Home /News /entertainment /

सुभाषचंद्र बोस या राज्याचे उपमुख्यमंत्री होते? KBC मध्ये विचारला चक्रावून टाकणारा प्रश्न

सुभाषचंद्र बोस या राज्याचे उपमुख्यमंत्री होते? KBC मध्ये विचारला चक्रावून टाकणारा प्रश्न

'कौन बनेगा करोडपती' (KBC) हा रिअॅलिटी शो पुन्हा एकदा सुरू झाला आहे. या वेळी विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाने सगळेच चक्रावून गेले होते. पी. सुभाष चंद्र बोस (P. Subhash Chandra Bose) कोणत्या राज्याचे उपमुख्यमंत्री होते, असा प्रश्न बिग बी अमिताभ बच्चन यांनी विचारला.

पुढे वाचा ...
  मुंबई, 30 सप्टेंबर : 'कौन बनेगा करोडपती' (KBC) हा रिअॅलिटी शो पुन्हा एकदा सुरू झाला आहे. या वेळी विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाने सगळेच चक्रावून गेले होते. पी. सुभाष चंद्र बोस (P. Subhash Chandra Bose) कोणत्या राज्याचे उपमुख्यमंत्री होते, असा प्रश्न बिग बी अमिताभ बच्चन यांनी विचारला. पण सुभाष चंद्र बोस यांचं नाव आल्यामुळे थोडं विचित्र वाटलं ना? हा प्रश्न ज्या स्पर्धकाला विचारला गेला तो आणि टीव्हीवर कार्यक्रम पाहणारे सगळेच बुचकळ्यात पडले. पण हे पी. सुभाष चंद्र बोस वेगळे असून त्यांचा भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील नेते सुभाषचंद्र बोस यांच्याशी काहीही संबंध नाही. हे समजल्यानंतर यामध्ये मेकर्सची काहीही चूक नाही हे लक्षात आले. पी. सुभाष चंद्र बोस आंध्र प्रदेशचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. कोण आहेत हे पी. सुभाषचंद्र बोस? पी. सुभाष चंद्र बोस हे गेल्यावर्षी आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री होते. ते राज्यसभेचे सदस्य आहेत. 2019 मध्ये आंध्र प्रदेशमध्ये वायएसआर काँग्रेस सत्तेमध्ये आल्यानंतर जगनमोहन यांनी पाच उपमुख्यमंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला होता. त्यापैकी एक उपमुख्यमंत्री म्हणून पी. सुभाष चंद्र बोस यांची निवड करण्यात आली होती. मात्र त्यानंतर 2020 मध्ये त्यांना पक्षाने राज्यसभेवर पाठवलं. पी. सुभाष चंद्र बोस
  पी. सुभाष चंद्र बोस
  (हे वाचा-Taarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह) आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांचे विश्वासू साथीदार म्हणून देखील त्यांची ओळख आहे. त्याचबरोबर जगनमोहन रेड्डी आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वायएसआर रेड्डी यांच्याबरोबरदेखील त्यांचे अतिशय जवळचे संबंध होते. त्यांच्या मंत्रिमंडळात देखील पी. सुभाष चंद्र बोस हे दोन वेळा मंत्री होते. (हे वाचा-मुंबई पोलिसांचे अनुराग कश्यपला समन, #metoo प्रकरणात उद्या होणार चौकशी) याआधी ते कोनिजेती रोसैया सरकारमध्ये देखील मंत्री होते. ते रामाचंद्रपुरम या विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. जगनमोहन यांनी वायएसआर काँग्रेस हा स्वतंत्र पक्ष काढल्यानंतर त्यांनी त्यामध्ये जाण्याचा निर्णय घेतला. कौन बनेगा करोडपती सुरू झाल्यामुळे प्रेक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण कोरोनाच्या या संकटानंतर विविध मालिका आणि चित्रपटांचं चित्रीकरण सुरू झालं आहे.  अमिताभ बच्चन यांच्या 'कौन बनेगा करोडपती'चं देखील चित्रीकरण सुरु झालं आहे. त्यानंतर आता हा शो ऑन-एअर आला असून प्रेक्षक तो आवडीने पाहत आहेत. प्रेक्षकांच्या आवडीचा हा कार्यक्रम असल्याने प्रेक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published:

  Tags: Amitabh Bachchan, Television, Television show

  पुढील बातम्या