सलमान नाही तर 'या' व्यक्तींसोबत डिनर करण्याची कतरिनाची आहे इच्छा

सलमान नाही तर 'या' व्यक्तींसोबत डिनर करण्याची कतरिनाची आहे इच्छा

कतरिना नुकतीच एका मुलाखातीत डिनरला जाण्याची इच्छा व्यक्त केली पण ज्या व्यक्तींसोबत तिला डिनर करायचं आहे त्यामध्ये सलमान नाही.

  • Share this:

मुंबई, 1 जून : सलमान खान आणि कतरिना कैफ सध्या त्यांच्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. सलमानचा 'भारत' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमामध्ये सलमान एकाच व्यक्तीच्या तरूण वयापासून ते म्हातारपणापर्यंतच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात सलमानचं नावही भारत असून कतरिना कैफ सलमानच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. ती या सिनेमत कुमुद रैनाची व्यक्तीरेखा साकारत आहे. या प्रमोशन दरम्यान कतरिना आणि सलमानमधील जवळीक पुन्हा एकदा वाढत असल्याचं दिसत असतानाच कतरिना एक आगळी-वेगळी इच्छा व्यक्त करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. कतरिना नुकतीच एका मुलाखातीत डिनरला जाण्याची इच्छा व्यक्त केली पण ज्या व्यक्तींसोबत तिला डिनर करायचं आहे त्यामध्ये सलमान नाही.
 

View this post on Instagram
 

If you liked #ChashniSong, this version will stay with you. @bharat_thefilm @BeingSalmanKhan @aliabbaszafar @atulreellife #BhushanKumar @tabutiful @apnabhidu @sonalikul @dishapatani @whosunilgrover @norafatehi @iaasifsheikhofficial @vishaldadlani @shekharravjiani @nehabhasin4u @kamil_irshad_official @nikhilnamit @reellifeproduction @skfilmsofficial @tseries.official


A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on

एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत कतरिनाला डिनरसाठी कोणासोबत जायला आवडेल असं विचारण्यात आलं त्यावेळी तिनं खूप विचार करून 3 व्यक्तींची नावं सांगितली ज्यात सलमानचा समावेश नाही. या तीन व्यक्तींमध्ये, फॉर्मर यूनाइटेड स्टेट सेक्रेटरी कोंडोलिजा राइज, भारचताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकन अभिनेत्री मर्लिन मुनरो यांचा समावेश आहे. हाच प्रश्न ज्यावेळी सलमानला विचारण्यात आला त्यावेळी त्यानं या प्रश्नाचं उत्तर देणं टाळत हा प्रश्न हसण्यावारी घेतला.

महाराणी एलिझाबेथच्या महालात पोहोचलं मजनूभाईचं पेन्टिंग, अनिल कपूरनं शेअर केला फोटो

सलमान म्हणाला, मी कोणा सोबतच डिनरला जाण्यासाठी उत्सुक नाही आय मी अँड मायसेल्फ. मी फक्त स्वतःसोबतच डिनर करण्यासाठी कम्फर्टेबल आहे. मला बाहेर जाऊन डिनर करण्यापेक्षा मला माझ्या कुटुंबासोबत एकत्र डिनर करायला आवडतं.

सैफ-करिनाच्या लग्नाचा फोटो व्हायरल, असे दिसायचे सारा- इब्राहिम

'भारत' सिनेमा त्याच्या नावामुळे फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर जगातही प्रदर्शनाआधीच लोकप्रिय झाला आहे. नुकताच ट्विटरनंही या सिनेमासाठी एक स्वतंत्र इमोजी सुद्धा दिला आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित 'भारत' सिनेमा ईदच्या मुहूर्तावर 5 जूनला प्रदर्शित होत असून यात सलमान खान, कतरिना कैफ, दिशा पाटनी, जॅकी श्रॉफ, तब्बू, सुनील ग्रोवर आदींच्या महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहेत.

...म्हणून Bharat च्या सेटवर कतरिना कैफनं सुनील ग्रोवरच्या कानशीलात लगावली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 1, 2019 09:23 PM IST

ताज्या बातम्या