असला नवरा नको गं बाई! KBCच्या स्पर्धकाचं उत्तर ऐकून अमिताभ बच्चन संतापले; म्हणाले...

असला नवरा नको गं बाई! KBCच्या स्पर्धकाचं उत्तर ऐकून अमिताभ बच्चन संतापले; म्हणाले...

KBC मधील एका स्पर्धकाच्या उत्तराने अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan)ही चक्रावून गेले होते. कौन बनेगा करोडपतीच्या सेटवर घडलेला किस्सा एकदा वाचा

  • Share this:

मुंबई, 27 ऑक्टोबर: सोनी टीव्हीवरील लोकप्रिय मालिका 'कौन बनेगा करोडपती'चा 12 वा (Kaun Banega Crorepati 12) सिझन सुरू आहे. भारतातील सर्वाधिक लोकप्रिय आणि  सर्वाज जास्त पाहिला जाणारा टीव्ही शो अशी त्याची ख्याती आहे. या शोसाठी निवेदक अमिताभ बच्चन दररोज 12-15 तास शूटिंग करतात.

बिग बी आपल्या आयुष्यातील काही किस्से आणि गमतीजमती सांगून या कार्यक्रमात रंगत आणतात. ते स्पर्धकांशी संवाद साधतानाच्या त्याच्या आयुष्याबद्दलही जाणून घेतात. नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये मात्र स्पर्धकाच्या उत्तराने बच्चन चक्रावूनच गेले. या स्पर्धकाला अमिताभ बच्चन यांनी प्रश्न विचारला की, "तुम्ही इथून जिंकलेल्या रकमेचं काय करणार" यावर तो म्हणाला, "बायकोच्या चेहऱ्यावर प्लॅस्टिक सर्जरी करून घेणार" हे ऐकून बच्चन यांच्या भुवया उंचावल्या.

मध्य प्रदेशातील कौशलेंद्र सिंह तोमर यांना बच्चन यांनी विचारलं की तुम्ही इथं जिंकलेल्या बक्षिसाच्या रकमेतून काय करणार? कौशलेंद्र म्हणाले, ‘ पहिल्यांदा बायकोच्या चेहऱ्यावर प्लॅस्टिक सर्जरी करून घेणार.’ बच्चन अवाक झाले त्यांनी विचारलं, ‘प्लॅस्टिक सर्जरी पण का?’

त्यावर कौशलेंद्र म्हणाले, ‘15 वर्षं तोच चेहरा पाहून कंटाळलो आहे’ बिग बींनी अगदी नम्रपणे कॅमेराच्या माध्यमातून कौशलेंद्र यांच्या पत्नीशी संवाद साधत कौशलेंद्र यांचं म्हणणं मनावर घेऊ नये अशी विनंती केली. त्यानंतर बच्चन यांनी थोडसं कठोरपणे कौशलेंद्र यांना सुनावलं की त्यांनी अगदी गंमत म्हणूनही परत बायकोसंबंधी असं म्हणू नये.

दरम्यान, अमिताभ बच्चन यांची तब्येत बिघडली असून त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल केलं आहे अशी अफवा पसरली होती. पण त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन याने ही अफवा असल्याचं स्पष्ट करत त्यांची तब्येत  उत्तम असल्याचं सांगितलं आहे.

Published by: Amruta Abhyankar
First published: October 27, 2020, 5:20 PM IST

ताज्या बातम्या