KBC 11: बायकोला मंगळसूत्र घेऊन देण्यासाठी तो पोहोचला हॉट सीटवर आणि....

KBC 11: बायकोला मंगळसूत्र घेऊन देण्यासाठी तो पोहोचला हॉट सीटवर आणि....

कुमारची ही इच्छा ऐकल्यानंतर आणि त्याचा व्हिडीओ पाहिल्यानंतर बच्चन यांच्यासह सर्वांनाच त्याचं बायकोवर किती प्रेम आहे ते कळलं.

  • Share this:

मुंबई, 23 ऑक्टोबर- सोनी टीव्हीवरील लोकप्रिय शो 'कौन बनेगा करोडपती' सध्या टीआरपी लिस्टमध्ये टॉप 5 मध्ये आहे. यंदाच्या सीझनमध्ये आतापर्यंत 3 स्पर्धक करोडपती होण्यात यशस्वी ठरले. पण त्याहून हा शो चर्चेत राहिला ते त्यात विचारल्या गेलेल्या प्रश्नांमुळे आणि स्पर्धकांमुळे नुकतंच सोनी टीव्हीने त्यांच्या ट्विटर अकाउंटवर पुढील भागाचा एक प्रोमो शेअर केला. या प्रोमोमध्ये स्पर्धक कुमार रंजन यांच्या एका इच्छेबद्दल कळल्यावर बिग बी यांना शब्दच सुचले नाहीत. कुमार रंजन जर ही स्पर्धा जिंकले तर त्या पैशांचं काय करणार असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर ऐकल्यावर अमिताभ बच्चन यांच्यासह सगळेच भावुक झाले.

जेवढे पैसे जिंकू त्याचं बायकोला सोन्याचं मंगळसूत्र देण्याचं स्वप्न आहे. कुमारची ही इच्छा ऐकल्यानंतर आणि त्याचा व्हिडीओ पाहिल्यानंतर बच्चन यांच्यासह सर्वांनाच त्याचं बायकोवर किती प्रेम आहे ते कळलं. यानंतर बिग बी यांनी कुमार यांना ते प्रेमाने बायकोला काय हाक मारतात हे विचारलं. त्यावर थोडं लाजत कुमार यांनी 'बेबी' असं उत्तर दिलं तेव्हा उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. पाहा हा धम्माल व्हिडीओः

दरम्यान, काही दिवसांपूर्वी नव्या करोडपतीची घोषणा झाली. अमिताभ बच्चन यांनी केबीसी 11 च्या तिसरे करोडपती गौतम झा यांचं नाव घेतलं. बिहारच्या गौतम कुमार झा यांनी शानदार अंदाजात खेळ खेळत एक कोटीची रक्कम जिंकली. खरं तर 50 लाखाच्या प्रश्नावर गौतम यांनी सर्व लाइफ लाइन वापरल्या होत्या. मात्र 1 कोटीच्या प्रश्नाचं अचूक उत्तर देण्यात ते यशस्वी ठरले. लाइफलाइन नसताना त्यांनी 1 कोटीच्या प्रश्नासाठी रिस्क घेतली. जर त्यांचा अंदाज चुकीचा ठरला असता तर त्यांना फक्त 3.20 लाख रुपयांवरच समाधान मानावं लागलं असतं. पण उत्तराची खात्री नसतानाही त्यांनी D हा पर्याय निवडला आणि कोट्याधीश झाले.

गौतम कुमार यांनी सांगितलं की, ते केबीसीचे चाहते नाहीत. इतकंच नाही तर त्यांनी कधीच या शोमध्ये येण्याविषयी विचारही केला नव्हता. फक्त आपल्या पत्नीचं मन राखण्यासाठी त्यांनी या शोमध्ये भाग घेतला होता. त्यांच्या पत्नीला नेहमी असं वाटत होतं की त्यांचं सामाज्ञ ज्ञान खूप चांगलं आहे आणि केबीसीमध्ये ते नक्कीच जिंकू शकतील.

आपल्या पत्नीच्या इच्छेसाठी गौतम यांनी केबीसीमध्ये भाग घेतला. याआधी ते UPSC ची तयारी करत होते. आताही त्यांनी आपलं शिक्षण पुढे सुरू ठेवलं आहे. सध्या ते सरकारी कर्मचारी आहेत. IIT खडगपुरमधून इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर गौतम यांना पश्चिम बंगालमध्ये रेल्वे खात्यात सिनिअर इंजिनिअर म्हणून नोकरी मिळाली. त्यांना आजही शिक्षणाचं वेड आहे मात्र केबीसीमध्ये सहभागी होण्यासाठी ते तितकेसे उत्सुक नव्हते.

साराचा श्रीलंकेच्या बीचवर Vacation; बिकिनी लूकवर तुम्हीही व्हाल फिदा!

वयाच्या 46व्या वर्षी तोडल्या बोल्डनेसच्या सीमा,11वर्ष लहान अभिनेत्याला करतेय डेट

'या' अभिनेत्याकडे जेवायलाही नव्हते पैसे, असा भरायचा शाळेची फी

Birthday Bash बेधुंद होऊन नाचले मलाइका अरोरा आणि अर्जुन कपूर, पाहा Video

First published: October 23, 2019, 5:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading