KBC स्पर्धकानं केलं ऐश्वर्याचं कौतुक, अमिताभ बच्चननी व्यक्त केली नाराजी

KBC स्पर्धकानं केलं ऐश्वर्याचं कौतुक, अमिताभ बच्चननी व्यक्त केली नाराजी

स्पर्धकानं ऐश्वर्याची केलेली स्तुती ऐकून अमिताभ बच्चन मात्र नाराज झालेले दिसले.

  • Share this:

मुंबई, 26 ऑक्टोबर : अमिताभ बच्चन यांचा ‘कौन बनेगा करोडपती’ या शोचा 11 सीझन कधी अमिताभ बच्चन यांच्यामुळे तर कधी या शोमध्ये येणाऱ्या स्पर्धकांमुळे चर्चेत असतो. पण आता हा शो अमिताभ बच्चन यांची सून ऐश्वर्या राय बच्चनमुळे चर्चेत आला आहे. एका स्पर्धकानं या शोमध्ये ऐश्वर्याचं कौतुक केलं मात्र त्यावर अमिताभ बच्चन यांची प्रतिक्रिया ऐकून मात्र सर्वच हैरण झाले. स्पर्धकानं ऐश्वर्याची केलेली स्तुती ऐकून अमिताभ बच्चन मात्र नाराज झालेले दिसले.

काही दिवसांपूर्वीच ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये पूजा झा ही स्पर्धक हॉट सीटवर पोहोचली होती. यावेळी अमिताभ बच्चन यांनी तिला शाहरुख आणि ऐश्वर्या यांच्या 'जोश' सिनेमाविषयी प्रश्न विचारला. हा प्रश्न होता, शाहरुख खान आणि ऐश्वर्या राय यांच्या त्या सिनेमाचं नाव काय ज्यात त्यांनी भाऊ-बहीण अशा भूमिका साकारल्या होत्या. या प्रश्नाचं उत्तर देताना तिनं ऐश्वर्याची स्तुती केली होती.

जिंकलेले पैसे सुद्धा गेले! मेडिकल कॉलेजचे प्रोफेसर KBC च्या या प्रश्नावर फेल

 

View this post on Instagram

 

✨Happyyy Anniversary Pa n Ma✨ Love, Health and Happiness always God Bless

A post shared by AishwaryaRaiBachchan (@aishwaryaraibachchan_arb) on

हिंदुस्तान टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार पूजा म्हणाली, मी ऐश्वर्या राय-बच्चनची खूप मोठी चाहती आहे. मला तिचे डोळे खूप आवडतात. पूजाच्या या बोलण्यावर हैराण होत अमिताभ बच्चन म्हणाले, मी खूपच निराश आहे की, तुम्ही माझ्या डोळ्यांची स्तुती केली नाही. पण मी ऐश्वर्याला तुमचं हे बोलणं नक्की सांगेन. ऐश्वर्या रायनं अमिताभ यांचा मुलगा आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांच्यशी 2007 मध्ये लग्न केलं आहे.

राखी सावंतनं शेअर केला पतीच्या घरचा VIDEO, लोक म्हणतात फेकू नकोस!

 

View this post on Instagram

 

✨Happy 77th Birthday Pa-Dadaji✨God Bless and Love you Always ❤️

A post shared by AishwaryaRaiBachchan (@aishwaryaraibachchan_arb) on

या शो व्यतिरिक्त अमिताभ यांच्याबद्दल बोलायचं झाल्यास त्यांच्या घरी लवकरच बॉलिवूडकरांची उपस्थिती पाहायला मिळणार आहे. यावर्षी ते सर्व बॉलिवूडकरांना दिवाळीची पार्टी देणार आहेत. मुंबई मिररनं दिलेल्या वृत्तानुसार अमिताभ यांनी या पार्टीचं सर्वांना निमंत्रणही पाठवलं आहे. शाहरुख-गौरी खान, अजय देवगन, काजोल, अक्षय कुमार, ट्विंकल खन्ना, करण जोहर, आनंद पंडित, कबीर खान, संजय दत्त, रणबीर कपूर, आलिया भट्ट, अयान मुखर्जी यांचा समावेश आहे.

श्रेया घोषालचा हा VIDEO पाहून तुम्हालाही लागेल तिच्या आवाजाचं याड!

=============================================================

चंदनपुरी घाटातील धबधब्याची नयनरम्य दृश्यं, पाहा VIDEO

First Published: Oct 26, 2019 11:51 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading