Home /News /entertainment /

ठरलं! कतरिना-विकी 'या' दिवशी देणार 'रिसेप्शन पार्टी'; सलमान खान, रणबीर कपूरही होणार सहभागी

ठरलं! कतरिना-विकी 'या' दिवशी देणार 'रिसेप्शन पार्टी'; सलमान खान, रणबीर कपूरही होणार सहभागी

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल (Katrina-Vicky Wedding) यांनी लग्न करत सर्वांनाच सुखद धक्का दिला आहे. लग्नानंतर हे दोघे आपले सुंदर सुंदर फोटो शेअर करत आहेत.

    मुंबई, 16 डिसेंबर-   बॉलिवूड   (Bollywood)   अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल   (Katrina-Vicky Wedding)  यांनी लग्न करत सर्वांनाच सुखद धक्का दिला आहे. लग्नानंतर हे दोघे आपले सुंदर सुंदर फोटो शेअर करत आहेत. फोटोंमध्ये हे जोडपं खूपच शोभून दिसत आहे. या दोघांनी राजस्थानमधील माधोपूर येथील सिक्स सेन्स बरवाडा येथे लग्नगाठ बांधली आहे. लग्न आणि मालदीवमध्ये हनिमूननंतर हे दोघे मुंबईत परतले आहेत. मालदीवमधून लगेचच मुंबईला परत येण्यामागे एक खास कारण असल्याचं म्हटलं जात आहे. काय आहे हे कारण पाहूया. कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी कधीही आपलं नातं माध्यमांसमोर आणलं नाही. त्यांच्यामध्ये काही तरी शिजत असल्याची चर्चा नेहमीच असायची मात्र या दोघांनी कधीही उघडपणे सांगितलं नव्हतं. त्यांनतर त्यांच्या लग्नाच्या चर्चांना पेव्ह फुटला होता. आणि अखेर या चर्चा खऱ्या ठरल्या. या दोघांनी लग्न करत सर्वांनाच सुखद धक्का दिला. मोठ्या प्रमाणात त्यांच्या लग्नाच्या चर्चा सोशल मीडियावर सुरु होत्या. मात्र गुपित लग्न केल्यांनतर या दोघांनी आता आपल्या बॉलिवूड मित्रांना पार्टी देण्याचं नियोजन केलं आहे. या दोघांच्या एका जवळच्या मित्राने बॉलिवूड लाईफला दिलेल्या मुलाखतीनुसार, कतरिना आणि विकी लवकरच बॉलिवूडला ग्रँड रिस्पेशन पार्टी  (Vicky Kaushal Katrina Kaif Reception)   देणार आहेत. हे दोघेही येत्या २० डिसेंबरला ही रिसेप्शन पार्टी देणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळेच हे दोघेही इतक्या घाईत मालदीवहुन परतल्याच म्हटलं जात आहे. कतरिना आणि विकीने मुंबईपासून दूर राजस्थानमध्ये कुटुंब आणि काही खास मित्रांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा ऊरकला होता. त्यामुळे आता हे दोघेही सर्वांना आपल्या रिसेप्शन पार्टीमध्ये आमंत्रित करणार आहेत. असंही म्हटलं जात आहे, कि कतरिना आणि विकीला आपल्या कामावर परतण्यापूर्वी लग्नाचे सर्व कार्यक्रम उरकून घ्यायचे आहेत. आणि म्हणून हे दोघेही गडबड करत आहेत. तसेच ख्रिसमस जवळ येत आहे. आणि या नवविवाहित जोडप्याचा लग्नानंतर हा पहिलाच सण आहे. त्यामुळे हे दोघेही रिसेप्शन आधी करून घ्यायचा विचार करत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, विकी कतरिनाच्या रिसेप्शन पार्टीसाठी अमिताभ बच्चन, सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान आणि रणबीर कपूर यांसारख्या सर्व मोठ्या कलाकारांना निमंत्रण देण्यात आलं आहे. इतकंच नव्हे तर विकी कौशल-कतरिना कैफच्या रिसेप्शन पार्टीत हृतिक रोशन, करण जोहर, अक्षय कुमार, कंगना रणौत, आलिया भट्ट, अनुष्का शर्मा, अजय देवगण, ईशान खट्टर, मेघना गुलजार, रोहित शेट्टी, सिद्धार्थ मल्होत्रा, तापसी पन्नू आणि अभिषेक बच्चन यांच्यासह अनेक बॉलीवूड कलाकार देखील उपस्थित राहणार आहेत.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Entertainment, Katrina kaif, Vicky kaushal

    पुढील बातम्या