KBC चा पहिला करोडपती सध्या काय करतो? 19 वर्षात 'असं' बदललं आयुष्य

KBC चा पहिला करोडपती सध्या काय करतो? 19 वर्षात 'असं' बदललं आयुष्य

फार कमी लोकांना माहीत आहे की या पहिल्या सीझनचा विजेता कोण होता

  • Share this:

मुंबई, 21 ऑगस्ट : ‘कौन बनेगा करोडपती’च्या 11 व्या सीझनची सुरुवात नुकतीच झाली. आतापर्यंत झालेल्या 2 एपिसोडमध्ये 3 स्पर्धकांनी हजेरी लावली असून चौथी स्पर्धक सरोज सिसोदिया हॉट सीटवर आहे. सर्वांनाच माहित आहे की, टीव्ही विश्वातला सर्वात यशस्वी शो 19 वर्षांपूर्वी म्हणजेच 2000 मध्ये सुरु झाला होता. मात्र फार कमी लोकांना माहीत आहे की या पहिल्या सीझनचा विजेता कोण होता आणि काही ठराविक लोकांना माहित असेल तरीही त्यांना हे माहित नसेल की 19 वर्षांनंतर KBC चा पहिला करोडपती सध्या काय करतो.

कोण आहे KBC चा पहिला करोडपती?

KBC चे पहिल्या करोडपतींचं नाव हर्षवर्धन नवाथे आहे. हर्षवर्धन मुंबईतील रहिवासी असून सध्याही ते मुंबईमध्येच राहतात. KBC चा 11 वा सीझन सुरू होण्याआधी न्यूज 18 नं हर्षवर्धन नवाथे यांच्या सध्याच्या आयुष्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. जाणून घ्या कसं 19 वर्षांत कसं बदललं हर्षवर्धन यांचं आयुष्य...

वाचा : Sacred Games-2 मुळे उडाली यूएईतल्या 'या' व्यक्तीची झोप, वाचा कारण

न्यूज18 ला दिलेल्या मुलाखतीत हर्षवर्धन यांनी त्यांच्या सध्याच्या आणि तेव्हाच्या आयुष्याविषयीचे अनेक खुलासे केले. हर्षवर्धन म्हणाले, त्यावेळी शो नवा होता. त्यामुळे या शो बाबत लोकांना खूप उत्सुकता होती. त्यात करून माझं नाव सर्वांपेक्षा वेगळं असल्यानं एकवेळ लोकं मला हर्षवर्धन नवाथे म्हणून आजही ओळखतात . पण 10 वर्षांनंतर माझा चेहरा बदलला त्यानंतर लोकांनी मला ओळखणं कमी झालं. मात्र त्यांना माझं नाव अजूनही माहित आहे.

KBC चे पहिले करोडपती सध्या काय करतात?

हर्षवर्धन नवाथे सध्या महिंद्रा अँड महिंद्राच्या CSR & एथिक्स डिपार्टमेंटमध्ये काम करतात. 2005 पासून या कंपनीत काम करत आहेत. हर्षवर्धन जेव्हा KBC जिंकले त्यावेळी ते विद्यार्थी होते. त्यावेळी ते UPSC ची तयारी करत होते. IAS होऊन देशाची सेवा करण्याचं त्यांचं स्वप्न होतं. मात्र KBC जिंकल्यानंतर त्यांचं आयुष्य खूप बदललं. UPSC च्या परिक्षेवरील त्यांचा फोकस कमी झाला. मात्र त्यांनी त्यांचं स्वप्न बदललं नाही. सध्या कार्पोरेट सेवेत असलेले हर्षवर्धन सामाजिक संस्थांसोबतही काम करतात. प्रत्येक व्यक्तीकडे त्याचा सेकंड प्लान असतो. UPSC मध्ये निवड होईल की नाही याची काहीही शाश्वती नसते. त्यामुळे हर्षवर्धन यांनी MBA करण्याचा विचार केला होता. मात्र त्यावेळी त्यांच्याकडे तेवढे पैसे नव्हते. मात्र KBC जिंकल्यांनंतर त्यांच्याकडे पैसे मिळले ज्यात त्यानी UK ला जाऊन MBA केलं. त्यानंतर काही ठिकाणी काम करून ते पुन्हा मुंबईमध्ये परतले आणि मागच्या 15 वर्षांपासून ते याच ठिकाणी आहेत.

वाचा: स्क्रीनवर फिट दिसणाऱ्या बिग बी यांचं लीव्हर 75 टक्के खराब, TB शी झुंज सुरू

KBC जिंकल्यानंतर हर्षवर्धन यांच्या आयुष्यात अनेक बदल झाले. त्यांना अनेक कार्यक्रम आणि पार्ट्यामध्ये बोलवलं जात असे. तसेच त्यावेळी त्यांना अनेक मॉडेलिंगच्या ऑफर सुद्धा आल्या होत्या. अनेक टीव्ही चॅनेल्स कडून त्यांना कॉन्ट्रॅक्ट बेसवर वेगवेगळ्या ऑफर मिळाल्या होत्या. याशिवाय त्यावेळी त्यांची अभिनेता जॉन अब्राहम आणि क्रिकेटर सलिल अंकोला यांच्याशी मैत्री झाली होती. जॉनसोबत त्यांची मैत्री खूप घट्ट होती. त्यांनी एकत्र काही शो सुद्धा केले. मात्र त्याच्या राहणीमानात खूप फरक असल्यानं हर्षवर्धन यांनी आपला वेगळा मार्ग निवडला.

KBC कडून कसे मिळतात पैसे?

हर्षवर्धन सांगतात, KBCच्या एपिसोडचं शूट अगोदर होतं मात्र ज्यादिवशी तुमचा एपिसोड टेलिकास्ट होतो त्या दिवसाच्या तारखेचा चेक तुम्हाला मिळतो. आता सरळ अकाउंटमध्ये रक्कम ट्रान्सफर केली जाते मात्र त्यावेळी चेक दिला जात असे. तुम्हाला मिळेलेल्या रक्कमेवरील टॅक्स कापून मग उरलेली रक्कम तुमच्या अकाउंटमध्ये जमा होते. आताच्या आणि तेव्हाच्या KBC मध्ये काय फरक आहे असा प्रश्न विचारल्यावर हर्षवर्धन सांगतात, ‘आता 19 वर्ष झाली. त्यावेळी KBC स्टार वर टेलिकास्ट होत असे आता सोनी वर केला जातो. त्यामुळे चॅनेलच्या हिशोबाने काही बदल झाले. सुरुवातीला सामान्य लोकांमधून स्पर्धकांची निवड होत असे. त्यानंर रुरल इंडियावर फोकस करण्यात आलं. ज्यात गावातील लोकांनाही सामावून घेण्यात आलं होतं. तर शाहरुख खान होस्ट करत असताना त्यांचा युथवर जास्त फोकस होता.’

वाचा : 'इतिहास हमसे लिखा जाएगा...' एकदा Sye Raa Narasimha Reddy चा टीझर पाहाच

========================================================================

VIDEO: हिना पांचाळला आता हिंदी बिग बॉसचे वेध? पाहा EXCLUSIVE मुलाखत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 21, 2019 01:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading