मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

विकी-कतरीना पोहोचले वेडिंग प्लेस; राजस्थानी थाटात झालं जोडप्याचं जंगी स्वागत

विकी-कतरीना पोहोचले वेडिंग प्लेस; राजस्थानी थाटात झालं जोडप्याचं जंगी स्वागत

विकी कौशल   (Vicky Kaushal)  आणि कतरिना कैफ   (Katrina Kaif)  यांच्या लग्नाच्या   (Wedding)  विधींना आजपासून सुरुवात होणार आहे. काल रात्री कतरिना आणि विकी पोलिसांच्या कडक बंदोबस्तात सवाई माधोपूर जिल्ह्यातील चौथ का बरवारा शहरात पोहोचले.

पुढे वाचा ...
  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 7  डिसेंबर-   विकी कौशल   (Vicky Kaushal)  आणि कतरिना कैफ   (Katrina Kaif)  यांच्या लग्नाच्या   (Wedding)  विधींना आजपासून सुरुवात होणार आहे. काल रात्री कतरिना आणि विकी पोलिसांच्या कडक बंदोबस्तात सवाई माधोपूर जिल्ह्यातील चौथ का बरवारा शहरात पोहोचले. या शहरातील लग्नाचे ठिकाण म्हणजे सिक्स सेन्स फोर्ट बरवारा. जयपूरहून तीन आलिशान कारमधून रस्त्याने, कतरिना-विकी त्यांच्या कुटुंबियांसह कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत रात्री ठीक 11:10 वाजता सिक्स सेन्स बर्वरा फोर्ट हॉटेलमध्ये पोहोचले.

विकी कौशल-कतरिना तसेच त्यांच्या कुटुंबाचे हॉटेल व्यवस्थापनाने भव्य स्वागत केले. कतरिना-विकी हॉटेलवर पोहोचताच भव्य फटाक्यांची आतषबाजी करून आणि फुलांचे हार घालून आणि तिलक लावून स्वागत करण्यात आले. आता आजपासून त्यांचे पाहुणेही लग्नाच्या ठिकाणी येण्यास सुरुवात होणार आहे.

कतरिना कैफ 7 डिसेंबर ते 9 डिसेंबर दरम्यान विकी कौशलसोबत लग्नसोहळ्यात सहभागी होणार आहे. कतरिना-विकीचे लग्न सिक्स सेन्सेस बरवडा फोर्ट हॉटेलमध्ये राजशाही थाटात पार पडणार आहे.राजवाडी रितीरिवाजानुसार दोघांचे लग्न होणार आहे. कतरिना कैफ विकी कौशलसोबत काचेने सुसज्ज पॅव्हेलियनमध्ये सात फेरे घेणार आहे.

कडेकोट बंदोबस्तात लग्नसोहळा पार पडणार-

मंडपातील काचेचे नक्षीकाम अशा पद्धतीने करण्यात आले आहे की, या मंडपात बसल्यानंतर लाखोंच्या संख्येने एकच चेहरा दिसतो. याशिवाय हॉटेलच्या आतही संपूर्ण राजावाडी टच दिसतो. कडेकोट बंदोबस्तात हा विवाहसोहळा पार पडणार आहे.मुंबईस्थित इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी विकी कौशल आणि कतरिना कैफच्या लग्नसोहळ्याची जबाबदारी पाहत आहे. विकी कौशल आणि कतरिना कैफचे आउटफिट मुंबईच्या ड्रेस डिझायनरने डिझाइन केले आहेत. जे ते वेगवेगळ्या लग्न समारंभाच्या कार्यक्रमात परिधान करतील.

(हे वाचा:बेस्ट फ्रेंडमुळे गमावला बॉयफ्रेंड, मग कतरिनाच्या आयुष्यात झाली विकीची एंट्री )

विकी कौशल-कतरिना कैफच्या लग्नासाठी देश-विदेशातील अनेक राज्यांतून भाजी मागवण्यात आली आहे. थायलंडमधूनही अनेक प्रकारच्या भाज्या मागवण्यात आल्या आहेत. त्याचवेळी दक्षिण भारतातील कर्नाटक राज्यातून लाल केळी आणि मशरूमची आयात करण्यात आली आहे. याशिवाय पालक, कोबीसह इतर अनेक भाज्याही कर्नाटकातून आयात करण्यात आल्या आहेत. आज कर्नाटकातून एक ट्रक सिक्स सेन्स बारवडा किल्ल्यावर पोहोचला आहे.विकी कौशल-कतरिना कैफच्या पाहुण्यांची विशेष काळजी घेतली जाईल. यासाठी लग्नसमारंभात अनेक प्रकारचे पदार्थ तयार केले जात आहेत. यामध्ये कॉन्टिनेंटल फूडपासून ते पारंपारिक राजस्थानी आणि पंजाबी खाद्यपदार्थांचा समावेश आहे. लग्नात राजवाडी खाद्यपदार्थही असतील.

First published:

Tags: Entertainment, Katrina kaif, Vicky kaushal