छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याबद्दल KBC चा माफीनामा, पाहा VIDEO

नुकत्याच प्रसारित झालेल्या KBC च्या एपिसोडमध्ये अमिताभ यांनी हॉटसीटवर बसलेल्या स्पर्धकाला मुघल सम्राट औरंगजेबसंबंधी प्रश्न विचारला. त्याच्या उत्तराला चार पर्याय देण्यात आले आणि त्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी करण्यात आला.

News18 Lokmat | Updated On: Nov 8, 2019 12:45 PM IST

छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याबद्दल KBC चा माफीनामा, पाहा VIDEO

मुंबई, 08 नोव्हेंबर : अमिताभ बच्चन कौन बनेगा करोडपतीमध्ये त्यांच्या संयत सूत्रसंचालनाच्या शैलीसाठी ओळखले जातात. पण त्यांच्या कार्यक्रमात एका प्रश्नाच्या पर्यायातून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाल्याचा आरोप झाल्याने नवा वाद ओढवला. अमिताभ बच्चन यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला, त्यामुळे त्यांनी माफी मागावी अशी मागणी सोशल मीडियावर जोर धरत होती. यामुळे अमिताभ बच्चन यांना सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना सुद्धा करावा लागला. दरम्यान KBC मेकर्स आणि सोनी टीव्हीनं या प्रकरणी माफी मागितली आहे.

नुकत्याच प्रसारित झालेल्या KBC च्या एपिसोडमध्ये अमिताभ यांनी हॉटसीटवर बसलेल्या स्पर्धकाला मुघल सम्राट औरंगजेबसंबंधी प्रश्न विचारला. त्याच्या उत्तराला चार पर्याय देण्यात आले आणि त्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी करण्यात आला. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वच शिवभक्तांमध्ये नाराजीचा सूर होता आणि बिग बींनी यासाठी माफी मागावी अशी मागणी करण्यात आली होती.

बिग बींच्या प्रकृतीबाबत धक्कादायक माहिती समोर, डॉक्टरांनी दिला 'हा' सल्ला!

सोशल मीडियावरील विरोध पाहता केबीसी मेकर्सनी त्यांच्या आगामी एपिसोडमध्ये याबद्दल माफीचा स्क्रोल चालवला आहे. सोनी टीव्हीच्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम पेजवरून याचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. याला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिलं, 'बुधवारी केबीसीच्या एपिसोडमध्ये अनावधानाने छत्रपति शिवाजी महाराज यांचा एक त्रुटीपूर्ण पर्याय देण्यात आला होता. त्याबद्दल आम्हाला खेद आहे. लोकांच्या भावनांचा विचार करुन आम्ही खेद व्यक्त करत आमच्या आगामी एपिसोडमध्ये माफीचा स्क्रोल चालवला आहे.' त्यामुळे आता केबीसीच्या माफीनाम्यावर लोकांच्या प्रतिक्रिया काय असतील याची उत्सुकता आहे.

Loading...

KBC 11 : छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; सोशल मीडियावर अमिताभ ट्रोल

कौन बनेका करोडपती हा शो ताज्या सीझनमध्ये लोकप्रियता टिकवून आहे. त्याच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये गुजरातच्या स्पर्धक शाहेदा चंद्रन अमिताभ यांच्यासमोर होत्या.'कोणता शासक मुघल सम्राट औरंगजेबचा समकालीन होता?' असा प्रश्न शाहेदा यांना विचारण्यात आला. यासाठी चार पर्याय देण्यात आले.

१. महाराणा प्रताप

२. राणा सांगा

३. महाराजा रणजीत सिंह

४. शिवाजी

छत्रपतींचा उल्लेख फक्त शिवाजी असा करण्यात आल्याने महाराष्ट्रातल्या तमाम शिवभक्तांमध्ये नाराजी पसरली आहे. सोशल मीडियावर त्याचे पडसाद दिसत आहेत. औरंगजेबाचा उल्लेख सम्राट असा केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा मात्र एकेरी उल्लेख प्रेक्षकांमध्ये नाराजी आहे.

Bigg Boss 13: रात्री 2 वाजता सिद्धार्थला Kiss करणार होती शहनाज, नंतर असं झालं

==========================================================

VIDEO : कार्तिक एकादशीनिमित्तानं विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 8, 2019 12:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...