KBC : कौन बनेगा करोडपती रात्री 9 ची वेळ चुकली तर 'इथे' पाहा LIVE

KBC : कौन बनेगा करोडपती रात्री 9 ची वेळ चुकली तर 'इथे' पाहा LIVE

KBC : बिग बी अमिताभ बच्चन यांच्यामुळे लोकप्रिय झालेल्या कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाचा 11 वा सीझन सोमवारपासून सुरू होत आहे. पहिल्या एपिसोडबद्दल कमालीची उत्सुकता आहे.

  • Share this:

मुंबई, 19 ऑगस्ट : बिग बी अमिताभ बच्चन यांच्यामुळे लोकप्रिय झालेल्या KBC अर्थात Kaun Banega Crorepati या कार्यक्रमाचा 11 वा सीझन सोमवारपासून सुरू होत आहे.पहिल्या एपिसोडबद्दल कमालीची उत्सुकता आहे. पण काही कारणाने तुम्हाला हा कार्यक्रम पाहायचा आहे आणि त्या वेळी टीव्हीसमोर बसणं शक्य नाही, तर आता तुमच्या हातातल्या मोबाईलवरही KBC दिसू शकणार आहे. त्यासाठी तुमच्या मोबाईलवर कुठलं अॅप असणं आवश्यक आहे आणि ते कसं डाउनलोड करायचं ते खाली वाचा..

कौन बनेगा करोडपतीचे ताजे एपिसोड बघायचे असतील तर सोनी टीव्हीवर रात्री 9 वाजता ते बघावे लागतील आणि मोबाईलवर बघायचे असतील तर सोनी लाइव्ह किंवा जिओ टीव्ही ही अॅप मोबाईलवर डाउनलोड करावी लागतील. एकदा ही अॅप डाऊनलोड करून लॉग इन केलं की हा कार्यक्रम टीव्हीवर पाहायची गरज नाही. आरामात कधीही, कुठेही हा शो तुम्ही पाहू शकाल.

हे वाचा TRP Meter : 'या' मालिकेची नव्यानं एंट्री, पाहा आठवड्यात कोण आहे टॉपवर

3 जुलै 2000 रोजी कौन बनेगा करोडपती या रिअॅलिटी शोचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता. परकीय शोवरून प्रेरित होऊन अस्सल देशी ढंगाने तो पेश करणाऱ्या अमिताभ बच्चन यांच्यामुळे KBC सादर केलं आणि ते लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलं. आता मोठ्या गॅपनंतर येणाऱ्या 11 व्या सीझनबद्दल उत्सुकता आहे.

कसं डाउनलोड करायचं अॅप?

सोनीचं अॅप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी प्ले स्टोअरमध्ये Sonyliv app डाउनलोड करा.

हे वाचा Mission Mangal टीमचा अंतरिक्ष ते अंताक्षरी पर्यंतचा प्रवास, पाहा UNSEEN VIDEO

याशिवाय Sonyliv.com या वेबसाईटवर लॉगइन करून Sonyliv ची प्रीमियम सर्व्हिस घेतली तरी तुम्हाला हा शो आणि सोनीवरचे इतरही कार्यक्रम बघता येतील. तुम्ही Jio चे युजर असाल तर Jio टीव्हीवरही KBC बघता येईल. Airtel ची सर्व्हिस घेत असाल तर Airtel TV अॅप डाउनलोड करूनदेखील तुम्हाला KBC चा एपिसोड पाहता येईल.

सोनीची प्रीमियम सर्व्हिस घेण्यासाठी 199 रुपये मोजावे लागतील. यामध्ये 6 महिने तुम्ही हे चॅनल बघू शकता. एक महिन्यासाठी ही सेवा घ्यायची असेल तर 99 रुपयात काम होईल. वर्षभरासाठी Sonyliv premium घ्यायचं असेल तर 449 एवढा दर द्यावा लागेल.

पहिल्या एपिसोडमध्ये कोण?

पहिल्या एपिसोडमध्ये म्हणजे सोमवारी 19 ऑगस्टला रायपूरची एक महिला डॉक्टर अमिताभ बच्चन यांच्यासमोर हॉट सीटवर बसणार आहे. या डॉक्टरचं नाव चित्रलेखा राठौड असं आहे आणि त्या रायपूरच्या राहणाऱ्या आहेत. एका मॅगझीनसाठी मुलाखत देताना त्यांनी या एपिसोडचा सर्वांत मनोरंजक भाग कुठला याचं उत्तर दिलं.

हे वाचा  Sacred Games 2 झाला ऑनलाइन लीक

अमिताभ बच्चन बरोबर नृत्य करण्याची संधी त्यांना मिळाली. पण अमिताभनी डॉ. चित्रलेखा यांची तिथेही फिरकी घेतली. "जरा मंच का भी ध्यान रखें. इतना तेज डान्स करेंगी तो यह टूट जाएगा.' असं अमिताभ म्हणाल्याचं चित्रलेखा राठोड यांनी सांगितलं.

SPECIAL REPORT : काय आहे कोहिनूर मिल प्रकरण, राज यांना का बजावली नोटीस?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 19, 2019 08:01 PM IST

ताज्या बातम्या