Home /News /entertainment /

कोरोनाशी संबंधीत आहे KBC Registration चा पहिला प्रश्न, काय आहे अचूक उत्तर

कोरोनाशी संबंधीत आहे KBC Registration चा पहिला प्रश्न, काय आहे अचूक उत्तर

कौन बनेगा करोडपतीच्या 12 व्या सीझनचं रजिस्ट्रेशन सुरू झालं असून सध्याच्या परिस्थिती पाहता पहिला प्रश्न सुद्धा कोरोना व्हायरसशी संबंधीत आहे.

    मुंबई, 10 मे : सध्या कोरोना व्हायरसनं एकीकडे सर्वाचं जगणं कठिण करून टाकलं आहे. कोरोना व्हायरसचं संक्रमण रोखण्यासाठी सरकारनं देशभरात लॉकडाऊन केलं आहे. ज्यामुळे टीव्हीवरील सर्व शो बंद झाले आहेत. पण सोनी टीव्हीवर लोकप्रिय क्विज शो कौन बनेगा करोडपतीच्या 12 व्या सीझनचं रजिस्ट्रेशन सुरू झालं आहे. 9 मे ला या रजिस्ट्रेशनचा अमिताभ बच्चन यांनी विचारला आहे आणि सध्याच्या परिस्थिती पाहता पहिला प्रश्न सुद्धा कोरोना व्हायरसशी संबंधीत आहे. सोनी टीव्हीच्या ऑफिशिअल अकाऊंटवर केबीसी 12 च्या रजिस्ट्रेशनसाठी अमिताभ बच्चन यांनी विचारलेल्या प्रश्नाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये अमिताभ बच्चन सांगताना दिसत आहेत, आजकाल लोक बरेच प्रश्न विचारताना दिसत आहेत. जसे की, केबीसी यंदाच्या वर्षी येणार की मग सुट्टी. यावर्षी या वर्षी काय ऐकायला मिळणार लॉक किया जाए की, लॉकडाऊन किया जाए. हॉटस्पॉटच्या वातावरणात हॉटसीट पाहायला मिळणार की नाही. हा खेळ या देशातील लोकांच्या भावनांच्या उत्कटतेचे प्रतिक आहे. या सर्वात देश बंद नाही झाला तर मग हा खेळ कसा बंद होणार. यानंतर त्यांनी या सीझनचा पहिला प्रश्न विचारला. कोरोना योद्धे आहेत 'पाठकबाईं'चे आई-वडील; अक्षया देवधरबरोबर दिलखुलास गप्पा रजिस्ट्रेशनसाठी विचारण्यात आलेल्या या पहिल्या प्रश्नचं स्पर्धकांनी देणं बंधनकारक आहे. हा प्रश्न आहे. कोविड-19 म्हणजे कोरोना व्हायरस या रोग 2019 मध्ये पहिल्यांदा कोणत्या शहरात सापडला? यासाठी पर्याय आहेत, A. शेंजो B. वुहान C. बीजिंग D. शंघाई. पहिल्या प्रश्नाचं उत्तर 10 मे रात्री 9 वाजेपर्यंत द्यायचं आहे. ज्यांना केबीसी 12 मध्ये सहभागी व्हायचं आहे ते सर्वजण आपलं उत्तर 509093 या नंबरवर पाठवू शकतात. मेसेजमध्ये केबीसी लिहिल्या नंतर स्पेस देऊन योग्य पर्याय म्हणजे A,B,C किंवा D लिहायचं आहे. याशिवाय या मेसेजमध्ये तुमचं वय, लिंग (Male किंवा Female किंवा O म्हणजे Other)याचाही उल्लेख असावा. केबीसी 12 च्या रजिस्ट्रेशनसाठी विचारण्यात आलेल्या पहिल्या प्रश्नाचं अचूक उत्तर 'B. वुहान' असं आहे. आतापर्यंत केबीसी रजिस्ट्रेशन प्रोमोपासून ते पहिल्या प्रश्नाच्या व्हिडीओ पर्यंतचे सर्व व्हिडीओ अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या घरीच शूट केले आहेत. सलमान खान लवकरच चढणार बोहल्यावर? लग्नाबाबत गर्लफ्रेंड युलिया वंतूर म्हणते...
    Published by:Megha Jethe
    First published:

    Tags: Amitabh Bachchan

    पुढील बातम्या