मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Sushil Kumar : KBC जिंकल्यानंतर स्पर्धकाची दयनीय अवस्था, दारू सिगरेटमुळे बायकोही गेली सोडून

Sushil Kumar : KBC जिंकल्यानंतर स्पर्धकाची दयनीय अवस्था, दारू सिगरेटमुळे बायकोही गेली सोडून

सुशील कुमारचं केबीसी जिंकण्याचं स्वप्न पूर्ण झालं मात्र त्यानंतर त्याला मोठ्या डिप्रेशनला समोरं जावं लागलं. कसं होतं सुशील कुमारचं केबीसी जिंकल्यानंतरचं आयुष्य जाणून घ्या.

सुशील कुमारचं केबीसी जिंकण्याचं स्वप्न पूर्ण झालं मात्र त्यानंतर त्याला मोठ्या डिप्रेशनला समोरं जावं लागलं. कसं होतं सुशील कुमारचं केबीसी जिंकल्यानंतरचं आयुष्य जाणून घ्या.

सुशील कुमारचं केबीसी जिंकण्याचं स्वप्न पूर्ण झालं मात्र त्यानंतर त्याला मोठ्या डिप्रेशनला समोरं जावं लागलं. कसं होतं सुशील कुमारचं केबीसी जिंकल्यानंतरचं आयुष्य जाणून घ्या.

  • Published by:  Minal Gurav

मुंबई, 10 ऑगस्ट: हिंदी टेलिव्हिजनवर मागच्या 15 वर्षांपासून सुरू असलेला क्विज गेम अर्थात कोन बनेगा करोडपती हा कार्यक्रम प्रेक्षकांना आवडतोय. केबीसी जिंकल्यानंतर अनेक स्पर्धकांचं नशीब उजळलं कर काहींचे संसार उद्धस्त झाले. केबीसीच्या पाचव्या सीझनमध्ये 5 करोड रुपये जिंकणारा स्पर्धक सुशील कुमारला लॉटरी लागली मात्र त्याचं सगळं आयुष्यच बिघडून गेलं. सुशील कुमारचं केबीसी जिंकण्याचं स्वप्न पूर्ण झालं मात्र त्यानंतर त्याला मोठ्या डिप्रेशनला समोरं जावं लागलं. फेसबुकवर पोस्ट शेअर करत सुशीलनं केबीसी जिंकल्यानंतर त्याच्या आयुष्यात घडलेल्या घडमोडींचा खुलासा केला होता. सुशील आता जरी नॉर्मल आयुष्य जगत असला तरी वाईट आठवणी आजही त्याच्या आयुष्यात आहे.

सुशीलनं फेसबुकवर पोस्ट शेअर करत 'द वर्स्ट पीरियड ऑफ माय लाइफ' असं म्हणत पोस्ट शेअर केली होती. त्यानं लिहिलं होतं, 2015-16 हे वर्ष माझ्या आयुष्यातील सर्वात आव्हानात्मक वर्ष होतं. मला काय करायचं आहे हे मला माहिती नव्हतं. मी एक मध्यमवर्गीय सर्वसामान्य माणूस होतो.  बिहारमध्ये दरमहिन्याला 10 -15 कार्यक्रम करत होतो. त्या वेळी मी मीडियाकडे फार गांभीर्यानं लक्ष दिलं.  पत्रकार कधी कधी माझी मुलाखत घ्यायला यायचे, माझ्याविषयी वृत्तपत्रात लिहायचे. मी त्यांना माझ्या व्यवसायाविषयी सांगितलं होत जेणेकरुन त्यांना मी बेरोजगार वाटू नये. पण पुढच्या काही दिवसातच मी बरोजगार झालो.  माझा व्यवसाय बंद झाला.

हेही वाचा - Rakshabandhan 2022: ओळखलं का या बहीण-भावाच्या जोडीला? आज बॉलिवूडवर करताहेत राज्य

सुशीलनं केबीसीमुळे लोकांनी मला मुर्खात काढलं असंही सांगितलं, तो म्हणाला केबीसी मी परोपकारी झालो होतो. अनेकांना मी पैसे दिले पण त्यांनी मला फसवलं. यामुळे माझी बायको माझ्यापासून हळू हळू दूर होऊ लागली. मला भविष्याची कोणतीही चिंता नव्हती पण माझी बायको मला नेहमी सांगायची तुम्हाला चांगलं आणि वाईट यातील फरक कळत नाही.  आमच्यात या कारणामुळे सतत भांडणं व्हायची. एकदिवस बायको मला सोडून गेली.

इतकंच नाही पैसे मिळाल्यानं सुशीलला तेव्हा दारू सिगारेटचंही व्यसन लागलं होतं.  सुशीलनं म्हटलं होतं, मी एक आठवडा दिल्लीमध्ये राहायचो आणि तिथल्या सात वेगवेगळ्या ग्रुप्सबरोबर दारू सिगारेट प्यायचो. दरम्यानचा एक किस्सा सुशीलनं सांगितला, मी कंगाल झालो. एका रात्री मी 'प्यासा' हा सिनेमा पाहत होतो. तेव्हा माझी बायको अचानक आली आणि ओरडत म्हणाली एकच सिनेमा किती वेळा पाहणार. मी तिच्यावर ओरडलो आणि खोलीतून बाहेर गेलो. तेव्हा मला एका इंग्रजी वृत्तपत्राच्या पत्रकाराचा फोन आला.  तेव्हा माझी गाडी कुठे तरी रुळावर येत होती. तेव्हा त्यानं मला काहीतरी प्रश्न विचारला आणि मी त्याच्यावर ओरडलो.  त्याला म्हणालो, मी कंगाल झालोय. माझ्याकडे पैसे नाहीत. दुध विकून मी पैसे कमावतोय.  त्यानंतर मात्र कोणीही संपर्क साधला नाही. मला कार्यक्रमांसाठी मिळणारी आमंत्रणं देखील बंद झाली.

त्यानंतर सुशीलनं मुंबईत येऊन करिअर करण्यासाठी प्रयत्न केले मात्र इथली प्रत्यक्ष परिस्थिती पाहून मुंबई सोडली आणि पुन्हा आपल्या मुळ गावी येऊन नवीन आयुष्याला सुरुवात केली. 2019मध्ये सुशीलनं सिगारेट पिणं सोडलं त्यामुळे त्याची फॅमिली त्याला परत मिळाली. सगळं काही सुरळीत सुरू करुन सुशीलनं त्याचं आयुष्य सुरू केलं.

First published:

Tags: KBC