बिग बी अमिताभ बच्चन यांना झालाय 'हा' गंभीर आजार, KBC-11 मध्ये केला खुलासा

बिग बी अमिताभ बच्चन यांना झालाय 'हा' गंभीर आजार, KBC-11 मध्ये केला खुलासा

केबीसी-11च्या गुरुवारी प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या आयुष्यातील काही धक्कादायक खुलासे केले.

  • Share this:

मुंबई, 30 ऑक्टोबर : 'कौन बनगा करोडपती'चा 11 वा सीझन हळूहळू अधिकाधिक लोकप्रिय होत आहे. सध्या घरातघरात पोहचलेला हा शो आता अनेक प्रकारच्या माहितीचा स्रोत बनला आहे.काही दिवसांपूर्वी प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये 66 वर्षीय स्पर्धक अनिल जोशी यांच्याशी बोलताना अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या आयुष्यातील काही खुलासे केले. यावेळी बिग बींनी ते सध्या एका गंभीर आजाराशी झगडत असल्याचंही स्पष्ट केलं.

अमिताभ बच्चन हे आता 77 वर्षांचे आहेत. केबीसीमध्ये बोलताना, या वयात त्यांंना अनेकदा मेमरी लॉस होत असल्याचा खुलासा अमिताभ यांनी केला आहे. अमिताभ सांगतात, 'अनेकदा मी माझ्या रूममध्ये जातो आणि अचानक मी विसरून जातो की मी तिथे का आलो आहे. खरं तर मी काही तरी घेण्यासाठी घरात जातो. मग मी पुन्हा रूमच्या बाहेर जाऊन पत्नी किंवा घरातील इतर सदस्यांना विचारतो कि, मी रूममध्ये का गेलो होतो आणि अर्थातच इतर लोकांना याबद्दल काही माहिती नसते.'

अभिनंदन! ग्लॅमरपासून दूर असलेल्या या 'स्टार किड'नं घातली देशाच्या सन्मानात भर

अमिताभ पुढे म्हणाले, 'अनेकदा माझ्या हाताची बोट सुद्धा नीट काम करत नाहीत. माझा हात सतत थरथरत असतो. अनेकदा सही करत असताना माझे हात थरथरतात आणि मला सही करणंही कठीण जातं.' अमिताभ यांनी शोच्या सुरुवातीलाच सांगितलं होतं की त्यांच्या हाताच्या मासंपेशी तुटल्यामुळे त्यांचा एक हात आता व्यवस्थित काम करत नाही. त्यांचा हात आता त्यांना व्यवस्थित वर उचलताही येत नाही.

Marjaavaan Trailer : 'कमिनेपन की हाइट... 3 फुट' रितेश देशमुखचा नवा व्हिलन अवतार

याशिवाय अमिताभ यांना हेपेटायटिस आणि टीबी याविषयी चर्चा केली होती. त्यांनी सांगितलं की, 'कुली' सिनेमाच्या  शूटिंगच्या वेळी मला दुखापत झाली होती. त्यावेळी जवळपास 200 लोकांनी त्यांना रक्त दिलं होतं. त्यावेळी 'हेपेटायटिस बी'ची समस्या असलेल्या एका व्यक्तीनं दिलेल्या रक्तामुळे अमिताभ यांचा लिव्हर 75% खराब झाला.

एवढंच नाही तर अमिताभ यांनी हा शो करायला सुरुवात केली त्यावेळी त्यांना टीबी झाला होता. त्यांच्या हाडांमध्ये टीबीची लागण झाली होती मात्र जवळपास 4 वर्षांनंतर त्यांना याबाबत समजलं. तोपर्यंत ते त्याच्या वेदना सहन करत राहिले. कारण त्यांना टीबी झाला आहे हे माहित नव्हतं.

TRP मीटर : कशात रंगलाय प्रेक्षकांचा जीव? या आठवड्यातल्या टॉप 5 मालिका

============================================================

SPECIAL REPORT: शत्रूसोबत दोन हात करणारं भारतीय नौदल आता आणखी बळकट होणार!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 27, 2019 09:43 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading