Home /News /entertainment /

KBC 12 : सनी लेओनी आणि नीतू कपूरबद्दलच्या प्रश्नावर गोंधळली स्पर्धक; एका नावामुळे थेट स्पर्धेबाहेर

KBC 12 : सनी लेओनी आणि नीतू कपूरबद्दलच्या प्रश्नावर गोंधळली स्पर्धक; एका नावामुळे थेट स्पर्धेबाहेर

कौन बनेगा करोडपती (KBC 12) च्या मंगळवारच्या भागात वरकरणी सोप्या वाटणाऱ्या एका बॉलिवूडशी संबंधित प्रश्नावर एक स्पर्धक पुरती गडबडली आणि एका चुकीच्या उत्तराने तिला खेळ सोडून बाहेर पडावं लागलं.

    मुंबई, 09 डिसेंबर: कौन बनेगा करोडपती (KBC 12) च्या मंगळवारच्या भागात वरकरणी सोप्या वाटणाऱ्या एका बॉलिवूडशी संबंधित प्रश्नावर एक स्पर्धक पुरती गडबडली आणि एका चुकीच्या उत्तराने तिला खेळ सोडून बाहेर पडावं लागलं. अमिताभ बच्चन यांच्या सूत्रसंचालनामुळे रंगत असलेला KBC चं 12 वं पर्व जोरदार लोकप्रिय होत आहे. रचना त्रिवेदी (Rachna Trivedi) नावाच्या स्पर्धकाने मंगळवारी सनी लिओनी (Sunny Leone) बद्दल चुकीचं उत्तर दिल्याने तिला खेळ सोडावा लागला. रचना त्रिवेदी गुजरातमाधील (Gujrat) राजकोटची (Rajkot) रहिवासी आहे. रचनाने खेळाला सुरुवात केल्यानंतर 5 प्रश्नांची योग्य उत्तरं दिली. त्यानंतर कालच्या भागात तिने सहाव्या प्रश्नापासून पुढे खेळण्यास सुरुवात केली. यावेळी तिच्याकडे 3 लाईफलाईन देखील शिल्लक होत्या. KBC 12 मध्ये रचना हिला विचारण्यात आलेले  प्रश्न 1) कोणत्या राज्यांची स्थापना एकाच दिवशी झाली होती? याचे बरोबर उत्तर होते -महाराष्ट्र आणि  गुजरात (Maharashtra) (Gujrat) 2) कोणत्या गाण्याचे हे सुरुवातीचे बोल आहेत? यासाठी एक ऑडिओ क्लिप ऐकवण्यात आली होती. याचे बरोबर उत्तर होते- द ब्रेकअप साँग (The Break Up Song) 3) यामधील कोणत्या कवितेमध्ये ॲडम आणि इव्हच्या उत्त्पतीचे वर्णन आहे? याचे बरोबर उत्तर होते-पॅराडाइज लॉस्ट (Paradise Lost) 4) पोपटवर्गीय परिवारातील हा पक्षी ओळखा ? यासाठी एक व्हिडीओ क्लिप दाखवण्यात आली होती. या प्रश्नाचे तिला उत्तर येत नसल्याने तिने 'फ्लिप द क्वश्चन' ही लाईफलाईन वापरली. याचे बरोबर उत्तर होते मकाऊ (Macaw) 5) लाइफलाइन नंतर तिला हा प्रश्न विचारण्यात आला- जानेवारी 2020 मध्ये झालेल्या हेलिकॉप्टर (Helicopter) अपघातात कोणत्या दिग्गज बास्केटबॉल (Basket Ball) खेळाडूचे निधन झाले होते ? या प्रश्नाचं बरोबर उत्तर होते- कोबे ब्रायंट (Kobe Bryant) 6) राष्ट्रीय डेयरी विकास बोर्डाचे मुख्यालय भारत कुठे आहे? याचे बरोबर उत्तर होते- आणंद 7) अभिनेत्री हरनीत कौरला (Harneet Kaur) आपण कोणत्या नावाने ओळखतो? रचनेला 7 वा प्रश्न विचारण्यात आला होता - अभिनेत्री हरनीत कौरला आपण कोणत्या नावाने ओळखतो? या प्रश्नाचं उत्तर  तिने  सनी लिओन असं दिलं. परंतु याचे बरोबर उत्तर होते नीतू कपूर (Neetu Kapoor).रचनाकडे 3 लिफे लाईन असून देखील तिला या एका चुकीच्या उत्तरामुळे खेळ सोडावा लागला आणि केवळ ३ लाख २० हजारावर समाधान मानावे लागले. अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan) या कार्यक्रमात स्पर्धकांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेऊन त्यांना रिलॅक्स करण्याचा प्रयत्न करतात. यावेळी रचना हिने आपल्याला फिरायचा छंद असून आपण आतापर्यंत 12 देश फिरल्याचे सांगितले. तसेच रचना सध्या जर्मनीमध्ये (Germany) बिझनेस मॅनेजर म्हणून काम करते.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Amitabh Bachchan, Bollywood, KBC, Reality show

    पुढील बातम्या