KBC 11: फक्त 1500 रुपये कमावणाऱ्या महिलेनं जिंकले 1 कोटी, पाहा VIDEO

KBC 11: फक्त 1500 रुपये कमावणाऱ्या महिलेनं जिंकले 1 कोटी, पाहा VIDEO

बबिता टाडे आंध्र प्रदेशची राजधानी अमरावती येथे राहणाऱ्या आहेत. त्या एका शाळेत जेवण बनवण्याचं काम करतात.

  • Share this:

मुंबई, 15 सप्टेंबर : टीव्ही शो कौन बनेगा करोडपती आता खूपच चर्चेत आला आहे. नुकताच बिहारच्या सनोज राजनं KBC-11चा पहिला करोडपती होत इतिहास रचला तर दुसरीकडे आंध्र प्रदेशच्या अमरावती येथे राहणाऱ्या बबिता टाडे या महिलेनं KBC-11ची दुसरी करोडपती होण्याचा मान मिळवला आहे. सोनी टीव्हीनं आपल्या ऑफिशिअल सोशल मीडिया अकाउंटवर या एपिसोडचा प्रोमो शेअर केला आहे. ज्यात बबिता 15 व्या प्रश्नासाठी हॉट सीटवर बसलेल्या दिसत आहेत.

बबिता टाडे आंध्र प्रदेशची राजधानी अमरावती येथे राहणाऱ्या आहेत. त्या एका शाळेत जेवण बनवण्याचं काम करतात. ज्यात त्यांना महिना 1500 रुपये पगार मिळतो. मुलांना सुद्धा खिचडी खूप आवडते, त्यामुळे मला खिचडी बनवायला खूप आवडते असं त्या प्रोमोमध्ये सांगताना दिसतात. त्या सांगतात, KBC जिंकून मला माझी स्वतःची स्वप्न पूर्ण करायची आहेत. यातून मी हे सिद्ध करुन दाखवेन की एक खिचडी बनवणारी सुद्धा स्वतःची स्वप्न पूर्ण करु शकते. बबिता टाडेचा करोडपती होण्याचा हा एपिसोड येत्या बुधवारी प्रसारित होणार आहे.

आयुष्यमानला वाढदिवशी मिळाली Bad न्यूज, रिलीजच्या 24 तासांनंतर 'ड्रीमगर्ल लीक

टीआरपीच्या रेटिंगमध्ये सध्या KBC-11 टॉप 5मध्ये पोहोचला आहे. त्यामुळे बबिताच्या या एपिसोडमुळे पुढच्या आठवड्यात या सोच्या टीआरपी रेटिंगमध्ये आणखी सुधारणा होण्याची शक्यता आहे. बबिता यांच्या अगोदर बिहारचा सनोज राजKBC-11चा 1 कोटी जिंकणारा पहिला स्पर्धक ठरला. त्यानं 15 प्रश्नांची उत्तर देत 7 कोटींच्या 16 व्या प्रश्नापर्यंत पोहोचला होता. मात्र या प्रश्नाचं उत्तर तो देऊ शकला नाही. सनोज हा बिहारच्या जहनाबादमधील एका लहान गावात राहणारा आहे. त्याचं शिक्षण बीटेक पर्यंत झालं असून असिस्टंट कमांडेट म्हणून पॅरा मिलिटरी फोर्समध्ये त्याची निवड झाली आहे. मात्र तो सध्या शासकीय सेवेच्या स्पर्धा परिक्षांची तयारी करत आहे. IAS अधिकारी  होण्याचं त्याचं स्वप्न आहे.

रानू मंडल नाही तर 'ही' आहे स्टेशनवर गाणं गाणारी पहिली प्लेबॅक सिंगर

याशिवाय राय बरेलचा हिमांशू धूरिया हा 19 वर्षीय तरुण 1 कोटीच्या प्रश्नापर्यंत पोहोचला होता मात्र या प्रश्नाचं उत्तर येत नसल्यानं खेळ थांबवत त्यानं 50 लाखांची रक्कम जिंकली. हिमांशू एक ट्रेनी पायलट आहे. त्यानं नुकतंच दीड वर्षाचं ट्रेनिंग पूर्ण केलं आहे. या शोमध्ये फास्टेस्ट फिंगर फर्स्टचं नवा रेकॉर्ड केला आणि हिमांशू 11 व्या सीझनमधील सर्वात कमी वेळात उत्तर देणारा पहिला स्पर्धक ठरला. फास्टेस्ट फिंगर फर्स्ट या राउंडमध्ये हिमांशूनं 2.42 सेकंदात प्रश्नाचं उत्तर दिलं. हिमांशूनं त्याच्या पहिल्याच प्रश्नासाठी लाइफ लाइन घेतली होती. या शोमध्ये खरं र सुरुवातीचे प्रश्न हे खूपच सोपे असतात. अशात हिमांशूनं पहिल्या प्रश्नासाठी लाइफ लाइन वापल्यानं सर्वांच्याच भूवया उंचवल्या गेल्या होत्या.

VIRAL PHOTOS मुळे पिवळ्या साडीतली 'ती' अधिकारी पुन्हा एकदा चर्चेत

=======================================================

जीव वाचवण्यासाठी सशाची धडपड पण बिबट्यानं केली शिकार, VIDEO VIRAL

First published: September 15, 2019, 12:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading