मृत म्हणून कचऱ्यात फेकलेली 'ती' आज बिग बींच्या समोर हॉट सीटवर बसून खेळतेय KBC

मृत म्हणून कचऱ्यात फेकलेली 'ती' आज बिग बींच्या समोर हॉट सीटवर बसून खेळतेय KBC

नुपूर आधाराशिवाय चालू शकत नाही. तिच्या शरीरात अनेक समस्या आहेत.

  • Share this:

मुंबई, 23 ऑगस्ट : टीव्ही शो कौन बनेगा करोडपती सध्या जोरदार चर्चेत आहे. नुकताच या शोचा 11 वा सीझन सुरू झाला. काल 22 ऑगस्टला झालेल्या एपिसोडमध्ये अमिताभ बच्चन यांच्या सामोर हॉट सीटवर उत्तर प्रदेशची ट्यूशन टीचर नूपुर चौहान बसली होती. नुपूरला हॉट सीट पर्यंत आणण्यासाठी खुद्द अमिताभ बच्चन पुढे आले. कारण नुपूर आधाराशिवाय चालू शकत नाही. तिच्या शरीरात अनेक समस्या आहेत. तिच्या जन्मानंतर डॉक्टरांच्या चुकीमुळे तिच्या शरीराची ही अवस्था झाली आहे.

नुपूरनं KBC च्या मंचावरून जगभरातल्या डॉक्टर्सना जे अपील केलं ते पाहिल्यावर सर्वांच्याच डोळ्यात पाणी तरळलं. नुपूर म्हणाली, ‘तुमच्यासाठी तुमची ही एक चूक भले छोटीशी चूक असते मात्र ती कोणाच्यातरी संपूर्ण आयुष्याचा प्रश्न होऊन जातो.’ यामागचं कारण असं होतं की, नूपुरच्या जन्माच्या वेळी डॉक्टर्सनी तिला मृत घोषित करत हॉस्पिटलच्या कचऱ्याच्या डब्यात फेकून दिलं होतं.

कचऱ्यातून आला बाळाच्या रडण्याचा आवाज

जन्मानंतर मृत म्हणून कचऱ्यात फेकण्यात आल्यानंतर काही वेळानं त्या कचऱ्यातून लहान बाळाच्या रडण्याचा आवाज आला. त्यानंतर घाईघाईनं नूपुरच्या उपचारांना सुरुवात झाली. मात्र तोपर्यंत तिला अनेक व्यंगांनी घेरलं होतं. या भयानक घटनेतून नूपुरचा जीव तर वाचला मात्र तिच्या शरीराची डावी बाजू पूर्णपणे संवेदनाहीन झाली. हे सर्व एवढ्या वरच थांबलं नाही. उत्तर प्रदेशच्या उन्नाव जिल्ह्यातील कपूरपूर गावात राहणाऱ्या नूपुरच्या उपचारा दरम्यान वापरण्यात आलेल्या चुकीच्या सर्जिकल उपकरणांमुळे तिच्या शरीराचा कमरेच्या खालचा भाग रक्त पुरवठा थांबल्यानं काम करेनासं झालं आणि तिला कायमस्वरूपी अपंगत्व आलं.

वाचा : प्रदर्शनाआधीच Saaho नं उडवली प्रभासची झोप, वाचा काय आहे नेमकं कारण

ट्यूशन टीचर आहे नूपुर

अपंग असूनही नूपुर तिची स्वतःची सर्व कामं स्वतः करते. तिनं आतापर्यंत व्हिलचेअरचा वापर कधीही केलेला नाही. व्हिल चेअर वापरल्यानं आपण आजारी आहेत असं वाटतं असल्याचं नूपुर सांगते. नूपुर म्हणते, आपल्या आयुष्यात काही वेळा अशा परिस्थिती येत ज्या ठिकाणी आपण हरतो. पण हरल्यानंतर प्रत्येकवेळी माझ्यामध्ये एक नवी उर्जा तयार होते. मला लढण्याची एक वेगळीच शक्ती मिळते.

वाचा : सोनम कपूरने धारण केलेल्या 'या' नव्या अवतारानं उत्सुकता वाढली

आतापर्यंत सर्वात पुढे पोहोचणारी स्पर्धक बनली नूपुर

पुढील भागाच्या टीझरच्या व्हिडीओमध्ये, अमिताभ बच्चन नूपुरला 25 लाखांपेक्षा जास्त रुपयांसाठी प्रश्न विचारताना दिसत आहेत. आतापर्यंत KBC चा एकही स्पर्धक 12 लाखांच्या प्रश्नापुढे गेलेला नाही. मात्र नूपुरन हा टप्पा पार केला आहे. नूपुर सध्या एका शिक्षण संस्थेत इंटर्नशिप करत आहे. ही संस्था शिक्षण क्षेत्रातील डिजिटलायझेशनला प्रोत्साहन देते. याशिवाय नूपुर स्वतः काही मुलांचे ट्यूशन घेते.

वाचा : नशीबाचा खेळ! स्टेशनवर गाणाऱ्या रानूनं हिमेश रेशमियासोबत रेकॉर्ड केलं पहिलं गाणं

===========================================================================

300 फूट खोल सप्तकुंड धबधब्यात पडला पर्यटक; रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक VIDEO

First Published: Aug 23, 2019 12:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading