मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /लग्नानंतरही Salman khan ला विसरली नाही Katrina kaif; Birthday दिवशी केली खास पोस्ट

लग्नानंतरही Salman khan ला विसरली नाही Katrina kaif; Birthday दिवशी केली खास पोस्ट

सलमान खान (Salman Khan) त्याचा 56 वा वाढदिवस(Salman Khan Birthday)  आज साजरा करत आहेत. चाहत्यांसोबत बॉलिवूड सेलेब्सकडून देखील त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

सलमान खान (Salman Khan) त्याचा 56 वा वाढदिवस(Salman Khan Birthday) आज साजरा करत आहेत. चाहत्यांसोबत बॉलिवूड सेलेब्सकडून देखील त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

सलमान खान (Salman Khan) त्याचा 56 वा वाढदिवस(Salman Khan Birthday) आज साजरा करत आहेत. चाहत्यांसोबत बॉलिवूड सेलेब्सकडून देखील त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

मुंबई, 27 डिसेंबर- सलमान खान (Salman Khan) त्याचा 56 वा वाढदिवस(Salman Khan Birthday)  आज साजरा करत आहेत. चाहत्यांसोबत बॉलिवूड सेलेब्सकडून देखील त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सलमानचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे. त्यापैकी एक नाव अभिनेत्री कतरिना कैफचे (Katrina Kaif) आहे. या दोघांची जोडी देखील सर्वांना आवडते. सलमानाच्या आयुष्यातील या खास दिवसाचे निमित्त साधत कतरिनाने देखील एक पोस्ट केली आहे.

सलमान आणि कतरिनाते नाते कुणापासून कधीच लपून राहिलेले नागी. दोघांची जोडी पडद्यावर देखील हिट ठरली आहे. या दोघांनी ‘मैंने प्यार क्यों किया’, ‘भारत’, ‘टाइगर जिंदा है’, ‘एक था टाइगर’ या सारख्या सिनेमात एकत्र काम केले आहे. कतरिनाने काही दिवासापूर्वी विकी कौशलसोबत लग्नगाठ बांधत आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरूवात केली आहे. विकी आणि कतरिनाची जोडी देखील चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. दोघंही नवीन संसाराचा आनंद घेत आहेत. असं जरी असंल तरी ती जवळचा मित्र सलमान खानचा वाढदिवस न विसरता त्याच्यासाठी खास पोस्ट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

वाचा-सलमानची पहिली कमाई ऐकून बसेल Shock, आता आहे कोट्यवधीच्या संपत्तीचा मालक

कतरिना काय म्हणाली आहे नेमकी पोस्टमध्ये

कतरिनाने तिच्या इन्स्टा स्टोरीला सलमान खानचा फोटो शेअर केला आहे. तिनं म्हटलं आहे की, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा...प्रेम, चमक आणि ब्रिलिएंस नेहमीच तुझ्यासोबत राहुदे. तिनं यासोबत हार्ट इमोजी देखील शेअर केली आहे. सोशल मीडियावर तिची ही पोस्ट व्हायरल होत आहे.

चांगले दोस्त आहेत कतरिना -सलमान

कतरिना कैफ आणि सलमान खानची जोडी पुन्हा एकदा टायगर फ्रँचायझीमध्ये झळकणार आहेत. चाहते या जोडीला पुन्हा एकत्र पाहण्यासाठी उत्सुक आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलमान खान आणि कतरिना यांच्यात चांगली मैत्री आहे. कतरिना आणि विकी कौशलच्या लग्नात सलमान उपस्थित नसला तरी त्याने कतरिनाला एक आलिशान कार भेट दिली आहे. एका बॉलिवूड मॅगझिनच्या बातमीनुसार, सलमानने लग्नात 3 कोटींची रेंज रोव्हर कार गिफ्ट केली आहे.

वाचा-भयावह घटना सांगत Salman Khan म्हणतोय, 'माझी आणि सापाची झाली मैत्री'

खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत

सलमान खान हा नेहमीच आपल्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. मग ते एखाद्या अभिनेत्रीशी जोडलेलं नाव असो, हिट अँड रन केस असो वा काळ्या हरिणाच्या शिकारीचा खटला असो. ज्यामुळे त्याला तुरूंगाची हवाही खावी लागली होती. पण त्याच्या प्रसिद्धीमध्ये घट झालेली नाही. कारण सलमानचे चाहते नेहमीच त्याला चांगल्या मनाचा माणूस मानतात. जो गरजूंच्या मदतीला नेहमी तत्पर असतो.

First published:
top videos

    Tags: Bollywood News, Entertainment, Katrina kaif, Salman khan