• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • कुठल्याही निवडणुका जाहीर होण्याआधी केदार शिंदेंनी केली महत्त्वाची तारीख जाहीर

कुठल्याही निवडणुका जाहीर होण्याआधी केदार शिंदेंनी केली महत्त्वाची तारीख जाहीर

प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनी एक पोस्ट केली आहे त्यामुळे ते चर्चेत आले आहेत.

 • Share this:
  मुंबई, 25 नोव्हेंबर- प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे आता तीन वर्षांच्या गॅप नंतर प्रेक्षकांसाठी नवीन सिनेमा घेऊन येत आहे. ‘बाईपण भारी देवा’ असं त्यांच्या आगामी सिनेमाचे नाव आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी याबद्दल माहिती दिली आहे. केदार शिंदे व अभिनेते भरत जाधव यांनी सिनेमाते पोस्टर शेअर करत म्हटलं आहे की,कुठल्याही निवडणुका जाहीर होण्याआधी आमची तारीख जाहीर! 'बाईपण भारी देवा' - 28 जानेवारी 2022 पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात! वाचा : PHOTO : 'आई कुठे काय करते' मधील संजनाच्या ग्लॅमरस अंदाजावर चाहत्यांच्या खिळल्या नजरा! ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटात कौटुंबिक विषय मांडण्यात येणार आहेत. या चित्रटात कोण कोणते कलाकार आहेत? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना अजून काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. या चित्रपटाच्या निर्मात्या माधुरी भोसले यांच्या स्क्रीनशॉट्स या संस्थेने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. स्क्रीनशॉट्स ही निर्मिती संस्था याच चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे.
  टीव्ही, ओटीटी आणि अनेक क्षेत्रात स्क्रीशॉर्टस संस्थेने दर्जेदार कलाकृती करत आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. आता ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट 28  जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वाचा : स्वरा भास्कर लवकरच आई होणार ! म्हणते, 'मी आता जास्त वाट पाहू शकत नाही' केदार शिंदे हे महाराष्ट्रातील घराघरात ओळखले जाणारे नाव आहे. शाहीर साबळे हे केदार यांचे आजोबा आहेत. आजोबांचा वसा सांभाळत केदार शिंदे यांनी मराठी नाट्यभूमी, मालिका विश्व आणि सिनेमा क्षेत्र अशा तिन्ही माध्यमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. प्रत्येक कलाकृतीमधून मध्यमवर्गीय, सामान्य माणसाला रिलेट होतील असे विषय केदार शिंदे यांच्याकडून सहज हाताळले जातात. अगदी `अगं बाई अरेच्चा' या गाजलेल्या चित्रपटापासून `सुखी माणसाचा सदरा' या मालिकेपर्यंत मराठी मनांचे मनोरंजन करणार्‍या कार्यक्रमांची केदार शिंदेंनी निर्मिती केली आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published: