मुंबई, 12 नोव्हेंबर : टीव्ही शो कौन बनेगा करोडपती सध्या वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत आहे. सोमवारी प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये हॉट सीटवर बिहारचे अजित कुमार बसले होते. अजित एक जेल अधिक्षक आहेत. पण ते या एपिसोडमध्ये खूपच चतुराईनं खेळताना दिसले. यासोबतच त्यांनी अमिताभ बच्चन यांच्याशी सुद्धा खूप गप्पा मारल्या. अजित कुमार आता 1 कोटीच्या प्रश्नासाठी खेळताना दिसणार आहेत. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अमिताभ बच्चन अजित यांना 1 कोटी रुपयांसाठींचा प्रश्न विचारताना दिसत आहे.
सोनी टीव्हीच्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यात अमिताभ बच्चन 50 लाखानंतर अजित यांना 1 कोटी रुपयांसाठीचा प्रश्न विचारताना दिसत आहेत. हा व्हिडीओ अखेर स्पर्धक या प्रश्नासाठी लाइफलाइन घेतो या ठिकणी येऊन संपतो. या ठिकाणी अजित 50-50 या लाइफलाइनचा वापर करताना दिसतात. पण ते 1 कोटी जिंकले की नाही याबाबत मात्र या प्रोमोमध्ये कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये याविषयीची उत्सुकता अद्याप कायम आहे.
बॉलिवूडची HOT जोडी शिबानी आणि फरहानचं लवकरच 'वाजणार'!
सोमवारी प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये दाखवण्यात आलं की अजित यांनी त्यांच्या वेगवेगळ्या जेलमधील अनुभवांबद्दल अमिताभ बच्चन यांना सांगितलं. त्यांनी नोकरीच्या निमित्तानं वेगवेगळ्या भागात भ्रमण केलं आणि त्यातून त्यांना कळलं की अनेक अपराधी त्यांच्या परिस्थितीमुळे अपराध करतात. मैत्री आणि एखाद्या गोष्टीमुळे मिळालेली प्रेरणा या गुन्ह्यांसाठी कारणीभूत असते. याशिवाय अजित यांनी सांगितलं की आता जेलमध्ये बऱ्याच सुधारणा होत आहेत.
सिद्धार्थ आणि मितालीचे 'रोमँटिक' फोटो व्हायरल
राज ठाकरे यांनी पाहिला 'पानिपत'चा ट्रेलर; म्हणाले, हा सिनेमा...
=======================================================================
SPECIAL REPORT: सत्ता स्थापनेवरुन नेटिझन्सनी शिवसेनेला केलं ट्रोल; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस