मुंबई, 11 ऑक्टोबर : बॉलिवूड मधील शेहंशाह, बिग बी, महानायक अश्या बड्या नावाने ओळखले जाणारे अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना आज 79 वर्षे पूर्ण झाली. अमिताभ बच्चन यांचा 'कौन बनेगा करोडपती' शो सुरु झाला तेव्हापासून त्यांनी प्रेक्षकांच्या मनात अजूनच घर केले. sony Channel Kaun Banega crorepati वरील हा त्यांचा हा शो सर्वांच्या पसंतीचा आहे. यावेळेसही बिग बींनी केबिसिच्या सेटवर आपल्या वाढदिवशी आपली हजेरी लावली. त्यावेळी बिग बींना सर्व स्पर्धकांनी शुभेच्छा तर दिल्याचं पण त्यांना पुन्हा एकदा त्यांच्या चित्रपटातील भूमिकेची आठवण करून दिली.
असा पार पडला केबीसी सेटवर बिग बींचा वाढदिवस
आज 11 ऑक्टोबर ला Amitabh bachchan Birthday यांनी जवळपास 80 गाठली आहे. पण आजही बिग बी तितकेच हँडसम आणि स्टायलिश आहे. अमिताभ आजही आपली चित्रपटातील भूमिका उत्तमरीत्या साकारतात.
नुकताच KBC 13 चा एक भाग शूट करण्यात आला, हा भाग अमिताभ बच्चन Amitabh Bachchan Birthday
Kaun Banega crorepati, यांच्या वाढदिसानिमित्त शुट करण्यात आला. त्यादरम्यान सेटवर उपस्थित सर्व स्पर्धकांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. शिवाय त्यांना चित्रपटातील त्यांनी गाजवलेली पात्र, त्यांचे डायलॉग यांची आठवण करून दिली. त्यावेळेस बिग बीं ना ते दिवस आठवून डोळ्यात अश्रू आले.
View this post on Instagram
चाहत्यांने गायलेल्या गाण्यातून अमिताभ झाले अधिकच भावूक...
येत्या टेलिकास्ट होणाऱ्या भागात अमिताभ बच्चन यांचा सेटवर साजरा झालेला वाढदिवस दाखवण्यात येणार आहे. दरवेळी स्पर्धकाच्या घटनेने भावूक झालेले बिग बी आज स्वत:च्या घटनेबद्दल ऐकताना भावुक झाले. शो मधील उपस्थित एका चाहत्याने Amitabh Bachchan Birthday Special poem अमिताभ बच्चन यांच्यासाठी एक कविता सादर केली, या कवितेत त्या चाहत्याने त्यांच्या कुटुंबापासून ते चित्रपटांतील सुरू झालेला प्रवास दर्शवला गेला आहे.
View this post on Instagram
अमिताभ यांनी देखील चाहत्यांचे आभार मानले...
त्यांचे या शोसोबतचे नाते, त्यांनी मिळवलेली माणसे या सर्वांचे त्यांनी हात जोडून आभार मानले. आजच नाही तर चाहत्यांकडून मिळणाऱ्या प्रेमामुळे मी आज इथपर्यंत पोहचलो. 2000 साली केबीसी सोबत सुरू केलेला हा प्रवास माझ्यासाठी फार मौल्यवान आहे. यामध्ये येणारा एक एक सदस्य त्याच्या आयुष्याचा एक नवा पैलू शिकवून जातो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amitabh Bachchan, Birthday celebration, KBC