KBC 11 : चरणा गुप्ता यांना 1 कोटींच्या प्रश्नासाठी दिलेल्या पर्यायात चूक

KBC 11 : चरणा गुप्ता यांना 1 कोटींच्या प्रश्नासाठी दिलेल्या पर्यायात चूक

KBC सीझन 11 मध्ये 1 कोटीच्या प्रश्नावर येऊन अडकलेल्या चरणा गुप्ता यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर देता येत नसल्यानं खेळ सोडला.

  • Share this:

मुंबई, 27 ऑगस्ट : ‘कौन बनेगा करोडपती’च्या 11 व्या सीझनमध्ये अमिताभ बच्चन यांनी सोमवारी (26 ऑगस्ट) पहिल्यांदा 1 कोटी रुपयांसाठी प्रश्न विचारला. यावेळी हॉट सीटवर बसलेल्या मध्य प्रदेशच्या लेबर इन्पेक्टर चरणा गुप्ता यांनी हा खेळ सोडला. त्या एक कोटीसाठी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देण्यास असमर्थता दाखवली. मात्र या प्रश्न आणि उत्तरामध्ये चराणाच गुप्ता यांच्या असमर्थतेसोबतच KBC नं दिलेल्या पर्यायांमध्येही चूक असल्याचं लक्षात आलं.

KBC च्या 11 व्या सीझनमध्ये चरणा गुप्ता इतिहास आणि सम-सामायिक विषयांवरील प्रश्नांची बेधकपणे उत्तरं देताना दिसली. त्यांनी चांद्रयान 2 आणि बॉम्बे, कोलकाता, मद्रास या विद्यापीठाची स्थापना कोणत्या गवर्नर जनरलच्या काळात झाली होती? अशा प्रश्नांची बरोबर उत्तरं दिली. मात्र त्या 1 कोटीच्या प्रश्नावर येऊन अडकल्या.

(वाचा : विद्या बालन म्हणाली, 'दिग्दर्शक मला एकटीला रूममध्ये घेऊन गेला आणि...)

1 कोटींसाठीचा प्रश्न

1944मध्ये कंगला टोंगबीची लढाई सध्याच्या कोणत्या राजधानी शहराच्या जवळपास झाली होती?

A. ईटानगर

B. इंफाळ

C. गुहावटी

D. कोहिमा

KBC नं दिलेले हे पर्याय काळजीपूर्वक पाहा. यात गुहावटीला राजधानी म्हणण्यात आलं आहे. मात्र गुहावटी आतापर्यंत कोणत्याही राज्याची राजधानी नाही आहे. पण KBC नं गुहावटीचा समावेश आसामची राजधानी म्हणून केला होता. आसामची राजधानी दिसपूर आहे.

(वाचा : प्रेग्नंट अॅमी जॅक्सनने प्रियकरासोबत पूलमध्ये केलं एन्जॉय, PHOTOS VIRA)

गुहावटी व्यतिरिक्त इतर पर्यायांमध्ये ईटानगर, अरुणाचल प्रदेशची राजधानी आहे. इंफाळ, मणिपूरची राजधानी आहे तर कोहिमा ही नागालँडची राजधानी आहे. प्रश्नामध्ये सध्याच्या कोणत्या राजधानीच्या जवळ ही लढाई झाली होती असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यात 3 सध्याच्या राजधानी आहेत. तर चौथ शहर हे राजधानी सारखी जागा आहे. मात्र या प्रश्नाचं बरोबर उत्तर हे ‘इंफाळ, मणिपूर’ असं होतं.

(वाचा : 'काही दिवसांनी तर तुला लग्नच करायचं आहे', शाहरुखच्या मुलीला मिळाला अजब सल्ला!)

KBC यावर बचाव करु शकते की, प्रश्नाचं उत्तर हे चुकीचं नव्हतं आणि यामध्ये कोणत्याही राज्याचा उल्लेख करण्यात आला नव्हता. मात्र हा बचावही चुकीचा ठरू शकतो. कारण जर तुम्ही राजधानी बद्दल विचारत असाल आणि त्यात क पर्याय सोडून बाकी सर्व शहरं राजधानी असतील तर मग यामुळे प्रश्नाच्या आशयावर फरक पडतो. पण KBC चे प्रश्न हे असेच संभ्रमात टाकणारे असतात आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर हे गुहावटी नसल्यानं KBCकडे आपल्या बचावाची संधी आहे.

======================================================================

ट्रम्प यांनी घेतली फिरकी, मोदींनी दिली सॉलिड टाळी, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 27, 2019 09:42 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading