OMG! असं काय झालं की, KBC च्या स्पर्धकावर नाराज झाले अमिताभ बच्चन

OMG! असं काय झालं की, KBC च्या स्पर्धकावर नाराज झाले अमिताभ बच्चन

KBC मध्ये नेहमीच कूल अंदाजात दिसणारे अमिताभ बच्चन स्पर्धकावर नाराज झाले आणि याचं कारण बॉलिवूडच्या 'उरी' सिनेमाशी संबंधित आहे.

  • Share this:

मुंबई, 01 ऑक्टोबर : सध्या कौन बनेगा करोडपती हा टीव्ही शो आधिकाधिक लोकप्रिय ठरत आहे. मनोरंजनासोबतच महत्त्वपूर्ण माहितीच स्रोत म्हणून या शोकडे पाहिलं जातं. या शोमध्ये अमिताभ बच्चन स्पर्धकांशी खेळीमेळीच्या वातावरणात संवाद साधत खेळाकडे वळतात. तसेच खेळच्या मध्ये स्पर्धकांचे अनुभव प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. पण 30सप्टेंबरला प्रसारित केल्या गेलेल्या  भागात मात्र KBC मध्ये नेहमीच कूल अंदाजात दिसणारे अमिताभ बच्चन स्पर्धकावर चिडले आणि याचं कारण बॉलिवूडच्या 'उरी' सिनेमाशी संबंधित आहे.

यावेळी 'फास्टेस्ट फिंगर फर्स्ट' ची अचूक उत्तर देऊन मुंबईतील बिजनेसमन मुस्तफा परदावाला यांना अमिताभ यांच्यासमोर हॉटसीटवर बसण्याची संधी मिळाली. त्यानंतर प्रश्नोत्तरांचा सिलसिला सुरू झाला. दरम्यान एक प्रश्न असा होता. ज्याचं उत्तर सर्वांना माहित होतं मात्र मुस्तफाला माहित नव्हतं आणि यासाठी त्यानं लाइफलाइन वापरली. हा प्रश्न बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अजय देवगण याच्याशी संबंधित होता.

SHOCKING! 'दिग्दर्शकानं माझ्याकडे शरीर सुखाची मागणी केली होती'

अजय देवगणशी संबंधित हा प्रश्न असा होता, हे सिनेमाचं नाव पूर्ण करा, फूल और_? आणि याचं उत्तर होतं- 'फूल और कांटे' मात्र मुस्तफाला हे उत्तर माहित नव्हतं. यामुळे त्याला लाइफलाइन घ्यावी लागली. पण यासाठी मुस्तफानं दिलेलं कारण ऐकून अमिताभ बच्चन सुद्धा हैराण झाले. मुस्तफानं सांगितलं की, मी सिनेमा पाहत नाही.  त्यानं विकी कौशलच्या 'उरी द सर्जिकल स्ट्राइक'नंतर कोणताही सिनेमा पाहिलेला नाही.

दीपिका पदुकोणची शाळेतील प्रगती सोशल मीडियावर VIRAL, पाहा काय म्हणाला रणवीर!

मुस्तफाच्या या उत्तरावर अमिताभ बच्चन नाराज झाले आणि म्हणाले, ही आमच्यासाठी खूप दुःखद आहे. तुम्ही इतरही सिनेमा पाहायला हवे. याशिवाय मुस्तफानं त्याच्या वडीलाच्या निधनाबद्दल सांगितलं. ज्यामुळे अमिताभ यांच्यासोबतच इतर प्रेक्षकही भावूक झाले. या शोमध्ये मुस्तफा 80 हजार रुपयेच जिंकू शकले.

'मेरे बॉयफ्रेंड से गुलूगुलू करेगी तो...' Gully Boy चा डायलॉग रेखा यांच्या आवाजात

====================================================================

VIDEO : दुर्मीळ असा पोल्का डॉटेड झेब्रा, अंगावर नाहीत काळे पांढरे पट्टे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 1, 2019 06:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...