Home /News /entertainment /

कर्नाटक-थायलंडच्या भाज्या, मुंबईतील क्रोकरी सेट; Katrina Kaif - Vicky Kaushal च्या लग्नाचा शाही थाट

कर्नाटक-थायलंडच्या भाज्या, मुंबईतील क्रोकरी सेट; Katrina Kaif - Vicky Kaushal च्या लग्नाचा शाही थाट

कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) यांचा लग्नाचा दिवस खास करण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे.

 मुंबई, 06 डिसेंबर : सध्या बॉलिवूडमध्ये लग्नाचा सिझन सुरू आहे. बॉलिवूडची चिकनी चमेली कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) या महिन्यात लग्नगाठ बांधणार असल्याचे वृत्त आहे. दोघांच्या लग्नासंबंधी अनेक चर्चा रंगल्या आहेत. या दोघांसंदर्भातील प्रत्येक गोष्ट चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. विकी आणि कतरिना राजस्थान इथं डेस्टिनेशन वेडिंग करणार असल्याची माहिती आहे. त्यांचा हा दिवस खास करण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. आज कुटुंबासह विकी आणि कतरिना (Vicky Kaushal-Katrina Kaif Wedding) राजस्थानला रवाना झाले आहेत. मुंबई विमानतळावरून जयपूरसाठी त्यांची फ्लाइट दुपारी 12 वाजता होती. राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील Six Senses Fort Barwara या रिसॉर्टमध्ये त्यांच्या स्वागातासाठी तयारी सुरू झाली आहे. लग्नात हजेरी लावणाऱ्या पाहुण्यांच्या नावांबद्दलही (Vicky Kaushal Katrina Kaif Guest List) चर्चाही रंगली आहे. या लग्नाला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी येणार आहेत. रिसॉर्टमध्ये पाहुण्यांसाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे. व्हीआयपी अतिथींसाठी 4 डझन क्रोकरी सेट मुंबईवरून मागवण्यात आले आहेत. तर आणखी 300 क्रोकरी सेट इतर पाहुण्यांसाठी मागवण्यात आले आहेत. हे वाचा - एक खास ब्लाऊज घालून विकीच्या घरी गेली कतरिना; साडीची किंमत वाचून चक्करच येईल विकी आणि कतरिनाच्या लग्नासाठी विदेश आणि देशातील इतर राज्यातून भाज्या मागवण्यात आल्या आहेत. थायलंडमधून अनेक प्रकारच्या भाज्या मागवण्यात आल्या आहेत. तर कर्नाटकमधून केळी आणि मशरूमसह इतर भाज्या मागवण्यात आल्या आहेत. आजच एक ट्रक कर्नाटकवरून रिसॉर्टवर पोहोचला आहे. हा विवाह मोठ्या थाटामाटात संपन्न होणार आहे. लग्नात विविध प्रकारच्या डिशेस बनवण्यात येणार आहेत. यात पारंपरिक राजस्थानी आणि पंजाबीसह काँटिनेंटल फूड असणार आहे. हे वाचा - विकी-कतरिनाच्या लग्नासाठी सजणार शाही मांडव; रथावर होणार एण्ट्री, वाचा डिटेल्स विकी आणि कतरिनाचा रात्री 9 वाजता Six Senses Fort Barwara रिसॉर्टमध्ये स्वागत समारंभ पार पडणार आहे. दोघांचा शाही विवाह सोहळा राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स या जुन्या किल्ल्याच्या रिसॉर्टमध्ये होणार आहे. विकी आणि कतरीना हा दिवस खास करण्यासाठी हॉटेल मॅनेजमेंट आणि इव्हेंट कंपनी मेहनत घेत आहेत. दोघांचा विवाह हा रजवाडी स्टाईलमध्ये होणार असून विकी आणि कतरिनाच्या लग्नाचे फंक्शन 7 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. या विवाहसोहळ्याबाबत गुप्तता पाळली जात आहे.
First published:

Tags: Entertainment, Katrina kaif, Vicky kaushal

पुढील बातम्या