक्षकांपर्यंत पोहोचला या सगळ्या आठवणी शेअर केल्या आहेत. केदार शिंदेंनी म्हटलंय,  '20 वर्ष आज पुर्ण होतायत. १५.०८.२००२ रोजी हा “सही” रथ ज्या भरधावाने निघाला तो अजूनही त्याच वेगात आहे. मला अजूनही आठवतो तो दिवस. माझ्या टाटा इंडिका गाडीतून मी आणि भरत, शिवाजी मंदिरच्या दिशेने निघालो तेव्हा एकच गोष्ट मी भरतला वारंवार सांगत होतो. “भरत आज दिवस तुझा आहे. जे जे आजपर्यंत करावसं वाटत होतं, ते साकार करण्याचा आजचा दिवस आहे. मी पडदा उघडल्यावर पडद्यामागे असणार. रंगमंच तुझा असणार आहे. त्यामुळे बागड त्या रंगमंचावर! आपल्या आण्णांनीच तो रंगमंच बांधलाय असं समज!” आणि भरत जाधव याने परत परत परत परत तेच केलं. तब्बल 20 वर्ष. हेही वाचा - Hardeek Joshi Akshaya Deodhar: राणादा पाठक बाईंची लगीनघाई लवकरच; केळवणाला झाली सुरुवात
  View this post on Instagram

  A post shared by Kedar Shinde (@kedaarshinde)

  पुन्हा सही रे सही या नाटकात अभिनेता भरत जाधवचा फार मोलाचा वाटा आहे नाटकात प्रमुख कलाकार म्हणून नाटक इतके वर्ष सुरू ठेवण्याचं काम भरत जाधवनी केलं आहे. त्याच्या या कर्तृत्वाचं कौतुक करत केदार शिंदेंनी म्हटलंय,  'या संपुर्ण प्रवासात त्याच्या सोबत त्याच तडफेने काम करणारे कलाकार आणि पडद्यामागचे तंत्रज्ञ त्यांचं प्रेम अजूनही या जादूई नाटकावर तेवढच आहे आणि तेवढच राहील. मी मुलीच्या बापाच्या भुमिकेत होतो आणि राहीन! आपण लाडाने प्रेमाने मुलीला वाढवायचं आणि योग्य वेळी तीचं लग्न लावल्यावर तीचा सुखाचा संसार पाहायचा! या दरम्यान मुलीला काही अडचण,त्रास झाला तर वेळोवेळी तत्परतेने पाठीशी उभंही राहायचं. माझ्या या मुलीचं लग्न भरत जाधव या कर्तव्यतत्पर मुलाशी लावलं. या दरम्यान “सासवा”(निर्माते) बदलल्या. मुलीला आणि भरतलाही त्याचा त्रास झाला. पण नेटाने त्याने संसार केला. आणि आता तर त्याने स्वत:चा संसार थाटलाय. (भरतच निर्माता झाला) खुप समाधान वाटतं'. केदार शिंदेंनी पुढे म्हटलंय, 'हे नाटक कधी बंद होऊ नये पण जेव्हा हे थांबेल त्याला कारणीभूत भरतच असेल. तो जोवर तडफेने काम करतोय तोवर हे नाटक सुरू राहील. त्याला कंटाळा येईल तेव्हा हे थांबेल! पण मला वाटत नाही की अजून 20 वर्षाने ही वेळ येईल!' पोस्ट शेअर करत शेवटी केदार शिंदेंनी म्हटलंय, श्री स्वामी समर्थांच्या कृपेने अशी कलाकृती माझ्या हातून घडली. पण यात माझ्या पाठीमागे असणारे स्वामी होतेच, पण त्या सोबत अजून एक व्यक्ती होती, माझा मित्र अंकुश चौधरी.. मी,भरत,अंकुश या तिघांच्या मैत्रीचं प्रतिबिंब म्हणजे... “सही”.
  Published by:Minal Gurav
  First published:

  Tags: Marathi actress, Marathi entertainment

  पुढील बातम्या