Home /News /entertainment /

सलमान खानची बहीण अर्पिताच्या ईद पार्टीत कतरिना कैफ होती गायब,समोर आलं मोठं कारण पार्टीत

सलमान खानची बहीण अर्पिताच्या ईद पार्टीत कतरिना कैफ होती गायब,समोर आलं मोठं कारण पार्टीत

बॉलिवूडमध्ये (Bollywood) दिवाळी ते ईद प्रत्येक सणाला विशेष महत्व दिलं जातं. सलमान खानची बहीण (Salman Khan Sister) अर्पिता खान (Arpita Khan) नेहमीच ईद पार्टीचे (Eid Party) आयोजन करत असते. ज्यामध्ये बॉलिवूडचे अनेक दिग्गज सेलिब्रिटी सहभागी होतात.

पुढे वाचा ...
    मुंबई, 5 मे- बॉलिवूडमध्ये   (Bollywood)  दिवाळी ते ईद प्रत्येक सणाला विशेष महत्व दिलं जातं. सलमान खानची बहीण  (Salman Khan Sister)  अर्पिता खान   (Arpita Khan)  नेहमीच ईद पार्टीचे   (Eid Party)  आयोजन करत असते. ज्यामध्ये बॉलिवूडचे अनेक दिग्गज सेलिब्रिटी सहभागी होतात. bollywoodlife.com नुसार, यावर्षी देखील अर्पिता आणि आयुष शर्मा यांनी त्यांच्या आलिशान बंगल्यात ईद साजरी केली. ज्यामध्ये जॅकलीन फर्नांडीज, करिश्मा कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा, कियारा अडवाणी यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. खान कुटुंबाने शहनाज गिललाही आमंत्रित केले होते, परंतु यामध्ये सरप्राईज एन्ट्री ठरली ती म्हणजे अभिनेत्री कंगना राणौतची. या अभिनेत्रीला चक्क सलमानच्या पार्टीत पाहून सर्वच चकित झाले होते. कारण कंगना सहसा बॉलिवूड पार्ट्यांपासून दूर राहते. तसेच ती अनेकवेळा नेपोटीझमवरुन या कलाकारांना धारेवर धरत असते. अशा परिस्थितीत जेव्हा ती 'भाईजान'च्या ईद सेलिब्रेशनमध्ये दिसली तेव्हा काही लोकांसाठी ते आश्चर्यचकित करण्यासारखं होतं. या पार्टीत आणखी एक चकित करणारी गोष्ट होती- ती म्हणजे अर्पिता खानच्या ईद सेलिब्रेशनमधून कतरिना कैफ   (Katrina Kaif)  गायब होती.सलमानच नव्हे तर अर्पिता आणि कतरिना या दोघींमध्ये खूप चांगली मैत्री आहे. त्यामुळे यावेळी कतरिना कैफला पार्टीचे आमंत्रण नव्हते का? असा प्रश्न अनेकांच्या मनात आला आहे. अभिनेत्री कतरिना कैफ अर्पिता खानच्या प्रत्येक ईद सेलिब्रेशनचा सहभागी असते. तिला अर्पिताची बेस्ट फ्रेंड देखील म्हटलं जातं. बऱ्याचवेळा या दोघींचं अनेक इव्हेंटमध्ये सुंदर बॉन्डिंग दिसलं आहे. कतरिना कैफने ९ डिसेंबरला अभिनेता विकी कौशलसोबत लग्न केलं आहे. तिच्या लग्नानंतरची ही पहिलीच ईद पार्टी होती. मात्र यंदा ती या पार्टीला आली नाही. अनेकांनी असा अंदाज लावला आहे की, कतरिनाने तिच्या लग्नात एकाही खानला आमंत्रित केलं नव्हतं, त्यामुळे तिचं या पार्टीतून नाव वगळलं असावं? परंतु यामागे कारण थोडंसं वेगळं आहे. हे सर्व अंदाज चुकीचे आहेत. खरं तर, सलमान खान आणि कतरिना यांच्यात सध्या कोणतेही मतभेद नाहीत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कामानिमित्त अभिनेत्री कालच शहरातून बाहेर गेली आहे. आणि मुंबईत नसल्या कारणामुळे कतरिना अर्पिता खान आणि आयुष शर्माच्या ईद पार्टीमधून गायब होती. तसेच कतरिना कैफ आणि सलमान खान लवकरच 'टायगर 3' मध्ये एकत्र दिसणार आहेत.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Bollywood News, Entertainment, Katrina kaif, Salman khan

    पुढील बातम्या