Home /News /entertainment /

कतरिना-विकीने केली कोटींची डील; आंतरराष्ट्रीय मासिकाला विकले लग्नाच्या फोटोंचे हक्क

कतरिना-विकीने केली कोटींची डील; आंतरराष्ट्रीय मासिकाला विकले लग्नाच्या फोटोंचे हक्क

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफ ( Katrina Kaif-Vicky Kaushal) यांच्या लग्नाची तयारी जोरात सुरू आहे.आता दोघांनीही प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

    मुंबई, 02 डिसेंबर: बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफ ( Katrina Kaif-Vicky Kaushal) यांच्या लग्नाची तयारी जोरात सुरू आहे. प्रत्येकजण त्यांच्या लग्नाची चर्चा करताना दिसत आहे. लग्नातील नियमाबद्दलची माहितीही सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आली होती. यासोबतच हे दोघेही कोणते डिझायनर कपडे घालणार आहेत, हेही समोर आले आहे. आता दोघांनीही प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. विकी-कतरिनाने लग्नाच्या फोटोंचे हक्क विकले आंतरराष्ट्रीय मासिकाला विकी आणि कतरिना राजस्थानमधील सिक्स सेन्स फोर्टवर सात फेरे घेतील. 7 ते 9 डिसेंबर दरम्यान दोघांच्या लग्नाचे विधी पार पडणार आहेत. रिपोर्ट्सनुसार, दोघांनी लग्नाच्या फोटोंचे हक्क एका आंतरराष्ट्रीय मासिकाला देण्याचा निर्णय घेतला आहे. हा करार कोटींमध्ये निश्चित झाला आहे.कतरिना आणि तिच्या टीमनेच मॅगझिनशी बोलून करार केला आहे. लग्नाचा कोणताही फोटो शेअर करण्याचा हक्क फक्त या जोडप्यालाच आहे. कोणत्याही पाहुण्याला लग्नात फोन आत नेण्याची परवानगी नाही. वाचा : 'मुलीवर गोष्ट आली तर सहन करणार नाही'; आराध्याला ट्रोल करणाऱ्यांवर भडकला अभिषेक बच्चन यापूर्वी अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास यांनीही हीच पद्धत अवलंबली होती. दोघांच्या लग्नाच्या फोटोंचे हक्क वोग मॅगझिनकडे होते. त्याची किंमत 2.5 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स असल्याचे सांगण्यात आले. या मॅगझिनच्या कव्हर पेजवर कतरिना कैफही झळकली आहे.या मासिकाची फॅशन डिझायनर अनिता श्रॉफ आहे. कतरिनाची स्टाईल अनितानेच केली आहे. दोघेही चांगल्या मैत्रिणी आहेत. कतरिनाने तिच्या लग्नाच्या फोटोंचे हक्क या मासिकाला विकले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. वाचा: प्रियांकाच्या चुकीमुळे अभिनेत्यास दुखापत अन् झाला रक्तबंबाळ ; अभिनेत्रीला कोसळलं रडू, video viral कतरिना आणि विकी या दोघांनीही लग्नाबाबत मौन बाळगले आहे. दोघांनीही याबाबच कोणतेही अधिकृत माहिती जारी केलेली नाही. मात्र, दोघांचेही टीम तयारीला लागली आहे. दोघांसाठी फोर्टमध्ये 7-7 लाख रुपयांच्या दोन सुइट बुक करण्यात आले आहेत.
    Published by:News18 Trending Desk
    First published:

    Tags: Bollywood News, Entertainment, Katrina kaif, Vicky kaushal

    पुढील बातम्या