KBC : सोनाक्षीनंतर आता तापसीही फेल, कुंभमेळ्याशी संबंधित प्रश्नासाठी घेतली लाइफलाइन

KBC : सोनाक्षीनंतर आता तापसीही फेल, कुंभमेळ्याशी संबंधित प्रश्नासाठी घेतली लाइफलाइन

आतापर्यंत बरेच बॉलिवूड कलाकार पौराणिक कथा आणि धर्म ग्रंथावर आधारित प्रश्नांची उत्तर देताना अडखळलेले दिसून आले आहेत.

  • Share this:

मुंबई, 16 नोव्हेंबर : कौन बनेगा करोडपतीच्या 11 व्या सीझनमध्ये नुकत्याच रिलीज झालेल्या कर्मवीर एपिसोडमध्ये एपिसोडमध्ये समाजसेवक अच्युत सामंत यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांच्या मदतीसाठी अभिनेत्री तापसी पन्नू सुद्धा या ठिकाणी हजर होती. त्यांची वेळ संपेपर्यंत या दोघांनी मिळून12.50 लाख रुपये जिंकले. दरम्यान या खेळात विचारल्या गेलेल्या एका सोप्य प्रश्नांचं उत्तर अभिनेत्री तापसी पन्नूला देता आलं नाही. ज्यामुळे सर्वांनाच अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाची आठवण झाली. अगदी सुरुवातीला सोनाक्षी सुद्धा रामायणासंबंधी  अशाच एका सोप्या प्रश्नावर अडखळली होती. ज्यामुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.

बॉलिवूड कलाकार पौराणिक कथा आणि धर्म ग्रंथावर आधारित प्रश्नांची उत्तर देताना अडखळलेले दिसून येतात. ते अनेकदा अशाप्रकारच्या सोप्या प्रश्नांची उत्तर देऊ शकत नाहीत ज्यामुळे सोशल मीडियावर त्यांना टीकेचा सामना करावा लागतो. KBC च्या सुरुवातीच्या एका एपिसोडमध्ये अशाचप्रकारे अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा रामायणासंबंधित प्रश्नाचं उत्तर देऊ शकली नव्हती. त्यावेळी तिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. त्यानंतर आता तापसी पन्नू कुंभमेळ्यातील कुंभ या शब्दाचा अर्थ काय या प्रश्नाचं उत्तर देण्यात अयशस्वी ठरली.

बॉलिवूड अभिनेत्रीनं चक्क टॉयलेटमध्येच बाळाला केलं ब्रेस्टफीड!

या प्रश्नावर अडकले तापसी आणि डॉ. अच्युत

प्रश्न : कुंभ मेळ्यातील कुंभ या शब्दाचा अर्थ काय आहे.

उत्तर : मडकं (घडा)

डॉ. अच्युत यांना विचारण्यात आलेले अन्य प्रश्न

प्रश्न : मध्ययुगातील शीख योद्ध्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कोणत्या शब्दाचा पारसी अर्थ मगर असा होतो.

उत्तर : निहंग

प्रश्न : पाक्योंग विमानतळ हे कोणत्या राज्यातील पहिलं विमानतळ आहे.

उत्तर : सिक्कीम

अक्षय कुमार गाजवणार 2020? बॉलिवूडनं लावलेत 500 कोटी

प्रश्न : पूर्वी गंगवंशच्या कोणत्या राजानं पुरीच्या जगन्नाथ मंदिराची स्थापना केली होती.

उत्तर : अनंतवर्मन चोडगंग देव

प्रश्न : जीतू राय, रंजन सोढी आणि हीना सिद्धू यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणत्या खेळाचं प्रतिनिधित्व केलं आहे.

उत्तर : नेमबाजी

प्रश्न : व्हिडीओ पाहून मंदिर ओळखा.

उत्तर : मीनाक्षी मंदिर, मदुराई

प्रश्न : क्षेपणास्त्र परीक्षणासाठी वापरला जाणारा डॉ अब्दुल कलाम द्वीप कोणत्या राज्याच्या शेवटच्या वेळीजवळ आहे?

उत्तर : ओडिसा

प्रश्न : यातील कोणती इमारत भारताच्या पहिल्या पंतप्रधनांचं अधिकृत निवासस्थान होती?

उत्तर : तीन मूर्ती भवन

प्रश्न : हे गाणं कोणत्या सिनेमातील आहे? (घूंघरू टूट हे गाणं ऐकवलं गेलं)

उत्तर : वॉर

प्रश्न : यातील कोणत्या स्पर्धेत किंवा मालिकेत क्रिकेटमधील सर्वात छोट्या स्वरुपाचा खेळ खेळला जातो?

उत्तर : IPL

प्रश्न : वाहनांशी संबंधीत दिल्ली सरकारकडून लागू केलेल्या ऑड-इव्हन योजनेतील ऑड इव्हनचा अर्थ काय आहे?

उत्तर : रजिस्ट्रेशन नंबर

प्रश्न : ट्विटरवर वापरल्या जाणाऱ्या युजर नेमला काय म्हणतात?

उत्तर : हॅन्डल

डॉ. अच्युत सामंत हे ओडिसामधील प्रसिद्ध संस्थानं केआयएसएस(KISS)चे संस्थापक आहेत. या संस्थेच्या माध्यमातून ते आदिवासी भागातील अनेक मुलांना मोफत शिक्षण, निवारा आणि जेवण देण्याचं काम मागची अनेक वर्ष करत आहेत. या भागातील मुलांसाठी शिक्षणाची कोणतीही सोय उपलब्ध नाही त्यामुळे तिथल्या मुलांच्या आयुष्यात या संस्थेचं महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

सलमान खानसोबत बॉलिवूड पदार्पण करुनही या अभिनेत्री ठरल्या फ्लॉप!

==========================================================

Special Report : 'ती' परत येतेय... नव्या स्वरूपात आणि नवं तंत्रज्ञान घेऊन

First published: November 16, 2019, 3:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading