शाहरूखच्या बर्थ डे पार्टीतून कतरिनाला कोणामुळे पडावं लागलं बाहेर?

शाहरूखचा आज 52वा वाढदिवस. त्याची बर्थ डे पार्टी रंगली अलिबागच्या त्याच्या फार्म हाऊसवर. पार्टीत शाहरूखचे जवळचे मित्र-मैत्रिणी आले होते.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Nov 2, 2017 12:46 PM IST

शाहरूखच्या बर्थ डे पार्टीतून कतरिनाला कोणामुळे पडावं लागलं बाहेर?

02 नोव्हेंबर : शाहरूखचा आज 52वा वाढदिवस. त्याची बर्थ डे पार्टी रंगली अलिबागच्या त्याच्या फार्म  हाऊसवर. पार्टीत शाहरूखचे जवळचे मित्र-मैत्रिणी आले होते. पण अगोदर खूश असलेली कतरिना अचानक पार्टीतून निघून गेली. आणि त्याचं कारण दुसरं तिसरं कुणी नसून दीपिका पदुकोण आहे.

शाहरूखच्या पार्टीत रणबीर कपूरच्या दोन्ही माजी गर्लफ्रेंड्स उपस्थित होत्या. पण दोघांमधली कॅटफाईट यावेळी सगळ्यांच्या लक्षात आली. शाहरूखला दोघीही जवळच्या असल्यानं त्यानं दोघींनाही आमंत्रण दिलं होतं. त्याच्या सेलिब्रेशनची सुरुवात होण्याआधीच कतरिनानं पार्टीतून काढता पाय घेतला.

रणबीर आणि दीपिका रिलेशिनशिपमध्ये असतानाच रणबीरचं कतरिनाशी जुळलं. कॅटसाठी त्यानं दीपिकाला गुडबाय केलं. याचा राग दीपिकाला आहेच. पुन्हा कतरिनासोबत राहात असताना रणबीरनं दीपिकाबरोबर सिनेमात कामही केलं होतं. त्यानिमित्तानं त्यांच्या भेटीगाठी होत असत. तेही कॅटला खपत नसे. तेव्हापासून दोघींचे संबंध बिघडले ते कायमचेच.

आता रणबीर दोघींसोबतही नाही. तरीही कॅटफाईट चालूच आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 2, 2017 12:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...