मुंबई, 20 नोव्हेंबर: केबीसी 12 मधील गुरुवारचा भाग अत्यंत मनोरंजक होता. आजच्या भागाची सुरुवात कालच्या रोलओव्हर स्पर्धक लक्ष्मी अंकुशराव कवडे यांच्यासोबत झाली. शानदार खेळ करीत महाराष्ट्रातून आलेल्या स्पर्धक लक्ष्मीने केबीसीत 12 लाख 50 हजार रुपये जिंकले. या शो वर तिने शोचे होस्ट अमिताभ बच्चन यांच्याशी बर्याच मजेदार गप्पा देखील मारल्या. लक्ष्मीने सांगितले की ती सरकारी शाळेत महिला शिपायाचं काम करते. तिला शिक्षिका व्हायचं होतं, परंतु योग्य शिक्षण न मिळाल्यामुळे ते शक्य झालं नाही.
अमिताभ बच्चन लक्ष्मीच्या या मेहनतीमुळे खूप प्रभावित झाले होते. त्याचवेळी केबीसीमधील एका प्रश्नादरम्यान अमिताभ बच्चन यांनी एटीएमशी संबंधित एक धक्कादायक खुलासा केला. अमिताभ बच्चन म्हणाले की, त्यांच्याकडे एटीएम कार्ड नाही. एटीएम मशीनमधून पैसे काढायला जाण्याची त्यांना भीती वाटते. ते म्हणाले, 'जर मशीनने कधीतरी कार्ड गिळलं तर? आणि आसपास उभे असलेल्या लोकांना वाटेल की हा चोरी तर करीत नाही ना?' अमिताभ बच्चन यांचे हे बोलणे ऐकून शोमध्ये उपस्थित सर्वजण हसले.
केबीसी मध्ये लक्ष्मीला हे प्रश्न विचारले गेले -
महाराष्ट्रातील प्रसिद्ध 'झुणका' आणि गुजराती खाद्यपदार्थ 'खांडवी' बनवायला खालीलपैकी कोणत्या पदार्थांचा वापर मुख्यतः केले जाते?
या प्रश्नाचे तिने अचूक उत्तर दिलं - बेसन
भगवान शिव यांच्याबरोबर यापैकी कोणती वस्तू असते?
या प्रश्नाचे तिने अचूक उत्तर दिलं - त्रिशूळ आणि डमरू.
बँकेशी संबंधित कोणत्या कामांसाठी एटीएम कार्ड वापरलं जातं?
या प्रश्नाचे तिने अचूक उत्तर दिले - पैसे काढण्यासाठी.
सलमान आणि माधुरीवर चित्रित झालेल्या या लोकप्रिय गाण्याचे पुढील बोल काय आहेत?: देखा हैं पेहली बार…
या प्रश्नाचे तिने अचूक उत्तर दिलं - साजन की आँखों में प्यार
हॉकी सामन्यादरम्यान कोणत्या खेळाडूला त्याच्या पायावर चेंडू स्पर्श करण्याची परवानगी आहे?
या प्रश्नावर लक्ष्मी विचारात पडली आणि तिने व्हिडिओ कॉल अ फ्रेंड या लाइफ लाईनचा वापर केला. यानंतर, या प्रश्नाचे योग्य उत्तर तिनी दिलं - गोलकीपर
सर्वात मोठ्या चार-अंकी संख्येत कोणता अंक जोडून, ती सर्वात लहान पाच-अंकी संख्या होईल?
या प्रश्नाचे तिने अचूक उत्तर दिले - 1
यातील कोणत्या प्राण्याला दात नाहीत?
लक्ष्मी या प्रश्नावर अडकली आणि तिने 50-50 लाईफलाईन वापरली आणि नंतर तिने या प्रश्नाचे योग्य उत्तर दिलं – कासव.
या प्राणायामाचे नाव काय आहे, ज्यामध्ये श्वास बाहेर टाकताना मधमाशीसारखा आवाज येतो?
या प्रश्नाचे तिने अचूक उत्तर दिले - भ्रामरी
रामायणानुसार, राजा दशरथ यांच्या मृत्यूच्या वेळी भरत व शत्रुघ्न कुठे होते?
या प्रश्नावर लक्ष्मी अडकली आणि फ्लिप द क्वेश्चन लाईफलाईन वापरली. यापूर्वी अमिताभ बच्चन यांनी या प्रश्नाचे योग्य उत्तर दिले – मामाकडे केकई देशात.
त्याच वेळी, लाइफ लाइन नंतर आलेला प्रश्न हा होता -
17 व्या लोकसभेत सुप्रिया सुळे कोणत्या मतदारसंघातून निवडून आल्या?
हे वाचा-एकेकाळी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडे डेटनंतर बिल भरण्यासाठीही नव्हते पैसे
या प्रश्नाचे तिने अचूक उत्तर दिले - बारामती
यापैकी कोणत्या महान व्यक्ती आणि त्यांच्या समाधीस्थळाची जोडी बरोबर नाही?
या प्रश्नावर लक्ष्मी अडकली आणि तिने तिची शेवटची लाईफलाईन आस्क दी एक्सपर्ट वापरली. या नंतर तिने योग्य उत्तर दिले- शक्ती स्थल-लाल बहादूर शास्त्री
अपोलो 11 चे लूनर मॉड्यूल चंद्रावर ज्या ठिकाणी उतरवलं गेलं त्या ठिकाणाला कोणत्या नावाने ओळखले जाते?
या प्रश्नाचे तिने अचूक उत्तर दिले - सी ऑफ ट्रैंक्विलिटी
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी संबंधित दीक्षाभूमी कुठे आहे?
या प्रश्नाचे तिने अचूक उत्तर दिले - नागपूर
कोणत्या वेदाला कृष्ण आणि शुक्ल अशा दोन भागात विभाजले गेले आहे?
या प्रश्नावर लक्ष्मीने गेमला क्विट करण्याचा निर्णय घेतला आणि 12 लाख 50 हजार रुपये जिंकल्यानंतर ती घरी गेली. यापूर्वी अमिताभ बच्चन यांनी या प्रश्नाचे योग्य उत्तर सांगितले - यजुर्वेद