S M L

खळखळून हसवणारे 'डॉ. हंसराज हाथी' यांचं आकस्मित निधन

'तारक मेहता का उलटा चष्मा' या हिंदी मालिकेतून सगळ्यांना हसवणारे कवी कुमाप आझाद म्हणजे सगळ्यांचे लाडके डॉ. हंसराज हाथी यांचं निधन झालं आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 9, 2018 02:02 PM IST

खळखळून हसवणारे 'डॉ. हंसराज हाथी' यांचं आकस्मित निधन

मुंबई, 09 जुलै : 'तारक मेहता का उलटा चष्मा' या हिंदी मालिकेतून सगळ्यांना हसवणारे कवी कुमार आझाद म्हणजे सगळ्यांचे लाडके डॉ. हंसराज हाथी यांचं निधन झालं आहे. हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचं आकस्मित निधन झालं आहे. मीरारोडच्या वोकार्ड या खाजगी रुग्णालयात त्यांचं निधन झाले.

सगळ्यांना खळखळून हसवणारे हंसराज गेल्या तीन दिवसांपासून आजारी होते. काल रात्री ते कोमामध्ये होते. त्यांच्यावर वोकार्ड रुग्णालयात उपचार सुरू होते. आणि आज त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. आपल्या वेगळ्या अभिनय शैलीने त्यांनी लहान्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हसवलं. 'तारक मेहता का उलटा चष्मा' या मालिकेतून त्यांनी सगळ्यांच्या मनात घरं केलं होतं. त्यांच्या या अकाली जाण्यामुळे संपूर्ण सिनेजगतात शोककळा पसरली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 9, 2018 01:33 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close