काय आहेत 'कौन बनेगा करोडपती 9'ची वैशिष्ट्यं?

काय आहेत 'कौन बनेगा करोडपती 9'ची वैशिष्ट्यं?

दर सिझनप्रमाणेच यावेळीही या खेळात अनेक इंटरेस्टिंग बदल करण्यात आलेत. 28 ऑगस्टपासून केबीसी 9 आपल्या भेटीला येतोय.

  • Share this:

विराज मुळे, मुंबई, 24 आॅगस्ट : 3 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर कौन बनेगा करोडपतीचा नववा सिझन आपल्या भेटीला येतोय. हा नवा सिझन तितक्याच उत्साहात होस्ट करण्यासाठी बिग बी अमिताभ बच्चन सज्ज झालेत. दर सिझनप्रमाणेच यावेळीही या खेळात अनेक इंटरेस्टिंग बदल करण्यात आलेत. 28 ऑगस्टपासून केबीसी 9 आपल्या भेटीला येतोय.

'इन सब सवालों का जबाब देने का वक्त आ गया है' होय कौन बनेगा करोडपतीच्या नवव्या सिझनची हिच टॅगलाईन आहे. यंदा 6 आठवडेच हा सिझन चालणार असून त्यात जेमतेम 30 ते 35 एपिसोड्सचं आपल्याला पहायला मिळतील. यंदा बक्षीसाची रक्कम 5 कोटींवरून 7 कोटींपर्यंत वाढवण्यात आलीय. गेल्या आठ सिझन्स प्रमाणेच हा सिझनही इंटरेस्टींग ठरावा यासाठी त्यात काही महत्त्वाचे बदल करण्यात आलेत.

'कौन बनेगा करोडपती 9'ची वैशिष्ट्यं काय?

- 'फोन अ फ्रेंड'ऐवजी 'व्हिडिओ अ फ्रेंड'द्वारे मित्राला व्हिडिओ कॉल करता येणार

- 'जोडीदार' ही नवी आणि चौथी लाईफलाईन मिळणार

Loading...

- स्पर्धकाला स्वतःसोबत आणखी एका व्यक्तीला सेटवर आणण्याची परवानगी

- उत्तर येत नसेल किंवा खेळातून बाहेर पडायचं असेल तर त्याला विचारता येणार

- 1 कोटी रुपये जिंकल्यानंतर थेट 7 कोटींचा जिओ जॅकपॉट प्रश्न खेळावा लागणार

- जिओ अॅपद्वारे 'प्ले अलाँग'चा वापर करून 'घर बैठे जितो जॅकपॉट'मध्ये सहभागाची संधी

- बक्षिसाची रक्कमही डिजिटली थेट स्पर्धकाच्या खात्यात जमा होणार

- 15 ते 16 प्रश्न एकाच एपिसोडमध्ये विचारून शोचा स्पीड वाढणार

हे सगळे बदल प्रेक्षकांनाही आवडतील असं बिग बींनाही वाटतंय.या नव्या सिझनबद्दलचं त्यांचं मत त्यांनी खास मुहावऱ्याद्वारे सांगितलंय.

स्पर्धकांना करोडपती बनण्याची स्वप्न बिग बी गेले 8 सिझन्स दाखवतायत. मात्र स्वतःच्या आयुष्यात पहिल्यांदा मोठी रक्कम मिळाली तेव्हा त्यांनी नक्की काय केलं ते त्यांच्याच तोंडून ऐकूयात.

केबीसीच्या 17 वर्षांचा प्रवास अमिताभ यांना बरंच काही देऊन गेलाय. त्यांच्या आयष्यातील चढ उतारात याच शोने त्यांना खऱ्या अर्थाने साथ दिली होती. या शोच्या पहिल्याच सिझनच्या वेळी त्यांना शारिरिक व्याधीलाही सामोरं जावं लागलं होतं.

नव्या सिझनमध्ये यावेळी फिल्म इंटीग्रेशनलाही फाटा देण्यात आलाय. त्याशिवाय समाजात बदल घडवणाऱ्या काही खास व्यक्ती यंदा या शोमध्ये आपल्या हॉट सीटवर दिसतील.

थोडक्यात काय तस स्वप्नपूर्तीच्या या खेळात पुन्हा एकदा अमिताभ स्पर्धकांना त्यांची स्वप्न पूर्ण करण्याची एक संधी देतायत. ही संधी अनेकांच्या आयुष्यात नवा प्रकाश आणेल यात काहीही शंका नाही.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 24, 2017 02:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...