30 आॅक्टोबर : फिटनेस आणि बॉलिवूड हे खूप जवळचं समीकरण आहे. बॉलिवूडमधले सगळेच कलाकार त्यांच्या पर्सनालिटीसाठी कठीण परिश्रम घेत असतात. त्यात जर कतरिना कैफला तुम्ही तुमचा फिटनेस गुरू बनवलं तर तुम्हाला आणखी कठीण परिश्रम करावे लागणार हे नक्की. कारण दरम्यान कतरिना आणि आलिया भट्टचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये कतरिना आलिया भट्टकडून कठीण व्यायाम करवून घेताना दिसत आहे. कतरिना गुरू आणि आलिया शिष्य असं काहीसं या व्हिडिओमध्ये दिसत आहे.
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की कतरिना मॅडम 100च्या वरती आकडे मोजताना दिसत आहे, म्हणजे आलियाचे 100 स्कॉट मारून झाले आहेत. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करताना कतरिनाने लिहिलं आहे की, 'काळजी करू नको आलिया, अजून फक्त 300 स्कॉट बाकी आहेत.' यावरून कतरिना बाई खूपच कडक आहेत असं दिसतंय. ती आलियाचा चांगलाच घाम काढणार आहे.
या सगळ्यात आलिया मात्र पुरती थकलेली दिसत आहे. कतरिनाच्या सांगण्यावरून ती व्यायाम करत आहे. असंही बॉलिवूडमध्ये सगळेच कलाकार त्यांच्या फिटनेसची नेहमी काळजी घेतात. चांगल्या फिटनेससाठी ते खूप मेहनत घेत असतात. त्यामुळे व्हिडिओतली आलियाची मेहनत आपल्या सगळ्यांसाठी काही नवीन नाही. कारण आलिया स्वत: तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून अनेक व्हिडिओ शेअर करत असते. ज्यात ती नेहमीच खूप व्यायाम करताना दिसते. त्यामुळे कतरिनाचं हे टास्क तिने नक्कीच पूर्ण केलं असणार आहे. सो....ऑल दि बेस्ट आलिया...
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Alia bhutt, Katrina kaif, आलिया भट्ट, कतरिना कैफ