मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

KBC10 : असामान्य व्यक्तिमत्त्वांचा सहवास लाभणं हा माझा सन्मान - बिग बी

KBC10 : असामान्य व्यक्तिमत्त्वांचा सहवास लाभणं हा माझा सन्मान - बिग बी

याच एपिसोडमध्ये डाॅ. प्रकाश आमटे आणि मंदाताई आमटेही सामील झाल्यात.

याच एपिसोडमध्ये डाॅ. प्रकाश आमटे आणि मंदाताई आमटेही सामील झाल्यात.

आपल्या प्रत्येक गोष्टीची माहिती ते ट्विट करून देतात. अशाच दोन महान व्यक्ती शोमध्ये आल्या असल्याची माहिती त्यांनी दिली.

मुंबई, 22 आॅगस्ट : येत्या 3 सप्टेंबरपासून अमिताभ बच्चन यांचा सर्वात लोकप्रिय शो कौन बनेगा करोडपती सुरू होतोय. या शोमध्ये सर्वसामान्यांबरोबर दिग्गजही येत असतात. कधी बाॅलिवूड स्टार तर कधी सामाजिक कार्य करणाऱ्या महान व्यक्ती. बिग बी सोशल मीडियावर नेहमीच कार्यरत असतात. आपल्या प्रत्येक गोष्टीची माहिती ते ट्विट करून देतात. अशाच दोन महान व्यक्ती शोमध्ये आल्या असल्याची माहिती त्यांनी दिली.

'कौन बनेगा करोडपती'च्या या सीझनमध्ये समाजसेवक डॉ. प्रकाश बाबा आमटे आणि डॉ. मंदाकिनी प्रकाश आमटे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. या दोघांबाबत ट्विटरवर लिहिताना बिग बींनी म्हटलंय, 'डॉ. प्रकाश बाबा आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे या दोन असामान्य व्यक्तिमत्त्वांचा सहवास लाभणं ही सन्मानाची बाब आहे. या दोघांचं आयुष्य आणि त्यांनी आदिवासी समाजासाठी केलेले कार्य प्रेरणादायी आहे.'

हा एपिसोड 7 सप्टेंबरला पाहायला मिळणार आहे. केबीसीचा दहावा सीझन 3 सप्टेंबरपासून सुरू होतोय.

देवियो और सज्जनो... हा आवाज पुन्हा एकदा ऐकायला मिळणार आहे. कौन बनेगा करोडपतीचा 10वा सिझन लवकरच सुरू होणार आहे. आणि त्याचा प्रोमो रिलीज झालाय. यात आपल्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च करण्यासाठी वडील जीवाचं रान करतात. अमिताभ त्यांना विचारतात, या शोमध्ये हरलात तर काय? त्यावर ते उत्तर देतात, तरीही लढणार. मग अमिताभ बच्चन म्हणतात, 'हालात को कोसोगे या हालात को पुछोगे कब तक रोकोगे.' केबीसी सर्वसामान्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देतं.

केबीसीनं नेहमीच प्रेक्षकांची पसंती मिळवलीय. आणि प्रेक्षकांना अमिताभ बच्चनच होस्ट लागतात. एकदा शाहरूखनं हे काम केलेलं. पण त्यावेळी टीआरपी कमी झालेला. आता पुन्हा एकदा हा 10वा सिझन सुरू होतोय. स्पर्धकांचं तर सोडा, पण बिग बींच्या रोजच्या दर्शनानं प्रेक्षकांना करोडपती झाल्यासारखं वाटतं.

वर्षानुवर्षे बिग बी अमिताभ बच्चन यांच्यामुळे केबीसी शो नव्या उंचीवर पोहचला आहे. बिग बींचा अनोखा अंदाज, शोमध्ये येणारे स्पर्धक, त्यांच्या बिग बींचा संवाद, शोमधून समोर येणाऱ्या विविध भावनिक गोष्टी यामुळे केबीसीने टीआरपीमध्ये अव्वल स्थान मिळवलं. केबीसीपुढे इतर रिअॅलिटी शोची जादू फिकी पडली. यात सलमानच्या बिग बॉस आणि इतर कॉमेडी तसंच सिंगिंग रिअॅलिटी शोचा उल्लेख करावा लागेल.

परळ अग्नितांडव- आग शमली, पण इमारतीत स्मशान शांतता पाहा हा VIDEO

First published:

Tags: Amitabh Bachchan, Big b, KBC, Mandakini amte, Prakash amte, अमिताभ बच्चन, केबीसी10, प्रकाश आमटे, मंदाकिनी आमटे