अमिताभ यांच्या मोबाइलमध्ये 'या' नावानं सेव्ह आहे जया बच्चन यांचा नंबर

अमिताभ यांच्या मोबाइलमध्ये 'या' नावानं सेव्ह आहे जया बच्चन यांचा नंबर

नुकतंच केबीसीमध्ये अमिताभ यांनी त्यांच्या आयुष्यातील एक असा किस्सा शेअर केला जो तुम्ही कधीच ऐकला नसेल.

  • Share this:

मुंबई, 22 ऑक्टोबर : सोनी टीव्ही वरील क्विज शो ‘कौन बनेगा करोडपती’ सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. खेळीमेळीच्या वातावरणात विचारले जाणारे प्रश्न आणि स्पर्धकांनी शेअर केलेले वेगवेगळे अनुभव यामुळेच या शोला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. केबीसीच्या नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये सुमित तडियाल यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी त्याच्या आयुष्यातील एक रंजक किस्सा शेअर केला आणि हा किस्सा ऐकताच अमिताभ यांनीही त्यांच्या आयुष्यातील एक असा किस्सा शेअर केला जो तुम्ही कोणीही ऐकला नसेल.

अमिताभ बच्चन यांनी स्पर्धकाला विचारलं, तुमचं लव्ह मॅरेज झालं आहे का? त्यावर सुमित म्हणाले, माझं लव्ह मॅरेज आहे मात्र ते असं दाखवलं जातं की अरेंज मॅरेज आहे. सुमित पुढे म्हणाले, माझी पत्नी मला सुनिये जी म्हणून बोलवते. त्यामुळे मी माझ्या फोनमध्ये तिचं नावंही असंच सेव्ह केलं आहे. त्यावर अमिताभ म्हणाले की मी सुद्धा माझ्या पत्नीचं नाव जया बच्चनचं शॉर्ट जेबी असं सेव्ह केलं आहे.

SEX आणि इंटीमेसीवर इलियाना डिक्रूझचं बोल्ड विधान, म्हणते हे तर...

 

View this post on Instagram

 

Diwali brightness ever ..

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan) on

सुमित तोडियाल यांच्याबद्दल बोलायचं तर ते पोलिस फोर्समध्ये काम करतात. खरं तर त्यांना पायलट व्हायचं होतं मात्र वाईट संगतीमुळे त्यांचं हे स्वप्न अपूर्ण राहिलं. केबीसीच्या या आठवड्यात सर्व स्पर्धकांना सोन्याचं नाणं आणि ओप्पो रीनो फोन भेट म्हणून दिला जाणार आहेत.

मतदान केंद्रावर अधिकाऱ्यावर भडकल्या जया बच्चन, वाचा नक्की काय झालं

 

View this post on Instagram

 

Proud of you Shweta and all those that put together #mxsworld

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan) on

या गोष्टीसाठी बिग बींनी स्पर्धकाला दिला पाठिंबा

केबीसी स्पर्धक सुमित सांगितलं, घरात चूक कोणाचीही असो माफी मलाच मागावी लागते. त्यावर अमिताभ यांनी सांगितलं ही गोष्ट खरी आहे. चूक पतीची असो वा पत्नीची शेवटी माफी ही पतीलाच मागावी लागते.

Tanaji : अजय-सैफचा First Look आउट, या दिवशी सिनेमा होणार रिलीज

=====================================================

VIDEO: पुण्यात निकालाआधीच राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विजयाचे डोहाळे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 22, 2019 01:58 PM IST

ताज्या बातम्या