जिंकलेले पैसे सुद्धा गेले! मेडिकल कॉलेजचे प्रोफेसर KBC च्या या प्रश्नावर फेल

जिंकलेले पैसे सुद्धा गेले! मेडिकल कॉलेजचे प्रोफेसर KBC च्या या प्रश्नावर फेल

सरकारी मेडिकल कॉलेजचे प्रोफेसर असलेल्या या डॉक्टरनी 40 हजारांच्या प्रश्नापर्यंत एकही लाइफलाइन गमावली नव्हती.

  • Share this:

मुंबई, 26 ऑक्टोबर : कौन बनेगा करोडपतीच्या 11 व्या सीझनमध्ये धनत्रयोदशी दिवशी शोमध्ये आलेले डॉक्टर सुशील कुमार मखीजा फक्त 3.20 लाख जिंकू शकले. 40 हजारांच्या प्रश्नापर्यंत त्यांनी एकही लाइफलाइन गमावली नव्हती. जेव्हा त्यांच्या चारही लाइफलाइन संपल्या त्यावेळी ते 12.50 लाखांवर जाऊन पोहोचले होते. पण किवदंतीशी संबंधीत प्रश्नाचं चुकीचं उत्तर देऊन ते पुन्हा एकदा 3.20 लाखांवर आले.

सरकारी मेडिकल कॉलेजचे प्रोफेसर आहेत डॉक्टर मखीजा

केबीसीच्या 25 ऑक्टोबरच्या एपिसोडमध्ये हॉट सीटवर बसणारे डॉक्टर मखीजा महाराष्ट्राच्या नागपूर सरकारी मेडिकल कॉलेजचे असिस्टंट प्रोफेसर आहेत.

श्रेया घोषालचा हा VIDEO पाहून तुम्हालाही लागेल तिच्या आवाजाचं याड!

या प्रश्नावर फेल झाले डॉ. मखीजा

डॉक्टर मखीजा यांनी एक्सपर्टचा सल्ला ही लाइफलाइन वापरून 6.40 लाख जिंकले होते. मात्र ती कोणत्या राक्षसांची जोडी होती, ज्यांनी ब्राम्हणाला जेवणासाठी बोलवून त्याची हत्या केली होती. या प्रश्नाच्या उत्तरसाठी खर आणि दूषण हा पर्याय निवडला. मात्र त्याचं अचूक उत्तर इल्लव आणि वातापी असं होतं.

या प्रश्नावर डॉक्टरनी घेतल्या दोन लाइफलाइन

एक फोटो दाखवून विचारण्यात आलं होतं की हे कोणत्या झाडाचं फूल आहे? ज्याचं नाव एका मोठ्या युद्धाचं नावही आहे. याचं उत्तर होतं, प्लासी युद्ध. या प्रश्नासाठी डॉक्टर मखीजा यांनी ‘फ्लिप द क्वेश्चन’ ही लाइफलाइन घेतली. मात्र दोन पर्याय काढून टाकल्यानंतरही त्यांना या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही.

विकेंडला सिनेमा प्लान करण्याआधी वाचा, ‘हाऊसफुल 4’ बद्दल काय म्हणतायत प्रेक्षक

केबीसीमध्ये डॉ मखीजा यांना विचारण्यात आलेले अन्य प्रश्न

प्रश्न : यातील काय बुद्धिबळाच्या मोहऱ्याचं नाव नाही?

उत्तर : प्रिन्स

प्रश्न : अमर प्रेममध्ये आनंद बाबूच्या भूमिकेला कशाचा तिरस्कार होता?

उत्तर : टिअर्स (अश्रू)

प्रश्न : वेळेच्या संदर्भात PM मधील Pचा अर्थ काय आहे.

उत्तर : पोस्ट

प्रश्न : भारताच्या मानचित्रात यातील कोणतं हिल्स स्टेशन दिल्लीच्या उत्तरेला आहे.

उत्तर : डलहौजी

नाणं एकदम खणखणीत वाजतंय! गॉडफादर नसतानाही 'या' स्टार्सनी गाजवलं बॉलिवूड

========================================================

चंदनपुरी घाटातील धबधब्याची नयनरम्य दृश्यं, पाहा VIDEO

Published by: Megha Jethe
First published: October 26, 2019, 8:58 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading