KBC 11 : अमिताभ बच्चन यांना सनबाथ घेताना पाहण्यासाठी फॅनची अजब युक्ती!

KBC 11 : अमिताभ बच्चन यांना सनबाथ घेताना पाहण्यासाठी फॅनची अजब युक्ती!

सध्या सोनी टीव्हीवरील लोकप्रिय शो 'कौन बनेगा करोडपती'चं होस्टिंग करणारे अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या अनेक चाहत्यांचे वेगवेगळे किस्से आपण ऐकले असतील मात्र हा किस्सा थोडासा वेगळा आहे.

  • Share this:

मुंबई, 31 ऑक्टोबर : सोनी टीव्हीवरील सर्वाधिक लोकप्रिय शो कौन बनेगा करोडपती सध्या टीआरपीमध्ये टॉपला पोहोचला आहे. या शोकडे प्रेक्षक फक्त मनोरंजनच नाही तर माहितीचा स्रोत म्हणून पाहतात. या शोमध्ये अनेकदा अमिताभ बच्चन प्रेक्षकांनी आपल्या जीवनातले किस्से आणि गुपितं शेअर करत असतात. पण यासोबतच नेक स्पर्धकही आपल्या आयुष्यातीव वेगवेगळे अनुभव या शोमध्ये शेअर करत असतात. अनेजण या ठिकाणी आपल्या आयुष्यातील कठीण काळातील अनुभाव सांगत असताना भावुक सुद्धा होतात. केबीसीच्या नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये सहभागी झालेली मुंबईची स्पर्धक पायल पुरवेश शाहसेबत असंच काहीसं घडलं.

पायल हा खेळ खूप चांगला खेळली. तिच्या चारही लाइफलाइन संपल्यानंतर तिनं कोणतीही लाइफलाइन न घेता विचारपूर्वक खेळत 12 लाख 50 हजार रुपयांची रक्कम जिंकली. याशिवाय पायलनं तिच्या आयुष्यातील अनुभव शेअर केले आणि मिताभ बच्चन यांच्यासोबत बऱ्याच गप्पाही मारल्या. यावेळी  तिनं सांगितलं की तिचा भाऊ अमिताभ बच्चन यांची खूप मोठा चाहता आहे.

गोव्याच्या 'क्लब्स'मध्ये विकलं जातंय 'या' बोल्ड अभिनेत्रीच्या नावाने ड्रिंक्स

 

View this post on Instagram

 

Was the risk that Payal took worthy enough? Will she be able to give the correct answer? To find out, tune into #KBC11 Mon-Fri at 9 PM. @amitabhbachchan

A post shared by Sony Entertainment Television (@sonytvofficial) on

पायल म्हणाली, ‘सर माझा भाऊ तुमचा खूप मोठा चाहता आहे. इतकंच नाही तर यासाठी त्यानं आपलं नाव बदलून व्हीडीसी (विजय दिनानाथ चौहान) असं केलं आहे. त्यानं तुमच्या बंगल्या जवळ सत्यमूर्ती अपार्टमेंटमध्ये फ्लॅट फक्त एवढ्यासाठी घेतला आहे की तो तिथून तुम्हाला सनबाथ घेताना पाहू शकेल.’ यावर अमिताभ यांनी  पायलला विचारलं, त्याला कसं काय माहित की मी रोज सनबाथ घेतो? अमिताभ यांच्या प्रश्नावर पायल म्हणाली, ‘हे तर मला माहित नाही पण तो तुमचा एवढा मोठा चाहता आहे की त्यानं आपल्या कंपनीचं नावही व्हीडीसी असं ठेवलं आहे. एवढंच नाही तर तो आपल्या पत्नीसाठी जे दागिने बनवतो त्या सर्व दागिन्यांवरही व्हीडीसी लिहिलेलं असतं.’

'दीपिकानं मला घरातून बाहेर काढण्याचा प्लान केला होता', आईचा धक्कादायक खुलासा!

==================================================

VIDEO : ठाण्यात रंगली रेड्याची झुंज, स्पर्धा पाहण्यासाठी लोकांची तोबा गर्दी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 31, 2019 08:51 AM IST

ताज्या बातम्या