मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

KBC 13 : कोणत्या महिला नेत्यानं शिक्षिका म्हणून सुरू केलेली कारकीर्द; 6 लाखाच्या प्रश्नाचं उत्तर नाही देऊ शकली स्पर्धक

KBC 13 : कोणत्या महिला नेत्यानं शिक्षिका म्हणून सुरू केलेली कारकीर्द; 6 लाखाच्या प्रश्नाचं उत्तर नाही देऊ शकली स्पर्धक

कोणत्या राजकीय नेत्याने (Political Leader) आपली कारकीर्द शाळेतील शिक्षिका म्हणून सुरू केली होती? असा प्रश्न कल्पना सिंह यांना विचारण्यात आला होता.

कोणत्या राजकीय नेत्याने (Political Leader) आपली कारकीर्द शाळेतील शिक्षिका म्हणून सुरू केली होती? असा प्रश्न कल्पना सिंह यांना विचारण्यात आला होता.

कोणत्या राजकीय नेत्याने (Political Leader) आपली कारकीर्द शाळेतील शिक्षिका म्हणून सुरू केली होती? असा प्रश्न कल्पना सिंह यांना विचारण्यात आला होता.

मुंबई 07 सप्टेंबर : सोनी टेलिव्हिजन वाहिनीवर सुरू झालेलं ‘कौन बनेगा करोडपती’ (KBC) या शोचं 13 वं पर्व नेहमीप्रमाणेच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचत आहे. बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आपल्या खास शैलीत याचं सूत्रसंचालन करत आहेत. स्पर्धकांशी संवाद साधण्याची त्यांची शैली, मिश्कील अंदाज, दमदार आवाज, त्याचं रुबाबदार व्यक्तिमत्व यामुळे या सेटवर भारावून गेलेलं वातावरण असतं. सर्वसामान्य ज्ञान आणि माहिती याच्यावर आधारीत या खेळात अनेकदा स्पर्धकांची चांगलीच तारांबळ उडते. अनेकदा आपल्या कार्यक्षेत्राशी निगडीत प्रश्नांचे उत्तरही काही जणांना देता येत नाही आणि चांगल्या टप्प्यात आलेला खेळ सोडावा लागतो. अशावेळी स्पर्धकावरील दडपण दूर करून त्याला चांगला खेळ करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न अमिताभ बच्चन करत असतात. सोमवारी या खेळात सहभागी झालेल्या छत्तीसगडमधील (Chhattisgarh) एका शाळेच्या मुख्याध्यापिका (School Principle) असलेल्या कल्पना सिंह (Kalpana Singh) यांनाही असाच अनुभव घेता आला. आज तक डॉट कॉमनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

'नियमीत सीटी स्कॅन करा' मिलींद सोमण यांच्या सल्ल्यावर भडकले नेटकरी

ऑनलाइन शिक्षण देण्यात राज्यात अव्वल ठरलेल्या शाळेच्या मुख्याध्यापिका असलेल्या कल्पना सिंह यांनी 3 लाख 20 हजार रुपयांच्या प्रश्नाचे अचूक उत्तर देऊन या खेळातला महत्त्वाचा टप्पा पार केला. त्यानंतर 6 लाख 40 हजार रुपयांचा प्रश्न त्यांना विचारण्यात आला, त्याचे उत्तर मात्र त्या देऊ शकल्या नाहीत, त्यामुळे 3 लाख 20 हजार रुपयांची रक्कमच त्यांना जिंकता आली. त्यांना विचारण्यात आलेला प्रश्न असा होता, कोणत्या राजकीय नेत्याने (Political Leader) आपली कारकीर्द शाळेतील शिक्षिका म्हणून सुरू केली होती? आणि उत्तरासाठी पर्याय होते सुषमा स्वराज, मायावती , प्रतिभा पाटील आणि निर्मला सीतारामन. या प्रश्नाचे अचूक उत्तर होते मायावती.

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) माजी मुख्यमंत्री असलेल्या मायावती (Mayawati) यांनी शिक्षिका म्हणून आपली कारकीर्द सुरू केली होती, पण नंतर त्या राजकारणात आल्या. कल्पना सिंह यांना हे उत्तर देता न आल्यानं त्यांना खेळ सोडावा लागला. यातून जिंकलेल्या रकमेचा उपयोग त्या दिव्यांग मुलांसाठी प्राथमिक शाळा सुरू करण्यासाठी करणार आहेत. शाळेतल्या मुलांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या कल्पना यांनी सध्याच्या काळात मुलांना शिकवताना येणाऱ्या अडचणी, त्यावर मात करण्यासाठी केलेले प्रयत्न याची माहिती यावेळी दिली. त्यांच्या कामाची प्रशंसा करत अमिताभ बच्चन यांनी त्यांना त्यांचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

अक्षय कुमारच्या आईची प्रकृती गंभीर; ICU मध्ये दाखल, अभिनेता मुंबईत दाखल

केबीसी-13 मध्ये सर्वसामान्य प्रेक्षकांबरोबर सेलिब्रिटीही हजेरी लावण्यासाठी उत्सुक असतात. अलीकडेच या शोमध्ये क्रिकेटपटू सौरव गांगुली (Saurav Ganguly) आणि वीरेंद्र सेहवाग (Virendra Sehvag) यांनी हजेरी लावली होती. त्यांच्याबरोबरचा खेळ खूपच रंगला होता. आता या शोमध्ये बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) हजेरी लावणार आहे. याचे प्रोमो सध्या प्रसारित केले जात असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

First published: