मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Katrina Kaif: कतरिनाने दीर सनीला खास अंदाजात केलं बर्थडे विश; शेअर केला Unseen Photo

Katrina Kaif: कतरिनाने दीर सनीला खास अंदाजात केलं बर्थडे विश; शेअर केला Unseen Photo

कतरिना-विकी

कतरिना-विकी

बॉलिवूड अभिनेता सनी कौशल आज आपला 33 वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेत्याला वाढदिवसानिमित्त भाऊ विकी कौशल आणि वहिनी कतरिना कैफने खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India
  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 28 सप्टेंबर-   बॉलिवूड अभिनेता सनी कौशल आज आपला 33 वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेत्याला वाढदिवसानिमित्त भाऊ विकी कौशल आणि वहिनी कतरिना कैफने खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. विकी आणि कतरिनाने सनीसोबतचे सुंदर फोटो शेअर करत तिला बर्थडे विश केलं आहे. हे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. या फोटमधून सनी आणि कतरिनामधील सुंदर बॉन्डिंग दिसून येत आहे. कतरिना आणि विकीने वारंवार आपल्या सुंदर नात्याची झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. आजही असंच काहीसं झालं आहे.

अभिनेत्री कतरिना कैफने डिसेंबर महिन्यात विकी कौशलसोबत लग्न केलं आहे. सनी कौशल हा विकीचा धाकटा भाऊ आणि कतरिनाचा दीर आहे. तोसुद्धा एक अभिनेता आहे. सध्या तो बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. कतरिना कैफने नुकतंच आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर सनी सोबतच एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो कतरिना आणि विकीच्या लग्न समारंभातील असल्याचा दिसून येत आहे. यामध्ये कतरिना आणि विकी उभे असून सनी मजेशीररित्या आपल्या वहिनीसमोर नतमस्तक होऊन उभा आहे. यामध्ये कतरिना आणि विकी अगदी खळखळून हसताना दिसून येत आहेत.

कतरिना कैफने फोटो शेअर करताच, तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर चाहते आणि सेलिब्रेटी प्रचंड लाईक्स आणि कमेंट्स करत आहेत. कतरिनाने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहलंय, 'सुंदर आयुष्य जगत राहा... आनंदी राहा'. हा फोटो विकी आणि कतरिनाच्या लग्नातील अनसीन फोटोंपैकी एक आहे. यापूवी कधीही हा फोटो कतरिना किंवा सनीने शेअर केलेला पाहण्यात आला नव्हता. त्यामुळे हा फोटो पाहून चाहते फारच खुश झाले आहेत. या फोटोमधून वहिनी आणि दीर यांमधील सुंदर नातं दिसून येत आहे.

दरम्यान सनीचा मोठा भाऊ अभिनेता विकी कौशलनेसुद्धा आपल्या इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये विकीने सनी सोबतचा फोटो शेअर करत लिहलंय, '“सर्वात प्रतिभावान कौशलला वाढदिवसाच्या शुभेच्छा. लव्ह यू सनी कौशल." सनी आणि विकीमध्ये फार छान बॉन्डिंग आहे. हे दोघेही भाऊ एखाद्या मित्राप्रमाणे राहतात. ते सतत सोबत सुट्टीचा आनंद घेतानाही दिसून येतात.

View this post on Instagram

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

(हे वाचा:Ranbir Kapoor B'day:रणबीर कपूरचं कार कलेक्शन आहे जबरदस्त; अभिनेत्याची एकूण संपत्ती माहितेय का?)

तसेच सनी कौशल मराठमोळी अभिनेत्री शर्वरी वाघला डेट करत असल्याचं म्हटलं जातं. ते दोघेही सतत एकमेकांसोबत डिनर करतांना आणि व्हेकेशनवर जाताना दिसून येतात. नुकतंच कतरिना कैफच्या बर्थडेला शर्वरीसुद्धा मालदीवला गेली होती. मात्र शर्वरी आणि सनी आपण फक्त चांगले मित्र असल्याचं सांगतात.

First published:

Tags: Katrina kaif, Vicky kaushal