Home /News /entertainment /

किती ते प्रेम! मुंबईत येताच विकी कौशलने बायको कतरिनासाठी काय केलं पाहिलंत का?

किती ते प्रेम! मुंबईत येताच विकी कौशलने बायको कतरिनासाठी काय केलं पाहिलंत का?

लग्नानंतर कतरिना आणि विकी (Vicky Kaushal-Katrina Kaif Wedding)आज मुंबईत दाखल झाले आहेत. पहिल्यांंदाच दोघं एकत्र दिसले.

  मुंबई, 14 डिसेंबर : विकी कौशल आणि कतरिना कैफ (Vicky Kaushal-Katrina Kaif Wedding) यांनी 9 डिसेंबर रोजी राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्ट बरवाडा येथे लग्न केलं आहे. लग्नानंतर कतरिना-विकी आपल्या लग्नातील सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत. या फोटोंमध्ये दोघेही खूप आनंदी दिसत आहेत. लग्नानंतर कतरिना आणि विकी आज मुंबईत दाखल झाले आहेत. पहिल्यांंदाच दोघं एकत्र दिसले. यावेळी विकी कतरिनाला प्रोटेक्ट करताना दिसला. यावेळी दोघांनी पहिल्यांजा मीडियाला ऑफिशयली पती-पत्नी म्हणून पोझ दिली. कतरिनाच्या हातातील लाल चुडा आणि भांगातील कुंकू सर्वांचं लक्षवेधून घेत होतं. ती नेहमीसारखी खुपचं सुंदर दिसत आहे. आज खऱ्या अर्थाने कतरिनाचा गृहप्रवेळ होणार आहे. कतरिना आणि विकीने मुंबईत आल्यानंतर मीडियासमोर पोझ दिली. यानंतर यांच्या गाड्यांचा ताफा सरळ विकीच्या घराकडे वळा. आज कतरिनाचा विकी कौशलच्या घरात गृहप्रवेश होणार आहे. कतरिना आणि विकी यांची जोडीची एक झलक पाहण्यासाठी चाहते अतुर होते. सर्वांची इच्छा पूर्ण झाली आहे. वाचा : कुणी इतकं सुंदर असतं का..कतरिना-विकीचं रोमँटिक फोटो पाहून प्रेमात बुडाल! लग्नानंतर पहिल्यांदाच हे कपल मीडियासमोर आलं आहे.  या नव्या जोडीला पाहण्यासाठी सर्वांची झुंबड उडाली होती. यावेळी विकी  कतरिनाला प्रोटेक्ट करताना दिसला. चाहत्यांना देखील विकीचा हा अंदाज भावला आहे. काहींंनी कमेंट करत त्याचं कौतुक केलं आहे.
  कतरिना आणि विकीच्या लग्नाच्या फोटोंव सोशल मीडियावर चाहत्यांनी भरभरून प्रेमाचा वर्षाव केला. लग्नानंतर पहिल्यांदाच कतरिना-विकी सार्वजनिक ठिकाणी पती-पत्नीच्या रुपात स्पॉट झाले . यावेळी कतरिना आणि विकी एकमेकांचा हात धरताना दिसले.लग्नानंतर विकी-कतरिनाचे संपूर्ण कुटुंब राजस्थानहून मुंबईला परतले होते. पण, हे जोडपे सिक्स सेन्स फोर्ट बारवाडा येथून थेट त्यांच्या हनीमूनसाठी  गेले होते.लग्नानंतर दोघेही पहिल्यांदाच एकत्र आले. यादरम्यान कतरिनाने पीच कलरचा सूट घातला होता, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. विकी क्रीम रंगाच्या शर्ट पँटमध्ये दिसला. ज्यामध्ये तो खूपच सुंदर दिसत होत
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Bollywood News, Entertainment, Katrina kaif, Vicky kaushal

  पुढील बातम्या