KBC-11 : आभार मानण्याऐवजी स्पर्धकानं घातला एक्सपर्टशी वाद, वाचा नेमकं काय झालं

KBC-11 : आभार मानण्याऐवजी स्पर्धकानं घातला एक्सपर्टशी वाद, वाचा नेमकं काय झालं

प्रश्नाचं अचुक उत्तर मिळाल्यानंतरही आशिष सिंह यांनी एक्सपर्टचे आभार मानण्याऐवजी त्यांच्याशी वाद घालायला सुरुवात केली.

  • Share this:

मुंबई, 03 ऑक्टोबर : कौन बनेगा करोडपतीच्या 11 व्या सीझनमध्ये गांधी जयंती आणि लाल बहादुर शास्त्री जयंतीला गांधीजींच्या विचारांना मानणारे डॉ. बिंदेश्वर पाठक आणि इंदौरला देशातील सर्वाधिक स्वच्छा शहर बनवणारे नगर निगम कमिशनर आशिष सिंह हॉट सीटवर बसले होते. या दिवशी प्रसरित केलेला हा एक खास शो होता. त्यासाठी मंगळवारी नियमित प्रसारित केला जाणारा एपिसोड पुढे ढकलण्यात आला. त्यामुळे आता मंगळावारचा रोल-ओव्हर स्पर्धक अभिषेक झा ला आता गुरुवारी संधी मिळणार आहे.

गांधी जयंतीच्या दिवशी प्रसारित केलेल्या या एपिसोडमध्ये एक वेळ अशी आली की हे दोन्ही स्पर्धक एका सोप्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकले नाही. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी त्यांना एक्सपर्ट प्रसिद्ध टीव्ही अँकर रोहित सरदाना यांची मदत घ्यावी लागली. पण या प्रश्नाचं उत्तर सांगताना रोहित यांनी कमिशनर आशिष सिंह यांना टोमणा सुद्धा मारला.

KBC मध्ये जिंकले 1 कोटी, आता निवडणूक आयोगाने केलं अ‍ॅम्बेसिडर

रोहित म्हणाले, मला वाटलं की आशिषजींनी चंद्रकांता मालिका पाहिली असेल कारण माझ्या आणि त्यांच्या वयात जास्त काही अंतर नाही. यामुळे या प्रश्नाचं अचुक उत्तर मिळाल्यानंतरही एक्सपर्टचे आभार मानण्याऐवजी आशिष यांनी रोहित सरदाना यांच्याशी वाद घालायला सुरुवात केली.

हा होता प्रश्न

प्रश्न : उपन्यास चंद्रकांता कोणत्या भाषेत लिहिण्यात आला आहे?

उत्तर : हिंदी

VIDEO VIRAL: प्रियांकाची अभिनेत्याला ऑफर; 2 कोटी की हॉट गर्ल्ससोबत हॉलीडे ट्रिप!

या प्रश्नासाठी डॉ. बिंदेश्वर पाठक आणि कमिशनर आशिष सिंह लाइफलाइन वापरावी लागली. कमिशनर आशिष सिंह यांनी इंदोरला स्वच्छ शहर बनवण्यासाठी खूप परिश्रम घेतले आहेत. मागच्या 3 वर्षांपासून या शहराला स्वच्छ शहराचा पुरस्कार मिळत आहे. हा खेळ संपल्यावर आशिष यांनी बिंदेश्वर पाठक यांनी जिंकलेली रक्कम इंदोर शहराच्या विकासासाठी देण्याची विनंती केला.  'कौन बनेगा करोडपती'च्या मंचावर आशिष सिंह यांनी इंदोरला स्वच्छ शहर बनवताना त्यांना आलेला अनुभव शेअर केला.

कोण आहे ही 'Yoga Girl' ? मलायका अरोरा सुद्धा तिच्या फिटनेसची दिवानी

==============================================================

आम्हालाही भावना आहे? मेधा कुलकर्णींचं भावुक UNCUT भाषण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 3, 2019 08:53 AM IST

ताज्या बातम्या