KBC 12 ची पहिली करोडपती ठरली नाझिया नसीम; 7 कोटींचा जॅकपॉट जिंकणार?

KBC 12 मध्ये एक कोटी रुपयाच्या या प्रश्नावर सर्वांची गाडी अडकत होती मात्र नाझिया नसीमची गाडी पुढे गेली आता ती 7 कोटी रुपयेदेखील आपल्या नावावर करणार का याकडे लक्ष लागलं आहे.

KBC 12 मध्ये एक कोटी रुपयाच्या या प्रश्नावर सर्वांची गाडी अडकत होती मात्र नाझिया नसीमची गाडी पुढे गेली आता ती 7 कोटी रुपयेदेखील आपल्या नावावर करणार का याकडे लक्ष लागलं आहे.

  • Share this:
    मुंबई, 05 नोव्हेंबर : कौन बनेगा करोडपति 12 (kaun banega crorepati) सुरू झाल्यापासून अजूनपर्यंत कुणी एक कोटी रुपये जिंकले नाहीत. केबीसी 12 (KBC 12)  सिझनमध्ये पहिली करडोपती ठरली आहे ती नाजिया नसीम. नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये नाझिया नसीम स्पर्धक सहभागी झाली. तिनं एक कोटी रुपये आपल्या नावावर केले आहेत. एक कोटी रुपयांच्या पंधराव्या प्रश्नापर्यंत अनेक स्पर्धक पोहोचले आहेत. मात्र कुणालाच त्याचं उत्तर देता आलं नाही. मात्र नाझिया नसीम यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं आणि एक कोटी रुपये जिंकून दाखवले आहेत. केबीसी 12 च्या प्रोमोमध्ये नाझिया एक कोटी रुपये जिंकल्याचं दाखवण्यात आलं आहे.
    नाझियाने एक कोटी रुपये जिंकले आहेत. एक कोटी रुपये जिंकल्यानंतर नाझिया खेळ सोडू शकली असती मात्र प्रोमोमध्ये ती खेळ सोडत नसल्याचं दिसतं आहे. कारण अमिताभ तिला सात कोटींचा सोळावा प्रश्न विचारताना दिसत आहेत. नाझियादेखील हे आव्हान स्वीकारते. आपण आयुष्यात अनेक रिस्क घेत आलो आहोत, आता ही रिस्क घेणार, असं ती या प्रोमोत म्हणताना दिसतं. म्हणजेच नाझिया सात कोटी रुपयांच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी सज्ज आहे. या एकाच प्रश्नाचं तिनं योग्य उत्तर दिलं. तर तब्बल सात कोटी रुपयांचा जॅकपॉट तिला लागणार आहे. हे वाचा - No Shave November फॉलो करत आहात?या सेलिब्रिटींच्या दाढीची स्टाइल आहे ट्रेंडमध्ये केबीसी 12 मधील फक्त एक कोटीच नाही तर सात कोटी रुपये जिंकून नाझिया इतिहास रचणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
    Published by:Priya Lad
    First published: