KBC 11 : 1 कोटीच्या प्रश्नपर्यंत पोहोचली पहिली स्पर्धक, उत्तराबाबत उत्सुकता शिगेला

KBC 11 : 1 कोटीच्या प्रश्नपर्यंत पोहोचली पहिली स्पर्धक, उत्तराबाबत उत्सुकता शिगेला

केबीसीच्या आगामी एपिसोडचा प्रोमो नुकताच रिलीज झाला त्यामध्ये एक महिला स्पर्धक 1 कोटीच्या प्रश्नासाठी खेळत असल्याचं दिसत आहे.

  • Share this:

मुंबई, 25 ऑगस्ट : टीव्ही शो ‘कौन बनेगा करोडपती’ सध्या सगळीकडेच चर्चेत आहे. या शोच्या 11 व्या सीझनची सुरुवात झाली असून 16 प्रश्नांचा हा खेळ यंदा 7 कोटी रुपयांसाठी खेळला जाणार आहे. शो सुरू होऊन एक आठवडा होत आला असला तरीही अद्याप एकही स्पर्धक करोडपती होऊ शकलेला नाही. मात्र आता लवकरच केबीसीला त्यांचा पहिला करोडपती मिळण्याची शक्यता आहे. केबीसीच्या आगामी एपिसोडचा प्रोमो नुकताच रिलीज झाला त्यामध्ये एक महिला स्पर्धक 1 कोटीच्या प्रश्नासाठी खेळत असल्याचं दिसत आहे.

सोनी टीव्हीच्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम पेजवर हा नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला अमिताभ बच्चन यांच्यासमोर हॉटसीटवर बसलेली दिसत आहे. अमिताभ बच्चन म्हणतात, या सीझनमध्ये पहिल्यांदाच 15 वा प्रश्न, एक कोटी रुपये, तुमच्याकडे कोणतीही लाइफ लाइन नाही, बरोबर उत्तर 1 कोटी रुपये. लॉक करायचं की क्विट करायचं? KBC चा हा व्हिडीओ पाहल्यावर सर्वांचीच धडधड वाढते. 1 कोटीसाठी हॉट सीटवर बसलेली ही महिला पाणी पिऊन स्वतःला शांत करताना दिसते. त्यामुळे आता सर्वांना ही महिला या सीझनची पहिली करोडपती होणार का याची उत्सुकता लागून राहिली आहे. हा एपिसोड 26 ऑगस्ट रात्री 9 वाजता प्रसारित होणार आहे.

गुड न्यूज! अनुष्का-विराटच्या घरी आली 'नन्ही मेहमान'

कौन बनेगा करोडपती शो या सीझनचे पहिले स्पर्धक गुजरातचे अमित रमेशभाई जीवनाणी हे होते. आतापर्यंत रायपुर, छत्तीसगढची चित्ररेखा, जालंधरचे GST इन्स्पेक्टर विवेक भगत, महाराष्ट्रचे कम्प्यूटर टीचर महेश आणि नुपूर चौहान हे स्पर्धक शोमध्ये दिसले आहेत. सर्वांचाच प्रवास 10 हजार ते 12 लाखापर्यंत राहिला आहे. यंदाचा हा शो 13 आठवड्यांचा आहे.

प्रियांका-दीपिकाला पाहिल्यावर येते उलटी, पाकिस्तानी अँकर बरळला

==================================================================

VIDEO: पुण्यातील प्लॅस्टिकच्या गोडाऊनमध्ये अग्नितांडव!

Published by: Megha Jethe
First published: August 25, 2019, 6:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading