मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'KBC 13'च्या नव्या प्रोमोने माजवली खळबळ; आक्षेपानंतर हटवली दृश्ये, जाणून घ्या नेमकं प्रकरण

'KBC 13'च्या नव्या प्रोमोने माजवली खळबळ; आक्षेपानंतर हटवली दृश्ये, जाणून घ्या नेमकं प्रकरण

Amitabh Bachchan

Amitabh Bachchan

'कौन बनेगा करोडपती 13' (Kaun Banega Crorepati 13) च्या माध्यमातून लोकांना त्यांचे ज्ञान सिद्ध करण्याची संधी मिळत आहे. आणि याच ज्ञानाच्या जोरावर ते लाखो आणि करोडो रुपये जिंकतात. मात्र हा शो अनेकदा वादात सापडला आहे.

मुंबई, 1 डिसेंबर-   'कौन बनेगा करोडपती 13'   (Kaun Banega Crorepati 13)   च्या माध्यमातून लोकांना त्यांचे ज्ञान सिद्ध करण्याची संधी मिळत आहे. आणि याच ज्ञानाच्या जोरावर ते लाखो आणि करोडो रुपये जिंकतात. मात्र हा शो अनेकदा वादात सापडला आहे. नुकताच 'कौन बनेगा करोडपती 13' चा नवीन प्रोमो  (Kaun Banega Crorepati 13 Promo)   रिलीज झाला आहे. हा प्रोमो 'मिड ब्रेन अ‍ॅक्टिव्हेशन'शी    (Mid Brain Activation) संबंधित होता. जो शोच्या आगामी भागांमध्ये दाखवला जाईल. पण आता हा प्रोमो चॅनलने काढून टाकला आहे. नेमकं काय झालं? त्यामुळे वाहिनीला माघार घ्यावी लागली? याबद्दल आपण पाहणार आहोत.

वास्तविक, 'कौन बनेगा करोडपती 13' च्या आगामी एपिसोडमध्ये 'मिड ब्रेन एक्टिव्हेशन' संदर्भात त्याच्या अधिकृत वेबसाइटवर एक प्रोमो रिलीज करण्यात आला होता. 'KBC 13' च्या या प्रोमोमध्ये शोचे होस्ट अमिताभ बच्चन यांच्यासमोर एक मुलगी उभी आहे. जिच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे. मग या मुलीचा दावा आहे की ती पुस्तकाचा वास घेऊन ती पूर्णपणे वाचू शकते. हा प्रोमो प्रसारित होताच 'फेडरेशन ऑफ इंडियन रॅशनलिस्ट असोसिएशन'चे अध्यक्ष नरेंद्र नायक यांनी 'केबीसी 13'च्या या प्रोमोवर आक्षेप घेतला आहे.

पत्रात काय म्हणाले नरेंद्र नायक-

नरेंद्र नायक यांनी या प्रोमोसंदर्भात वाहिनीला खुले पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी लिहिले आहे की, सामान्यतः मिड ब्रेन ऍक्टिव्हेशनचा वापर मुलांच्या पालकांना मूर्ख बनवण्यासाठी केला जातो. त्यामुळे कोणत्याही राष्ट्रीय टीव्हीवर अशा गोष्टींचा प्रचार करणे योग्य नाही. यामुळे आपल्या देशाची खिल्लीही उडू शकते. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, नरेंद्र नायक यांनी लिहिलेले खुले पत्र सोशल मीडियावर व्हायरल होताच चॅनलने एपिसोडचा हा विशिष्ट भाग काढून टाकला.

(हे वाचा:PHOTOS: फोटोने केली फजिती! कॅमेरासमोरच निसटली उर्फी जावेदची पॅन्ट )

या खुल्या पत्रात नरेंद्र नायक यांनी मुलीचे वास घेऊन पुस्तक वाचणे हा निव्वळ घोटाळा असल्याचे लिहिले आहे. अनेक शास्त्रज्ञांनी आधीच अशा पद्धतीला निराधार म्हटले आहे. हे फक्त लोकांना मूर्ख बनवण्यासाठी केले जाते. नरेंद्र नायक हे मंगळुरूचे रहिवासी असून ते समाजातील अशा भ्रामक गोष्टींविरोधात अनेकदा काम करतात. मुलांची बौद्धिक शक्ती वाढवण्याचा दावा करणाऱ्या अशा लोकांच्या व्यवसायाला यामुळे प्रोत्साहन मिळेल, असे त्यांनी पत्रात स्पष्टपणे लिहिले आहे.

(हे वाचा:महाठग सुकेशला Kiss करताना दिसली जॅकलिन; VIRAL फोटो पाहून चाहते चकित )

मात्र, नरेंद्र नायक यांच्या खुल्या पत्राचा परिणाम वाहिनीवर झाला. आणि त्याने या स्पेशल एपिसोडचे काही सीन्स काढून टाकले आहेत. यासोबतच चॅनलने अधिकृत निवेदनही जारी करून स्पष्टीकरण दिले आहे की, आता भविष्यात अशा गोष्टींची काळजी घेतली जाईल आणि कसून चौकशी केल्यानंतरच काहीही प्रसारित केले जाईल. आता सोशल मीडियावर लोक नरेंद्र नायक यांची स्तुती करत आहेत.

First published:
top videos

    Tags: Amitabh Bachchan, KBC