मुंबई, 25 नोव्हेंबर: कौन बनेगा करोडपती (Kaun Banega Crorepati) हा टीव्ही शो फारच प्रसिद्ध आहे. या खेळामध्ये प्रेक्षकांचं मनोरंजनही होतं आणि सामान्य ज्ञानही वाढतं. सोबतच बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचं सूत्रसंचालन बघायलाही प्रेक्षकांना मजा येते. सध्या कौन बनेगा करोडपतीचा बारावा सिझन चालू आहे. आत्तापर्यंत या स्पर्धेत अनेक सामान्य लोकांप्रमाणेच कलाकारांनीही हजेरी लावली आहे. हा शो प्रत्येक स्पर्धकाला काही ना काही देऊन जातो. अलीकडेच एका महिला स्पर्धकाला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डशी (Guinness World Records) निगडीत एक प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर तिला देता आलं नाही. त्यामुळे तिने हा खेळ तिथेच सोडून दिला. पण हा प्रश्न सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
काही दिवसांपूर्वी या शोमध्ये आलेल्या 2 महिलांनी अप्रतिम खेळ खेळत 1 कोटी जिंकले होते. अलीकडेच शोमध्ये सहभागी झालेल्या मध्य प्रदेशच्या ओशीन जेहरी यांनीही हुशारीने खेळ खेळत 25 लाखांपर्यत मजल मारली. त्यांनंतर 50 लाखांसाठी त्यांना गिनीज वर्ल्ड रेकॉर्डशी निगडीत एक प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा मात्र त्यांना उत्तर न देता आल्याने खेळ अर्ध्यातच सोडावा लागला. तो प्रश्न असता होता, पृथ्वीवरील सर्वात मोठा सजीव प्राणी कोणता? त्याचे पर्याय होते, A)ब्लू व्हेल, B) जायंट सिकोया C)ग्रेट बॅरिअर रिफ D)हनी मशरुम .
केबीसीमध्ये विचारलेल्या या प्रश्नाचं उत्तर होतं, D) हनी मशरुम. ओशीन यांना प्रश्नाचं उत्तर न आल्यामुळे त्यांना 25 लाखांवर समाधान मानावं लागलं. अमिताभ बच्चन यांना त्यांचा खेळ फारच आवडला. त्यांनी ओशीन यांच्या खेळाचं कौतुक केलं. अमिताभ बच्चन यांनी ओशीन यांना प्रश्न विचारला की, तुम्हाला टीव्हीवरील कोणता कार्यक्रम बघायला आवडतो? त्यावर ओशीन यांनी उत्तर दिलं की, ‘कपील शर्माचा शो मला सर्वात जास्त आवडतो.’ त्यावर अमिताभ बच्चन म्हणाले, ‘तुम्ही केबीसी बघत नाही का?’ त्यावर ओशीन म्हणाल्या, ‘कौन बनेगा करोडपतीमध्ये सहभाग घेणं हे तर माझं बलापणापासूनचं स्वप्न होतं.’