KBC-11 : 7 कोटी जिंकण्याचा दावा करणारी मुंबईतील शिक्षिका तिसरीच्या प्रश्नावर झाली फेल

अमिताभ बच्चन यांच्यासमोर हॉट सीटवर बसण्यासाठी जेव्हा या शिक्षिकेची निवड झाली त्यावेळी तिनं 7 कोटी रुपये जिंकण्याचा दावा केला होता.

News18 Lokmat | Updated On: Sep 29, 2019 05:13 PM IST

KBC-11 : 7 कोटी जिंकण्याचा दावा करणारी मुंबईतील शिक्षिका तिसरीच्या प्रश्नावर झाली फेल

मुंबई, 27 सप्टेंबर : कौन बनेगा  करोडपतीच्या 11 व्या सीझनमध्ये मोठे-मोठे दावे करणारी एक ट्यूशन टीचर अवघे 1.60 लाख रुपये जिंकत या शोमधून बाहेर पडली. 3.20 लाखांच्या प्रश्नावर तिनं खेळ थांबवला. विशेष म्हणजे फास्टेस्ट फिंग फर्स्ट राउंडमधील प्रश्नांची उत्तर देऊन जेव्हा अमिताभ बच्चन यांच्यासमोर हॉट सीटवर बसण्यासाठी जेव्हा या शिक्षिकेची निवड झाली त्यावेळी ती अक्षरशः नाचली. यावेळी ती एवढी उतावळी झाली होती की चप्पल घालायला ही विसरुन गेली होती.

कल्याण, मुंबई येथे राहणाऱ्या या शिक्षिकेचं नाव अश्विनी भोसले असं आहे. ज्यावेळी अमिताभ बच्चन यांनी केबीसी टीमने दिलेला तिचा व्हिडीओ दाखवला त्या व्हिडीओमध्ये तिनं 7 कोटी रुपये जिंकण्याचा दावा केला होता. अमिताभ यांनी तिला तुम्ही मुलांना काय शिकवता असं विचारलं त्यावर तिनं मुलांचे सर्व विषयांचे ट्यूशन घेते असं उत्तर दिलं मात्र धक्कादायक गोष्ट ही होती की, दुसरी किंवा तिसरीच्या अभ्यासक्रमात शिकवल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर मात्र ती देऊ शकली नाही. या प्रश्नासाठी तिनं लाइफ लाइन वापरली. तिला विचरण्यात आलेला प्रश्न-

यातील कोणात्या संखेचं म्हत्त्व जास्त आहे.

a. 100-1

b. 200-111

Loading...

c. 300-222

d. 400-333

बिग बी अमिताभ बच्चन यांना झालाय 'हा' गंभीर आजार, KBC-11 मध्ये केला खुलासा

केंद्रीय शाळेतील  एका शिक्षिकेनं सांगितल्यानुसार हा प्रश्न सामान्यपणे दुसरी किंवा तिसरीतल्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात शिकवला जातो. सरकारी शाळांमध्ये पहिल्याच्या विद्यार्थ्यांना 99 पर्यंतच्या जोडसंख्या शिकवल्या जातात मात्र सध्या अनेक मुलं हे अगोदरच शिकून आलेले असतात. त्यानंतर दुसरीच्या अभ्यासक्रमात 999 पर्यंतच्या जोडसंख्या शिकवल्या जातात. जर एखादा विद्यार्थी तिसऱ्या इयत्तेत हा प्रश्न सोडवू शकत नसेल त्याला अभ्यात कमी समजलं जातं. या प्रश्नाचं अचूक उत्तर होतं. 100-1

याशिवाय अश्विनी भोसले यांना खालील प्रश्न विचारण्यात आले-

प्रश्न: ही हिंंदी म्हण पूर्ण करा... नाच न जानें... टेढ़ा

उत्तर: आंगन

प्रश्न: न्यूडल्स, बर्गर कोणत्या प्रकारचं फुड आहे?

उत्तर: फास्ट फुड

प्रश्न: परंपरेनुसार यातील कोणत्या दिवशी सरस्वती पुजन केलं जातं?

उत्तर: वसंत पंचमी

प्रश्न: भारतीय क्रिकेट टीममध्ये माही नावानं कोणता खेळाडू ओळखला जातो?

उत्तर:महेंद्र सिंह धोनी

प्रश्न: दिल्ली, खिडकी, गणेश आणि नारायण याशिवाय शनिवार वाड्यातील पाचव्या दरवाज्याचं नाव काय?

उत्तर: मस्तानी

प्रश्न: रामायणानुसार कोणाला राजऋषी आणि ब्रह्मऋषी म्हटलं जातं?

उत्तर: विश्वामित्र

प्रश्न: जर तुमचं विमान वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलं तर तुम्ही भारतातल्या कोणत्या शहरात असाल?

उत्तर: पोर्टब्लेयर

Vogue Beauty Awards मध्ये मलायका अरोराचा ग्लॅमरस लुक, पाहा तिचे HOT PHOTO

अभिनंदन! ग्लॅमरपासून दूर असलेल्या या 'स्टार किड'नं घातली देशाच्या सन्मानात भर

================================================================

SPECIAL REPORT: शत्रूसोबत दोन हात करणारं भारतीय नौदल आता आणखी बळकट होणार!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 27, 2019 12:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...